Friday, June 26, 2015
मी मनस्विनी : पाऊस आणि नक्षी
मी मनस्विनी : पाऊस आणि नक्षी: Gayatri S Muley वारा आला उधाणत... तुझ्यासारखाच आणि मी झेलला अंगाभर तो आला धुळीसोबत खूप मलीन.. .आणि मी पण भिजली त्या धुळीत मग मुळापा...
पाऊस
Gayatri S Muley
माहीत नाही पाऊस का थांबला
एक सरीपुरता आला अन गेला
भिजल्या वाटा भिजला पार
दूर एक डोह भिजला आरपार
त्या डोहात तरंग उठले
तो दूर जरी शांत होता
थेंब झेलला आज एक अनोळखी
जो कधी ओळखीचा होता
विरला तरी तो आत आत
पार गाठला तळ त्याने
भिरभिर भिरभिर एक पोकळी
आणि असंख्य आवर्तने
उगाच गळले छप्पर जराशे
उगाच भिजली उशी जराशी
उगाच , ...उगाच पाऊस आला गेला
थेंब तळाशी कोरडा उरला
..
गायत्री....
January 6,. 2015
माहीत नाही पाऊस का थांबला
एक सरीपुरता आला अन गेला
भिजल्या वाटा भिजला पार
दूर एक डोह भिजला आरपार
त्या डोहात तरंग उठले
तो दूर जरी शांत होता
थेंब झेलला आज एक अनोळखी
जो कधी ओळखीचा होता
विरला तरी तो आत आत
पार गाठला तळ त्याने
भिरभिर भिरभिर एक पोकळी
आणि असंख्य आवर्तने
उगाच गळले छप्पर जराशे
उगाच भिजली उशी जराशी
उगाच , ...उगाच पाऊस आला गेला
थेंब तळाशी कोरडा उरला
..
गायत्री....
January 6,. 2015
पाऊस ...डायरी.
Gayatri S Muley
कधीकाळी अश्याच एका पावसाळी रात्रीत
गळणा-या छ्परातून आत आलेला पाऊस
आडव्या तिडव्या बेफाम उन्मत्त सरी
त्या पावसात ओलीचिंब झालेली डायरी
ओघळून गेलेल्या एका कवितेच्या ओळी
नंतर कित्तीच रणरण उन्हात ती डायरी सुकवली
पण त्या ओळी पुन्हा स्मरल्याच नाही
पाऊस आताश्या केंव्हाही येतो.
डायरी जुन्या बस्त्यात माळावर
कुठे जिर्ण पाने.
कुठे जुना ओलावा
कुठे एक पिवळट वास
.
आजकाल नकळत काही ओळी नकळत स्मरतात...
त्या ओल्या ओघळलेल्या कवितेतल्या
.
गायत्री.
March 1
कधीकाळी अश्याच एका पावसाळी रात्रीत
गळणा-या छ्परातून आत आलेला पाऊस
आडव्या तिडव्या बेफाम उन्मत्त सरी
त्या पावसात ओलीचिंब झालेली डायरी
ओघळून गेलेल्या एका कवितेच्या ओळी
नंतर कित्तीच रणरण उन्हात ती डायरी सुकवली
पण त्या ओळी पुन्हा स्मरल्याच नाही
पाऊस आताश्या केंव्हाही येतो.
डायरी जुन्या बस्त्यात माळावर
कुठे जिर्ण पाने.
कुठे जुना ओलावा
कुठे एक पिवळट वास
.
आजकाल नकळत काही ओळी नकळत स्मरतात...
त्या ओल्या ओघळलेल्या कवितेतल्या
.
गायत्री.
March 1
तुझा वारा.
Gayatri S Muley
तुझ्या दिशेने येणारा वारा
अवचीतच अवखळ होतो
माझ्या केसाना बिलगतो
एक ओलसर स्पर्श ..
जणू काय
तुझ्याकडे पाऊस पडून गेलाय
असा भासवतो
एक मंद सुगंध
आणि आठवणींचा फुललेला मोहोर
किती काळ लोटला
तीर गाठलाच नाहीय
मला नदी ओलांडता येत नाहीय
तुझ्यात पसरलेला अथांग सागर
एखादी पोर्णीमेची रात्र
तुझ्या माझ्यात ...सामवलेली
वाळूत उमटलेली पावले
माझ्या तिरावर शांत सुगंध
तुझ्या किनारी ओलसर वारे
तू पुर्ण....मी पुर्ण
एक अद्वैत संपुर्ण नाते ...तुझ्या माझ्यात
तुझ्या दिशेने आलेला वारा
उगाचच खारट ओलसर
केसाना येऊन भिडतो
.
गायत्री ...
March 15 2015
तुझ्या दिशेने येणारा वारा
अवचीतच अवखळ होतो
माझ्या केसाना बिलगतो
एक ओलसर स्पर्श ..
जणू काय
तुझ्याकडे पाऊस पडून गेलाय
असा भासवतो
एक मंद सुगंध
आणि आठवणींचा फुललेला मोहोर
किती काळ लोटला
तीर गाठलाच नाहीय
मला नदी ओलांडता येत नाहीय
तुझ्यात पसरलेला अथांग सागर
एखादी पोर्णीमेची रात्र
तुझ्या माझ्यात ...सामवलेली
वाळूत उमटलेली पावले
माझ्या तिरावर शांत सुगंध
तुझ्या किनारी ओलसर वारे
तू पुर्ण....मी पुर्ण
एक अद्वैत संपुर्ण नाते ...तुझ्या माझ्यात
तुझ्या दिशेने आलेला वारा
उगाचच खारट ओलसर
केसाना येऊन भिडतो
.
गायत्री ...
March 15 2015
दयाघना.
Gayatri S Muley
कितीदाच आकाशाचा वेध घेत
त्या दयाघनाच्या अस्तीत्वाचा
शोध घेण्याचा......
आज प्रयत्न केला...
माझ्या कणभर अस्तीत्वाने .
गाठलेली मजलच म्हणायची ही
कुठे असलेल्या त्या अगम्य शक्तीच्या
अस्तीत्वाचा मी एक.कण
माझे अस्तीत्व
त्याच्या लेखी गौण ठरलेले...
..कधीचेच.....
मी कायम "अर्जून" त्याच्या शक्तीपुढे
आणि सगळे तत्वज्ञान..
.मलाच कोळून पिणारे
एक अखंड आवर्त......
..एक.अखंड वेदना,,,,.....पोकळी ....
....माझ्या अस्तीत्वाने जपलेले
तुझे अस्तीत्व हे दयाघना ....
तुझ्यापर्यंत पोचतेय का?
माझ्या एका आर्त नजरेने फक्त?
नाही कदाचीत....
कारण मला नाही येत न
ह्या गौण अस्तीत्वाच्या
दखली साठी
करायचे प्रयत्न.
मला फक्त मान्य असते
एक प्रचंड शक्ती
जिला माझी इच्छा शक्ती कळावी
इतपत किमान अपेक्षा
आजवर नतमस्तक असलेले..
.आज मान उंचावून पहातेय.
म्हणून दिवसातून कितीदाच
त्या दयाघानाच्या अस्तीत्वाची
दखल घ्यायला
आज नजर वळतेय
कितीदाच...........
आकाशाकडे
.
गायत्री....
