Friday, June 26, 2015

तुझा वारा.

Gayatri S Muley

तुझ्या दिशेने येणारा वारा
अवचीतच अवखळ होतो
माझ्या केसाना बिलगतो
एक ओलसर स्पर्श ..
जणू काय
तुझ्याकडे पाऊस पडून गेलाय
असा भासवतो
एक मंद सुगंध
आणि आठवणींचा फुललेला मोहोर
किती काळ लोटला
तीर गाठलाच नाहीय
मला नदी ओलांडता येत नाहीय
तुझ्यात पसरलेला अथांग सागर
एखादी पोर्णीमेची रात्र
तुझ्या माझ्यात ...सामवलेली
वाळूत उमटलेली पावले
माझ्या तिरावर शांत सुगंध
तुझ्या किनारी ओलसर वारे
तू पुर्ण....मी पुर्ण
एक अद्वैत संपुर्ण नाते ...तुझ्या माझ्यात
तुझ्या दिशेने आलेला वारा
उगाचच खारट ओलसर
केसाना येऊन भिडतो
.
गायत्री ...
March 15  2015

6 comments:

  1. सुरेख..
    पाऊस
    पाऊस सर्वांनाच असतोच हवाहवा...
    पण नेहमीच का भासतो नवानवा....

    ReplyDelete
  2. सुरेख..
    पाऊस
    पाऊस सर्वांनाच असतोच हवाहवा...
    पण नेहमीच का भासतो नवानवा....

    ReplyDelete
  3. सुंदर,छान ,,कविता खूप आवडली !

    ReplyDelete