पोकळी असतेच न प्रत्येक मनात? मग ती भरून काढायला कुणाचा तरी आधार घेण कितपत योग्य ठरत? अंगावर येणारा वेळ घालवण्या साठी कुणाशी बोलणे कितपत योग्य ठरत? मात्र आपल्या मुळे कुणी फशी पडतय ही जाणीव झाली की थांबणे नक्कीच योग्य ठरत. न सरणाऱ्या रात्री चांदणे नाही वेचू नये.
कारण त्यावर जरी अधिकार दिला असला तरी ती रात्र कुणाच्या तरी वाटेत खोळंबलेली असते. पावले मग तिकडेच वळणार असतात. अश्या क्षणी उगा कुणाचा रस्ता का चुकवावा एखाद्या चकव्या गत? आणि भान असणे ही काही चूक तर ठरतच नाही न? स्वत: च्या मनाचे चोचले कितपत पुरवावे?
" गेले द्यायचे राहूनी तुझे नक्षत्रांचे देणे "
हे देणे फक्त एका चांदण वेळे साठी असावे. तितकेच खरे.
मग चूक तर नक्कीच होती. वाटेवरच्या प्रवाश्याचा मुक्काम चुकवून चकवा लावणे हे नक्कीच चुकीचे. सावध असणे चूक नाहीच.
सगळ्या चांदण वेळा सगळ्यांसाठी नसतात. पण प्रत्येकाचा प्रहर मात्र ठरलेला असतोच.
, गायत्री ............