June 5 2015
कितीदाच आकाशाचा वेध घेत
त्या दयाघनाच्या अस्तीत्वाचा
शोध घेण्याचा......
आज प्रयत्न केला...
माझ्या कणभर अस्तीत्वाने .
गाठलेली मजलच म्हणायची ही
कुठे असलेल्या त्या अगम्य शक्तीच्या
अस्तीत्वाचा मी एक.कण
माझे अस्तीत्व
त्याच्या लेखी गौण ठरलेले...
..कधीचेच.....
मी कायम "अर्जून" त्याच्या शक्तीपुढे
आणि सगळे तत्वज्ञान..
.मलाच कोळून पिणारे
एक अखंड आवर्त......
..एक.अखंड वेदना,,,,.....पोकळी ....
....माझ्या अस्तीत्वाने जपलेले
तुझे अस्तीत्व हे दयाघना ....
तुझ्यापर्यंत पोचतेय का?
माझ्या एका आर्त नजरेने फक्त?
नाही कदाचीत....
कारण मला नाही येत न
ह्या गौण अस्तीत्वाच्या
दखली साठी
करायचे प्रयत्न.
मला फक्त मान्य असते
एक प्रचंड शक्ती
जिला माझी इच्छा शक्ती कळावी
इतपत किमान अपेक्षा
आजवर नतमस्तक असलेले..
.आज मान उंचावून पहातेय.
म्हणून दिवसातून कितीदाच
त्या दयाघानाच्या अस्तीत्वाची
दखल घ्यायला
आज नजर वळतेय
कितीदाच...........
आकाशाकडे
.
गायत्री....
June 5 2015
देवा..............
Gayatri S Muley
साधला तू का उभा दावा
देवा माझ्या आयुष्याशी
मी तर होत्ये टिचभर केवळ
नम्र तव पावलांशी
दिलेस त्यात मी मानले समाधान
नव्हती मला असोशी
दिले मात्र तू हात राखूनी ,
जसा दुजाभाव सवतीशी
पाशी पडले , पारधी समोर
, जीव हताश माझा
शरणागत मी अन चालला तुझा
खेळ भेदरल्या जिवाशी
किर्र सरत्या सांजवेळी
कधी भरून आले मन माझे
शुभंकरोती म्हणत उभी मी
देवा तुझ्याच दाराशी
घेत गेलास माझी परीक्षा ,
मी देत गेले प्रत्येकदा
सत्व माझे कमजोर पडले
की खेळ झाला श्रध्देशी
चराचरात व्यापलेला
अस्तीत्व मी ही तुझेच जरी
तोलले तू देवपण अन मी
शोधले तुला मनाच्या तळाशी
आता नको , पुन्हा खेळ करू
माझ्या अंतस्थ जाणीवांशी
देव्हार्यातच तू आहेस बरा ,
मी लढते माझ्या जगण्याशी
म्हणे पाऊले असतात तुझी ,.
भार माझा तव खांद्याशी
जगून बघ तू ही एकदा
नाते बांधून चिरंजीव वेदनेशी
जन्म नको आता दुजा
नको तुझ्या विश्वाचा दाखला
थांब कधी तू ही अगतीक ,
तोलून पाहते मी ही जराशी
शक्ती तुझी अफाट ,
भिरकावशील मज एका क्षणी
खेळ तुझा संपेना अजूनही
फसगत झाल्या जिवाशी
......
......
गायत्री........
June 10
साधला तू का उभा दावा
देवा माझ्या आयुष्याशी
मी तर होत्ये टिचभर केवळ
नम्र तव पावलांशी
दिलेस त्यात मी मानले समाधान
नव्हती मला असोशी
दिले मात्र तू हात राखूनी ,
जसा दुजाभाव सवतीशी
पाशी पडले , पारधी समोर
, जीव हताश माझा
शरणागत मी अन चालला तुझा
खेळ भेदरल्या जिवाशी
किर्र सरत्या सांजवेळी
कधी भरून आले मन माझे
शुभंकरोती म्हणत उभी मी
देवा तुझ्याच दाराशी
घेत गेलास माझी परीक्षा ,
मी देत गेले प्रत्येकदा
सत्व माझे कमजोर पडले
की खेळ झाला श्रध्देशी
चराचरात व्यापलेला
अस्तीत्व मी ही तुझेच जरी
तोलले तू देवपण अन मी
शोधले तुला मनाच्या तळाशी
आता नको , पुन्हा खेळ करू
माझ्या अंतस्थ जाणीवांशी
देव्हार्यातच तू आहेस बरा ,
मी लढते माझ्या जगण्याशी
म्हणे पाऊले असतात तुझी ,.
भार माझा तव खांद्याशी
जगून बघ तू ही एकदा
नाते बांधून चिरंजीव वेदनेशी
जन्म नको आता दुजा
नको तुझ्या विश्वाचा दाखला
थांब कधी तू ही अगतीक ,
तोलून पाहते मी ही जराशी
शक्ती तुझी अफाट ,
भिरकावशील मज एका क्षणी
खेळ तुझा संपेना अजूनही
फसगत झाल्या जिवाशी
......
......
गायत्री........
June 10
बहरातला.पाऊस
Gayatri S Muley
ऐन बहरात होता
पाऊस तेंव्हा बाहेरचा आतला
कुणास नव्हता अदमास
त्याचा जराही कोंडलेला
उरात होत्या सरी
कधीच्या खोल खोल दाटलेल्या
भरात होता जोर कधीचा
पाऊस मन मेघातला
झरून जाता , धुळीत थोडा
अलवार सडा सांडला
उघडून गेला बंद मनाच्या
कोपर्यातील खिडकीला
गजात होता जंग जरासा
जुनाच कधीचा चढलेला
पाऊस माझाच होता का
माझ्या तळव्यात साचलेला
थेंब थेंब नक्षी जमावी
गिरवत काही जुनेच तरी
काय साचले ते तळाशी
ओझे ज्याचे पापणीला
भिजवून गेला चिंब तरीही
डोह कोरडा का उरला
बरसून माझा पाऊस तरी
आज का न बरसला
.पाऊस होता सोबतीला
देऊन गेलास तू कुशीतला
कुठे लपवू आज कळेना
सर्द ओलावा हा उशीतला
गायत्री....
June 122015
ऐन बहरात होता
पाऊस तेंव्हा बाहेरचा आतला
कुणास नव्हता अदमास
त्याचा जराही कोंडलेला
उरात होत्या सरी
कधीच्या खोल खोल दाटलेल्या
भरात होता जोर कधीचा
पाऊस मन मेघातला
झरून जाता , धुळीत थोडा
अलवार सडा सांडला
उघडून गेला बंद मनाच्या
कोपर्यातील खिडकीला
गजात होता जंग जरासा
जुनाच कधीचा चढलेला
पाऊस माझाच होता का
माझ्या तळव्यात साचलेला
थेंब थेंब नक्षी जमावी
गिरवत काही जुनेच तरी
काय साचले ते तळाशी
ओझे ज्याचे पापणीला
भिजवून गेला चिंब तरीही
डोह कोरडा का उरला
बरसून माझा पाऊस तरी
आज का न बरसला
.पाऊस होता सोबतीला
देऊन गेलास तू कुशीतला
कुठे लपवू आज कळेना
सर्द ओलावा हा उशीतला
गायत्री....
June 122015
कर्ण व्यथा
Gayatri S Muley
भाग्य अस्ता पावले रे
डाव तेथे साधले रे
हाय केली काय दैना
चक्र शापे गाडले रे .
शुध्द होता भाव तिचा
सूर्य पुत्रा त्यागले रे
माय ज्याची राजमाता
दूध त्याला टाळले रे
दूर गेली आस साधी
शस्त्र जागी टाकले रे
घाव देते तेथ झाले
तेच माझे आपले रे
दान द्यावे काय आता
जन्म माझा संपला रे
जन्म दात्री पांडवांची
व्यर्थ डोळे गाळले रे
वस्त्र देशी द्रौपदीला
दैव माझे कोपले रे
रक्त झाले आज वैरी
काय कृष्णा साधले रे
खेळ झाला धर्मक्षेत्री
वंश झाले नष्ट सारे
धर्म ग्लानी काढताना
काय कृष्णा साधले रे
.
गायत्री ...
June 15 2015
भाग्य अस्ता पावले रे
डाव तेथे साधले रे
हाय केली काय दैना
चक्र शापे गाडले रे .
शुध्द होता भाव तिचा
सूर्य पुत्रा त्यागले रे
माय ज्याची राजमाता
दूध त्याला टाळले रे
दूर गेली आस साधी
शस्त्र जागी टाकले रे
घाव देते तेथ झाले
तेच माझे आपले रे
दान द्यावे काय आता
जन्म माझा संपला रे
जन्म दात्री पांडवांची
व्यर्थ डोळे गाळले रे
वस्त्र देशी द्रौपदीला
दैव माझे कोपले रे
रक्त झाले आज वैरी
काय कृष्णा साधले रे
खेळ झाला धर्मक्षेत्री
वंश झाले नष्ट सारे
धर्म ग्लानी काढताना
काय कृष्णा साधले रे
.
गायत्री ...
June 15 2015
मनाचा तळ
प्रत्येक मनाच्या तळाशी
गाळ बसलेलाच असतो
वर वर स्वच्छ दिसणारे पाणि
ढवळले की गढूळ होणारच असत
त्या गाळात हमखास असत
एक गाठोड आठवणींचे
तेंव्हा गोड असले तरी
गाळात रुतून कडवट झालेल्या
सुखाची चव नासवणार्या आठवणी
त्याला गंज ही लागत नाही
प्रत्येक वेळेस झळाळूनच येतात त्या
त्या गाळाशी बसला असतो एक हुंदका..
कधीच बाहेर न येऊ शकलेला
एक स्वप्न असत
जे चिरनिद्रे साठी थांबलेले असते
कारण त्याला ........
जन्मांतराची वेस घालून दिलेली असते ....
गाठोड बांधून फेकताना...
आणि खळखळून फुटलले एक हसू
ते तर पार सगळ्यात खाली
त्या गाठोड्यातून निघून
गाळात रुतून बसलेले
एखादे वाढदिवासाचे
पिवळे पडलेले ग्रीटिंग
एखादे शब्द हरवलेले पत्र
आणि .........
पोकळी असलेले मन
त्या पोकळीतून निघालेले आयुष्य
हलके असते प्रेतासारखे....
म्हणून गाळात रुतून न बसता
तरंगत वर येत...
अलगद पोहून शेवटी
किनारा गाठत.....
किना-यावर वाळूत
मनोरे बांधायला लागत.......
टिकून रहात......
वादळ वारे उन पाऊस झेलत......
मग एक निवांत क्षण
रुतून बसत परत त्या गाळात
प्रत्येक आयुष्याला
एक गाठोड का बांधाव लागत?
आणि ते मनाच्या तळात
का फेकून द्यावे लागतय?
प्रत्येक मनाच्या तळाला
एक गाळ का साचलेला असतो ?
...गायत्री
June 18
गाळ बसलेलाच असतो
वर वर स्वच्छ दिसणारे पाणि
ढवळले की गढूळ होणारच असत
त्या गाळात हमखास असत
एक गाठोड आठवणींचे
तेंव्हा गोड असले तरी
गाळात रुतून कडवट झालेल्या
सुखाची चव नासवणार्या आठवणी
त्याला गंज ही लागत नाही
प्रत्येक वेळेस झळाळूनच येतात त्या
त्या गाळाशी बसला असतो एक हुंदका..
कधीच बाहेर न येऊ शकलेला
एक स्वप्न असत
जे चिरनिद्रे साठी थांबलेले असते
कारण त्याला ........
जन्मांतराची वेस घालून दिलेली असते ....
गाठोड बांधून फेकताना...
आणि खळखळून फुटलले एक हसू
ते तर पार सगळ्यात खाली
त्या गाठोड्यातून निघून
गाळात रुतून बसलेले
एखादे वाढदिवासाचे
पिवळे पडलेले ग्रीटिंग
एखादे शब्द हरवलेले पत्र
आणि .........
पोकळी असलेले मन
त्या पोकळीतून निघालेले आयुष्य
हलके असते प्रेतासारखे....
म्हणून गाळात रुतून न बसता
तरंगत वर येत...
अलगद पोहून शेवटी
किनारा गाठत.....
किना-यावर वाळूत
मनोरे बांधायला लागत.......
टिकून रहात......
वादळ वारे उन पाऊस झेलत......
मग एक निवांत क्षण
रुतून बसत परत त्या गाळात
प्रत्येक आयुष्याला
एक गाठोड का बांधाव लागत?
आणि ते मनाच्या तळात
का फेकून द्यावे लागतय?
प्रत्येक मनाच्या तळाला
एक गाळ का साचलेला असतो ?
...गायत्री
June 18
....
Gayatri S Muley
मी पहाटे पांघरावी रात्र वेडी थांबलेली
पापणीशी दाटलेले स्वप्न घेती कौल माझा
गायत्री....
June 24 2015
मी पहाटे पांघरावी रात्र वेडी थांबलेली
पापणीशी दाटलेले स्वप्न घेती कौल माझा
गायत्री....
June 24 2015
अस्तीत्वाचे देणे
तुझ्या माझ्या भेटीचा
चुकुन सुध्धा कधी
सुगंधाच नाते ठेवलेच नव्हते
कारण माहिती होत तुझ जाण
आणि हे आठवणिंचे येण
निमित्य कशाला आठवणीना सुगंधाच
कधी कुंपण घातल होत चिरेबंदी
आता छप्परच गळके निघाले
त्यात काय चुकल वळिवाच
हे होणार ; एकटेपण मागे उरणार
महिती होत सगळ ठरलेलच
तरिही कस टाळु शकणार
नकळत सरकणे
पायाखालच्या जमिनीच
पूर्ण व्यापुन उरायच नव्हतच
पण तेही दार बंद करुन घेतलस
दिलेल्या छोट्याश्या कोपर्याच
आताशा धडका बसतात दोन्हीकडुन
मनाच्या आतुन बाहेरुन
पण देण कस चुकवु स्वत:च्या अस्तित्वाच.
सौ.गायत्री मुळे.......
January 5, 2014
चुकुन सुध्धा कधी
सुगंधाच नाते ठेवलेच नव्हते
कारण माहिती होत तुझ जाण
आणि हे आठवणिंचे येण
निमित्य कशाला आठवणीना सुगंधाच
कधी कुंपण घातल होत चिरेबंदी
आता छप्परच गळके निघाले
त्यात काय चुकल वळिवाच
हे होणार ; एकटेपण मागे उरणार
महिती होत सगळ ठरलेलच
तरिही कस टाळु शकणार
नकळत सरकणे
पायाखालच्या जमिनीच
पूर्ण व्यापुन उरायच नव्हतच
पण तेही दार बंद करुन घेतलस
दिलेल्या छोट्याश्या कोपर्याच
आताशा धडका बसतात दोन्हीकडुन
मनाच्या आतुन बाहेरुन
पण देण कस चुकवु स्वत:च्या अस्तित्वाच.
सौ.गायत्री मुळे.......
January 5, 2014
चूक
Gayatri S Muley
जिथे जिथे सत्य मानुन
ज्या ज्या क्षणाना मी झुकले होते
आता पहाता मागे वळुन
तिथेच नेमकी मी चुकले होते.
कधिही कुठल्या सहवासाला
गंधात ना मी बांधले होते
गंध नसलेल्या आठवणिनी
तरी मला छळले होते
आत येणार्या वावटळीला
कुंपणा पलिकडे थोपवले होते
ठिगळ लावायला धावले
आकाश मुळातच फाटलेले.
रात्र रात्र जागुन
शब्द कवितेत बांधले होते
"वा ह वा " तर दूरच
कौतुकालाही मुकले होते
सत्य आणि स्वप्न
सीमारेषेचे बंधन घातले
तरी पापण्याना सगळे
स्वप्न आंदण दिले होते....
सौ गायत्री मुळे ...
January 17, 2014
जिथे जिथे सत्य मानुन
ज्या ज्या क्षणाना मी झुकले होते
आता पहाता मागे वळुन
तिथेच नेमकी मी चुकले होते.
कधिही कुठल्या सहवासाला
गंधात ना मी बांधले होते
गंध नसलेल्या आठवणिनी
तरी मला छळले होते
आत येणार्या वावटळीला
कुंपणा पलिकडे थोपवले होते
ठिगळ लावायला धावले
आकाश मुळातच फाटलेले.
रात्र रात्र जागुन
शब्द कवितेत बांधले होते
"वा ह वा " तर दूरच
कौतुकालाही मुकले होते
सत्य आणि स्वप्न
सीमारेषेचे बंधन घातले
तरी पापण्याना सगळे
स्वप्न आंदण दिले होते....
सौ गायत्री मुळे ...
January 17, 2014
..............
किती नेमक्या शब्दात
केलीस तू भलावण
मी मात्र फेडतेच आहे
घेतल्या शब्दांचे रूण
....गायत्री......
......................................
पाहु नकोस माझ्याकडे तू
रोखून तुझी नजर.
तुझी रोखलेली ...
माझी झुकलेली नजर
हा खेळ नजरा नजरीचा
येइल कुणाच्या नजरेला
नजर लागेल उगाचच
नजर बंदीच्या ह्या खेळाला
....गायत्री.......
January 19, 2014
केलीस तू भलावण
मी मात्र फेडतेच आहे
घेतल्या शब्दांचे रूण
....गायत्री......
......................................
पाहु नकोस माझ्याकडे तू
रोखून तुझी नजर.
तुझी रोखलेली ...
माझी झुकलेली नजर
हा खेळ नजरा नजरीचा
येइल कुणाच्या नजरेला
नजर लागेल उगाचच
नजर बंदीच्या ह्या खेळाला
....गायत्री.......
January 19, 2014
लज्जा रक्षण
Gayatri S Muley
.धाव रे क्रुष्ण सख्या
करी रक्षण माझे
माजला हा दु:शासन
फेडी वस्त्र माझे.
ये रे घनश्यामा
पांडव नि:शस्त्र जाहले
दीन आर्त माझे
कौरव सभेत विरले
भिष्म द्रोण क्रुपाचार्य
घेती मिटुनी स्वनेत्र
गांडीव टाकुन बसला.
हत:बल हा पार्थ
धर्मराज भीम नकुल सहदेव
खालमानी गलितगात्र
करिती वल्गना आणि प्रतिध्न्या
नसे पुरुषार्थ फक्त सुडार्थे.
करु कुणाचा धावा तुझविण
असशी कुठे तु हे नीलवर्ण
फेडितो नजरेनीच वस्त्र
सूतपुत्र राधेय कर्ण
धाव धाव रे नंद्नंदन
हाहाकार करी दुर्योधन
अंध मात पिताही लज्जित.
ऐकती शांते माझे रुदन
धावत येरे
रुक्मिणी रमणा
ये क्रुष्णेच्या
लज्जारक्षणा
धावत आला देवकी सूत
अखण्ड वस्त्रे द्रौपदीस पुरवीत
कौरव सभा स्तब्ध स्तिमीत
द्रौपदी समीप असे राधारमण
.
अरे सख्या कुठे तु होता
अपमानीत मी तुझ हाकारता
का तु जाउन बसला दूर
का न ऐकली ही अर्तता
अग समीप तुझ्या मी होतो सखे
तु हाकारसी आप्ताना दीनपणे
सांग कसा येउ मी धाऊन
तुच विसरलीस माझे असणे
जिथे जिथे असे हाक मनाची
असतो तिथे मी त्याच क्षणी
गरज फक्त भावनांची
वाट पहातो फक्त हाकेची....
.............
सौ गायत्री मुळे
January 23, 2014
क्षणीक तुटणे
.............
हे तुटणे क्षणीक असते
पुन:सांधुन घेण्यासाठी
तरी कायम रुजते
क्षण क्षण तोडण्या साठी
जाणीव नसते तेंव्हा
कुठल्याच अहंकाराची
बोच तरिही सलते
काट्यामधल्या फुलाची
तुझ सावध होणे
पुन: कसोशिने जुळते घेणे
परत परत आठ्वुन देत
क्षणात तुझे हरवणे
जशी मला ;.....तुलाही असावीच
जाणीव बोचर्या शांततेची
स्तब्ध पणे चालावेच लागतात
पाऊले आपापल्या वाटची
परीट्घडीला सुरकुती नसतेच
तरी चुरगळलेले विस्कटलेपण
हातात कायम उरते
भारावलेल रीतेपण.....
....सौ.गायत्री मुळे....
February 3, 2014
हे तुटणे क्षणीक असते
पुन:सांधुन घेण्यासाठी
तरी कायम रुजते
क्षण क्षण तोडण्या साठी
जाणीव नसते तेंव्हा
कुठल्याच अहंकाराची
बोच तरिही सलते
काट्यामधल्या फुलाची
तुझ सावध होणे
पुन: कसोशिने जुळते घेणे
परत परत आठ्वुन देत
क्षणात तुझे हरवणे
जशी मला ;.....तुलाही असावीच
जाणीव बोचर्या शांततेची
स्तब्ध पणे चालावेच लागतात
पाऊले आपापल्या वाटची
परीट्घडीला सुरकुती नसतेच
तरी चुरगळलेले विस्कटलेपण
हातात कायम उरते
भारावलेल रीतेपण.....
....सौ.गायत्री मुळे....
February 3, 2014
भिकारडी
भेट्णारच होतो आपण
एखाद्या निवांत क्षणी
अश्याच एका वळणावर
जिथे पुन: फाटे फुटणार
असंख्य .....
तू.....स्वप्न घेऊन आलास
आणि माझ्याकडे झोळी
कायम दानात हवे असलेले स्वप्न तुझाकड
े
आणि आयुष्याच्या लक्तरांची झोळी माझ्याकडे
तू........खूप उंचावर
आणि भेटत होता तुकड्या मध्दे
मी वेचले चांदणे
आणि शब्दांचे नक्षत्र सडे
...पसरवलेल्या माझ्या रिक्त झोळीत
पडत होते असंख्य क्षण
आणि काही आठवणी सुगंधी
मी अगदी ओथंबुन....ओतप्रोत भारावलेली
स्व्त:च्या अवघ्या अस्तित्वाची ओंजळ भरून घेतली
आता रीती करायची
गाभार्यातल्या देवासमोर
आणि ह्या डोळ्यातील निरांजनी
त्रुप्त त्रुप्त ..शांत तेवत ठेवायची होती
..."फक्त तुझ्यासाठी"....
तू ये ई पर्यंत एका मिणमिण प्रकाश रेषेनी का होइना
सगळा अंधार संपत होता रे
माझ हे जग नव्हतच न अनिर्बंध ओढीच
तूच सांग काय करू आता या वेडाच
आता.......
तुझ्या फाट्याला हमरस्ता मिळाला
मी...सैरभैर...पालापाचोळा भिरकावल्यागत
वावटळीत थरथरणारी वात सावरत
""निघालास पुढे.?..नेहमीप्रमाणेच?""
माझा आर्त आवाजात टाहो
आणि तुला कानोसा स्वर्गीय संगीताचा
........मीच वेडी
माझा मिणमिण अंधार
कुठे स्वप्ननगरीत असतो का रे
तू निघाला पुन: हात सोडुन
आणि मी उभी झोळी घेउन
काहीतरी क्षण मिळतील
तुझ्या नसण्यात ....तुझे असणारे
तू दिलेस शब्द
....."भिक्कारडी".......
आता पुरतील आयुष्यभर
झोळी भरली रे....कायमची
आता
तिथेच लक्तरे ...त्या लक्तरांची
वेशीवर
आणि आस डोळ्यात
स्वप्नांची.
जन्मभर.....
सौ...गायत्री मुळे.
February 7, 2014
एखाद्या निवांत क्षणी
अश्याच एका वळणावर
जिथे पुन: फाटे फुटणार
असंख्य .....
तू.....स्वप्न घेऊन आलास
आणि माझ्याकडे झोळी
कायम दानात हवे असलेले स्वप्न तुझाकड
े
आणि आयुष्याच्या लक्तरांची झोळी माझ्याकडे
तू........खूप उंचावर
आणि भेटत होता तुकड्या मध्दे
मी वेचले चांदणे
आणि शब्दांचे नक्षत्र सडे
...पसरवलेल्या माझ्या रिक्त झोळीत
पडत होते असंख्य क्षण
आणि काही आठवणी सुगंधी
मी अगदी ओथंबुन....ओतप्रोत भारावलेली
स्व्त:च्या अवघ्या अस्तित्वाची ओंजळ भरून घेतली
आता रीती करायची
गाभार्यातल्या देवासमोर
आणि ह्या डोळ्यातील निरांजनी
त्रुप्त त्रुप्त ..शांत तेवत ठेवायची होती
..."फक्त तुझ्यासाठी"....
तू ये ई पर्यंत एका मिणमिण प्रकाश रेषेनी का होइना
सगळा अंधार संपत होता रे
माझ हे जग नव्हतच न अनिर्बंध ओढीच
तूच सांग काय करू आता या वेडाच
आता.......
तुझ्या फाट्याला हमरस्ता मिळाला
मी...सैरभैर...पालापाचोळा भिरकावल्यागत
वावटळीत थरथरणारी वात सावरत
""निघालास पुढे.?..नेहमीप्रमाणेच?""
माझा आर्त आवाजात टाहो
आणि तुला कानोसा स्वर्गीय संगीताचा
........मीच वेडी
माझा मिणमिण अंधार
कुठे स्वप्ननगरीत असतो का रे
तू निघाला पुन: हात सोडुन
आणि मी उभी झोळी घेउन
काहीतरी क्षण मिळतील
तुझ्या नसण्यात ....तुझे असणारे
तू दिलेस शब्द
....."भिक्कारडी".......
आता पुरतील आयुष्यभर
झोळी भरली रे....कायमची
आता
तिथेच लक्तरे ...त्या लक्तरांची
वेशीवर
आणि आस डोळ्यात
स्वप्नांची.
जन्मभर.....
सौ...गायत्री मुळे.
February 7, 2014
Gayatri S Muley
आपले नाते बघ
शब्दा पुरतेच उरले
तु देउन विसरला
आणि मी पुरती अडकले
उरामध्ये माझ्या
बघ काय सलले
काट्यातुन वाचले
आणि फुलानी ओरबाडले
कित्येक मोडले वचने
कधीच ना मी मोजले
कितीक बदलली स्वप्ने
तुझ्या गिनतीत मी न उरले
आता कसे चालायचे
अंतरच किती उरले
थकली तुझी पाऊले
आणि खेळ मी हारले
....सौ गायत्री मुळे.....
February 12, 2014
आपले नाते बघ
शब्दा पुरतेच उरले
तु देउन विसरला
आणि मी पुरती अडकले
उरामध्ये माझ्या
बघ काय सलले
काट्यातुन वाचले
आणि फुलानी ओरबाडले
कित्येक मोडले वचने
कधीच ना मी मोजले
कितीक बदलली स्वप्ने
तुझ्या गिनतीत मी न उरले
आता कसे चालायचे
अंतरच किती उरले
थकली तुझी पाऊले
आणि खेळ मी हारले
....सौ गायत्री मुळे.....
February 12, 2014
Gayatri S Muley
बंद ओठांच्या कुपित
एक दुनिया काळोखी
अन घुसमटलेली
हवा असतो हुंकार
आणि .तुझ्या बोलां साठी
हुरहुरलेली
नको स्पर्शु कधी चुकुनही
नजर ठे ऊन ..आसुसलेली
घे समजुन आस कधीची
उरातली स्पंदनातली
.
.स्पर्श चंदन देह चंदनी
जशी वाटचाल सुगंधातली
जाणीवेच्या पलिकडे दे
जाणीव अबोधातली
दे मनाला हात एकतरी
हाक हीच मनातली
अंतर दे अंतर नको
जाण त्रुष्णा अंतरा तली
सौ गायत्री.मुळे.
February 13, 2014
बंद ओठांच्या कुपित
एक दुनिया काळोखी
अन घुसमटलेली
हवा असतो हुंकार
आणि .तुझ्या बोलां साठी
हुरहुरलेली
नको स्पर्शु कधी चुकुनही
नजर ठे ऊन ..आसुसलेली
घे समजुन आस कधीची
उरातली स्पंदनातली
.
.स्पर्श चंदन देह चंदनी
जशी वाटचाल सुगंधातली
जाणीवेच्या पलिकडे दे
जाणीव अबोधातली
दे मनाला हात एकतरी
हाक हीच मनातली
अंतर दे अंतर नको
जाण त्रुष्णा अंतरा तली
सौ गायत्री.मुळे.
February 13, 2014
Gayatri S Muley
वस्त्र रेशमी
आणी भरजरी.
कसला हा डाग.
उतरला पदरावरी
वीण माझीच
मीच घातलेली
उभी आडवी
कशीतरी
उब त्यातली.
तुला न कळाली.
मिरवलेस तू
पांघरून जरी.
.विसंगतीचा
रंग आपला
बेरंग झाले
मी जरी
लपेटशील शेला.
कधी जरतारी
मी नसेल तिथे
शोधले तरी
.
मिळू दे ऊब
तुला हवीशी
लेऊ दे मला.
महावस्त्र तरी
सौ गायत्री मुळे...
February 18, 2014
वस्त्र रेशमी
आणी भरजरी.
कसला हा डाग.
उतरला पदरावरी
वीण माझीच
मीच घातलेली
उभी आडवी
कशीतरी
उब त्यातली.
तुला न कळाली.
मिरवलेस तू
पांघरून जरी.
.विसंगतीचा
रंग आपला
बेरंग झाले
मी जरी
लपेटशील शेला.
कधी जरतारी
मी नसेल तिथे
शोधले तरी
.
मिळू दे ऊब
तुला हवीशी
लेऊ दे मला.
महावस्त्र तरी
सौ गायत्री मुळे...
February 18, 2014
Thursday, June 25, 2015
दादा.
तुम्ही नवतेच न कधी
तरी कायम असता.
आमच्या अस्तित्वात....
रंगरुपात
आईच्या नि:शब्द शब्दात
आणि
कायम तिच्या स्वप्नात
उणिवेची जाणिव नव्हतीच
भासलीच नाही
पण एक भण्ण पोकळी
कायम..
बघतो न जेंव्हा
एखादे निरागस बालक बाबांकडे झेपावताना...
किंव्हा सासुर्याला जात्या लेकीचे डोळे पुसताना.
तेंव्हा नक्कीच जाणवत तुमच नसणे
कधी हट्टाने रुसून
कधी बोटाला धरून.
आपण जगलो नाही सोबत
पण तरी क्षणो क्षणी एक हात
तुमच्या अस्तित्वाचा ...
कायम होता.सतत
अक्षरे गिरवायला.कधी
तुमच्या कडून नाही शिकले
ना बोटाला धरून तुमच्या
कधी शाळेत गेले.
पण चालतच होतो
सोबत प्रत्येक पाऊले
तुमच्या अस्तित्वाने
नेहमी भारवलेले.
कधी गोष्टीत घाबरून मन बावरलेले
.कधी तुम्हाला ना बिलगले.
तुमचे हात हळुच कधी
गालावरून ना फिरले.
कधी पांघरून ऊब तुमची
दो हातांची झोळी ना झुलले
तरी अंगाईत आईच्या.
तुमचेच गीत तिने गाईले.
सौ गायत्री मुळे...
March 5, 2014
तरी कायम असता.
आमच्या अस्तित्वात....
रंगरुपात
आईच्या नि:शब्द शब्दात
आणि
कायम तिच्या स्वप्नात
उणिवेची जाणिव नव्हतीच
भासलीच नाही
पण एक भण्ण पोकळी
कायम..
बघतो न जेंव्हा
एखादे निरागस बालक बाबांकडे झेपावताना...
किंव्हा सासुर्याला जात्या लेकीचे डोळे पुसताना.
तेंव्हा नक्कीच जाणवत तुमच नसणे
कधी हट्टाने रुसून
कधी बोटाला धरून.
आपण जगलो नाही सोबत
पण तरी क्षणो क्षणी एक हात
तुमच्या अस्तित्वाचा ...
कायम होता.सतत
अक्षरे गिरवायला.कधी
तुमच्या कडून नाही शिकले
ना बोटाला धरून तुमच्या
कधी शाळेत गेले.
पण चालतच होतो
सोबत प्रत्येक पाऊले
तुमच्या अस्तित्वाने
नेहमी भारवलेले.
कधी गोष्टीत घाबरून मन बावरलेले
.कधी तुम्हाला ना बिलगले.
तुमचे हात हळुच कधी
गालावरून ना फिरले.
कधी पांघरून ऊब तुमची
दो हातांची झोळी ना झुलले
तरी अंगाईत आईच्या.
तुमचेच गीत तिने गाईले.
सौ गायत्री मुळे...
March 5, 2014
मळभ.
दाटले मळभ
अवेळी झाकोळ
बरसत नाही
तरीही आभाळ
कोसळुनी बरस
धरेच्या कवेत
झेलायाला आतूर
तुझा हरेक कोसळ
फुटले पाझर
बघ भरला तळ
कैसे वैशाख वणव्यात
सुटे वळीवाचे भान
नको अडवू ओघळ
सागराचे आवतण
जाणे सहजची होते
उरे कोरडे भिजलेपण
सौ.गायत्री मुळे.
March 10, 2014
अवेळी झाकोळ
बरसत नाही
तरीही आभाळ
कोसळुनी बरस
धरेच्या कवेत
झेलायाला आतूर
तुझा हरेक कोसळ
फुटले पाझर
बघ भरला तळ
कैसे वैशाख वणव्यात
सुटे वळीवाचे भान
नको अडवू ओघळ
सागराचे आवतण
जाणे सहजची होते
उरे कोरडे भिजलेपण
सौ.गायत्री मुळे.
March 10, 2014
स्वप्न.चांदण रात्रीचे
Gayatri S Muley
स्वप्न आपल्या दोघांजवळही होते
तुज्या ओंजळीत.
माझ्या मनात.
मला तू देणार होतास ते
मी अगदी पापण्यांची ओंजळ करून मुग्ध बसलेली.
मला आंदणात हवे होते.
तू तर सौदागरच
केव्हढा खजीना....
कुबेरच जणू...
मी आपला सगळा पण पणाला लाऊन ......
माहिती होत.
ओंजळ निदान रीकामी उरणार नाही.
माझ्या अपेक्षा फक्त पापणीवर थांबलेल्या.
.
.
मला जागवायच्या होत्या चांदण्या रात्री
तुझ्यासोबत फुलत गात्रो गात्री
तू झाकलास बघ चांदवा माझ्या मनाचा...
आता ही ओहिटी ची अवसेचे रात
आणि अश्रूना आलेली भरती...
वहात निघाले सगळेच
तुझी ओंजळ रीकामी.
कुठेतरी उधळलेली
आणि माझे स्वप्न रिक्त
तुझे भंडार भरलेले.
पण माझ्या पापण्याना
आता स्व्प्नांचे पण
ओझे व्हायला लागले
....सौ गायत्री मुळे ......
March 22, 2014
स्वप्न आपल्या दोघांजवळही होते
तुज्या ओंजळीत.
माझ्या मनात.
मला तू देणार होतास ते
मी अगदी पापण्यांची ओंजळ करून मुग्ध बसलेली.
मला आंदणात हवे होते.
तू तर सौदागरच
केव्हढा खजीना....
कुबेरच जणू...
मी आपला सगळा पण पणाला लाऊन ......
माहिती होत.
ओंजळ निदान रीकामी उरणार नाही.
माझ्या अपेक्षा फक्त पापणीवर थांबलेल्या.
.
.
मला जागवायच्या होत्या चांदण्या रात्री
तुझ्यासोबत फुलत गात्रो गात्री
तू झाकलास बघ चांदवा माझ्या मनाचा...
आता ही ओहिटी ची अवसेचे रात
आणि अश्रूना आलेली भरती...
वहात निघाले सगळेच
तुझी ओंजळ रीकामी.
कुठेतरी उधळलेली
आणि माझे स्वप्न रिक्त
तुझे भंडार भरलेले.
पण माझ्या पापण्याना
आता स्व्प्नांचे पण
ओझे व्हायला लागले
....सौ गायत्री मुळे ......
March 22, 2014
रे...मना....
..रे...मना.....
काहीच नसते कारण..
अस्वस्थ तरी एक क्षण
रे मना नको आठवण
परतूनी तिच हुरहूर
नको पुन:थबकणे
चाहूल ती पुन:
रे मना खेळ जीवघेणा
आणि उठते काहूर
पुन: उठले वादळ
वेळीच घे वळण
रे मना हो सावध
आत आत थरथर.
घे झिडकारूनी स्वत:ला
आणि सोड साथ एकदा
रे मना टाळू कसा मी
आताआतला तुझा वावर
घे सगळे बांधून
नेता येईल तितके
रे मना दे ऊन जा तू
आठवणींचा अहेर.
तुझेच होते विसकटणे.
आपलेच आपल्यात.
रे मना नको प्रत्यारोप
तुझे तुच सावर
उधळला जसा पाचोळा
वावटळीत आपसूक
रे मना नको गुंतू.
कुठे थांबेल भिरभीर
कधी लांबल्या सावल्या
उतरणीला लागले
रे मना ही सांज झाली
जीव उगा का कातर.
सौ.गायत्री मुळे.
March 28, 2014
काहीच नसते कारण..
अस्वस्थ तरी एक क्षण
रे मना नको आठवण
परतूनी तिच हुरहूर
नको पुन:थबकणे
चाहूल ती पुन:
रे मना खेळ जीवघेणा
आणि उठते काहूर
पुन: उठले वादळ
वेळीच घे वळण
रे मना हो सावध
आत आत थरथर.
घे झिडकारूनी स्वत:ला
आणि सोड साथ एकदा
रे मना टाळू कसा मी
आताआतला तुझा वावर
घे सगळे बांधून
नेता येईल तितके
रे मना दे ऊन जा तू
आठवणींचा अहेर.
तुझेच होते विसकटणे.
आपलेच आपल्यात.
रे मना नको प्रत्यारोप
तुझे तुच सावर
उधळला जसा पाचोळा
वावटळीत आपसूक
रे मना नको गुंतू.
कुठे थांबेल भिरभीर
कधी लांबल्या सावल्या
उतरणीला लागले
रे मना ही सांज झाली
जीव उगा का कातर.
सौ.गायत्री मुळे.
March 28, 2014
पहाट....
Gayatri S Muley
.......
बघ दिशा उजळल्या.
एका नव्या तेजाने
उषेचेही रंग गहीरे
केशरी कोवळी किरणे
पाखरांच्या रांगा दिसती
निरभ्र शांत नभांगणी
व्रुक्ष तरुंवर करती गुंजन
पाखरांची मंजुळ गाणी
हवेनेही गुणगुणत हलकेसे
गाईले तुझेच गाणे
मध्दम मध्दम झुळकी सह
गुंजले तुझे तराणे
कसले आज हे भारावणे
माझे मलाच ना कळे
अबोलीने कसे गाईले.
मोगर्याचे धुंद गाणे .
....सौ गायत्री मुळे......
April 3, 2014
.......
बघ दिशा उजळल्या.
एका नव्या तेजाने
उषेचेही रंग गहीरे
केशरी कोवळी किरणे
पाखरांच्या रांगा दिसती
निरभ्र शांत नभांगणी
व्रुक्ष तरुंवर करती गुंजन
पाखरांची मंजुळ गाणी
हवेनेही गुणगुणत हलकेसे
गाईले तुझेच गाणे
मध्दम मध्दम झुळकी सह
गुंजले तुझे तराणे
कसले आज हे भारावणे
माझे मलाच ना कळे
अबोलीने कसे गाईले.
मोगर्याचे धुंद गाणे .
....सौ गायत्री मुळे......
April 3, 2014
कवितेच्या गावा
शक्यच नव्हते कधी
जायला कवितेच्या गावा
कळेनासे झालय हल्ली
शब्दही करतात कावा
शोधत फिरणे कशास्तव
शोधण्या जगण्याची खुमारी
इथे स्वप्नांची नीलामी
आणि भावनांची खरीददारी
तुझ्या घराच्या रस्त्यांची
कधीचीच सोडली मुशाफिरी
मुक्कामाच्या खाणाखुणाना
आता कुठले वाटेकरी
सजेल महफील तुझी
वाहवा करेल दुनिया सारी
गझल तुझीच रचलेली
तिथेच गाईन मी कधितरी
सौ.गायत्री मुळे
April 5, 2014
जायला कवितेच्या गावा
कळेनासे झालय हल्ली
शब्दही करतात कावा
शोधत फिरणे कशास्तव
शोधण्या जगण्याची खुमारी
इथे स्वप्नांची नीलामी
आणि भावनांची खरीददारी
तुझ्या घराच्या रस्त्यांची
कधीचीच सोडली मुशाफिरी
मुक्कामाच्या खाणाखुणाना
आता कुठले वाटेकरी
सजेल महफील तुझी
वाहवा करेल दुनिया सारी
गझल तुझीच रचलेली
तिथेच गाईन मी कधितरी
सौ.गायत्री मुळे
April 5, 2014
परके..शहर..............
Gayatri S Muley
त्याच शहरात रहायच...
...........परके होऊन..
..सगळे रस्ते पहायचे
............परके होऊन.
कोणि ओळखीच नक्कीच दिसेल..
.हसेल न हसेल...
आपण आपल्या धुंदीत चालायच..
नेहमी आपणच परक का व्हायच
कधी ह्या रस्त्याना पण परक करून सोडायच..
खळखळुन हसताना.एक कळ असेल मनात
ती ओठाच्या कोपर्याआड सहज लपवता येईल
.सवय आहे न
आणि
आत एक बाहेर एक अशी च तर स्वत:तली ओळख आहे.
मग ओळखीच्या खाणाखुणा आवाज देतील कदाचीत.
पण थोपवता येईल त्याना.
काहीच काळ
मग परत आहेच त्याच रस्त्यांची वळणे...
कुठे अडकायच थोडच आहे ह्या परक्या झालेल्या रस्त्यान मधे.
एखादीच संध्याकाळ
फक्त अस्ताव्यस्त....
जराशी वेगळी.
घरट्यात न परतता
आकाशात उडणार्या पाखराची.
पत्ता थोडीच चुकलाय.????
हळूच वाकून बघायच कोणि ओळखीचा चेहरा दिसतोय का?
पण आज पंखाना पण वेगळा निवारा हवा वाटतो...
मिळेल का
एक संध्याकाळ
परक्या रस्त्यांची तरी माझीच असलेली.
सौ.गायत्री मुळे
April 10, 2014
त्याच शहरात रहायच...
...........परके होऊन..
..सगळे रस्ते पहायचे
............परके होऊन.
कोणि ओळखीच नक्कीच दिसेल..
.हसेल न हसेल...
आपण आपल्या धुंदीत चालायच..
नेहमी आपणच परक का व्हायच
कधी ह्या रस्त्याना पण परक करून सोडायच..
खळखळुन हसताना.एक कळ असेल मनात
ती ओठाच्या कोपर्याआड सहज लपवता येईल
.सवय आहे न
आणि
आत एक बाहेर एक अशी च तर स्वत:तली ओळख आहे.
मग ओळखीच्या खाणाखुणा आवाज देतील कदाचीत.
पण थोपवता येईल त्याना.
काहीच काळ
मग परत आहेच त्याच रस्त्यांची वळणे...
कुठे अडकायच थोडच आहे ह्या परक्या झालेल्या रस्त्यान मधे.
एखादीच संध्याकाळ
फक्त अस्ताव्यस्त....
जराशी वेगळी.
घरट्यात न परतता
आकाशात उडणार्या पाखराची.
पत्ता थोडीच चुकलाय.????
हळूच वाकून बघायच कोणि ओळखीचा चेहरा दिसतोय का?
पण आज पंखाना पण वेगळा निवारा हवा वाटतो...
मिळेल का
एक संध्याकाळ
परक्या रस्त्यांची तरी माझीच असलेली.
सौ.गायत्री मुळे
April 10, 2014
का...
प्रवाह अडला कसा
येऊन आज बांधाशी
मेळ का जमत नाही
आज भावनांशी.
अंधारल्या त्या रातीना
घेतले मी उराशी
आठ्वणींचे काजवेही
कसे झाले परदेशी
फितूर झाली सांजवेळ
का पाखरांशी
परततील कसे पुन:
आज घरट्याशी.
फुलपाखरे झाली
कशी आता दरवेशी
बहर इथला सांडला
परक्या अंगणाशी.
सुरांनी का आज
साधले वैर लयीशी
तान उमटली आज
का पुन: तीच नकोशी
......
सौ.गायत्री मुळे...
April 20, 2014
येऊन आज बांधाशी
मेळ का जमत नाही
आज भावनांशी.
अंधारल्या त्या रातीना
घेतले मी उराशी
आठ्वणींचे काजवेही
कसे झाले परदेशी
फितूर झाली सांजवेळ
का पाखरांशी
परततील कसे पुन:
आज घरट्याशी.
फुलपाखरे झाली
कशी आता दरवेशी
बहर इथला सांडला
परक्या अंगणाशी.
सुरांनी का आज
साधले वैर लयीशी
तान उमटली आज
का पुन: तीच नकोशी
......
सौ.गायत्री मुळे...
April 20, 2014
प्रहर
कधी कधी हा प्रहर फारच जीवघेणा असतो.एका फोन च्या slight ring ची वाट पहाण्याचा.त्यात कंटाळुन गाणे लावावे
"विविध भारती ",,,,
,गाणे सुरू होते.....
बिन गोपाल भयो ब्रिज सुना ....
.पुन: त्यातही त्याच विरह वेदना .....
एक व्यक्ती जाताना काय काय घेऊन जाते न?सगळ्या जाणीवा...पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र जागोजागी उरलेल्या रहातात ...आणि मागे उरलेला....?? देहाच्या अस्तित्वाने असतो....पण कुठेतरी संपलेला.....
मधुबन सुनो...यमुना सुनी...जसोदा को घर आंगन सुनो...नंद बाबा की अखिया सुनी......सूनी सूनी सर की मटकीया.....राधा रानी को मन सुनो..कहा हो गोपाल......कहा हो गोपाल.....
कसले आर्त आहे ना या सुरात ....डोळे भरून येणार नाही तो वेगळाच म्हणायचा.
मग काय काय आठवत ....त्या भेटी....ते ओले क्षण ...ते दुरावणे (शरीराने) ..आणि मग फक्त आठवणीन्मध्ये जगणे...एकमेकांच्या विचारात जिवंत असणे
सगळे सुने होते हे खरे....
पण ज्या जाणीवा एकमेकांपासुन दूर झाल्यावर होतात त्या सहवासात असताना का नाही होत.कधी चेहर्यावर स्मितहास्य आणणार्या आठवणी...कधी स्वत:च्या नजरेला नजर न देता येऊ देणार्य आठवणी ....कधी हमसुन हमसुन रडवणार्या आठवणी
पण आठवणीच......
एकवेळेस स्वप्न तरी पुर्ण होतील पण आठवणी .....
त्या छळत कायम सोबत असतात पण त्यातला सल कधीच कमी नाही होऊ शकत...का असे न?
स्वप्नांपेक्षा ही त्या जवळच्या असतात पण आपल्या असुनही आपल्या नसतात
..........गायत्री .......
April 25, 2014
"विविध भारती ",,,,
,गाणे सुरू होते.....
बिन गोपाल भयो ब्रिज सुना ....
.पुन: त्यातही त्याच विरह वेदना .....
एक व्यक्ती जाताना काय काय घेऊन जाते न?सगळ्या जाणीवा...पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र जागोजागी उरलेल्या रहातात ...आणि मागे उरलेला....?? देहाच्या अस्तित्वाने असतो....पण कुठेतरी संपलेला.....
मधुबन सुनो...यमुना सुनी...जसोदा को घर आंगन सुनो...नंद बाबा की अखिया सुनी......सूनी सूनी सर की मटकीया.....राधा रानी को मन सुनो..कहा हो गोपाल......कहा हो गोपाल.....
कसले आर्त आहे ना या सुरात ....डोळे भरून येणार नाही तो वेगळाच म्हणायचा.
मग काय काय आठवत ....त्या भेटी....ते ओले क्षण ...ते दुरावणे (शरीराने) ..आणि मग फक्त आठवणीन्मध्ये जगणे...एकमेकांच्या विचारात जिवंत असणे
सगळे सुने होते हे खरे....
पण ज्या जाणीवा एकमेकांपासुन दूर झाल्यावर होतात त्या सहवासात असताना का नाही होत.कधी चेहर्यावर स्मितहास्य आणणार्या आठवणी...कधी स्वत:च्या नजरेला नजर न देता येऊ देणार्य आठवणी ....कधी हमसुन हमसुन रडवणार्या आठवणी
पण आठवणीच......
एकवेळेस स्वप्न तरी पुर्ण होतील पण आठवणी .....
त्या छळत कायम सोबत असतात पण त्यातला सल कधीच कमी नाही होऊ शकत...का असे न?
स्वप्नांपेक्षा ही त्या जवळच्या असतात पण आपल्या असुनही आपल्या नसतात
..........गायत्री .......
April 25, 2014
मुहूर्त
Gayatri S Muley
घर बांधायचे ....
तसा पाडायचा ही मुहुर्त असतो.
तो गाठेपर्यंत वेळ घालविल्या जातो
.घरात जाळे जळमट कोळीष्टके जमतात
त्यावरून प्रेमाने हात फिरणे बंद असते.
भिंतीना एक ओशट ओल असते
कुठे कुठे वाळवी लागली असते.
घर बांधताना आधी पाया खणल्या जातो.
पाडताना आधी छप्पर उकलल्या जाते.
अनंत काळ सगळे वादळ वारे थोपवुन धरणारे छप्पर.
सावली देणारे छप्पर....
मग भिंतींच्या पोटावर कुदळ बसते
कितीदा रडवेल्या अवस्थेत खांदा होणार्या भिंती
सगळ घर सुरक्षीत ठेवणार्या भिंती..
जगापासुन आपल्याल वेगळे पणाचे अस्तित्व देणार्या भिंती.
गम्मत मात्र दार खिडकीच्या चौकटी मात्र जपल्या जातात...
एखादा कोनाडा होतो त्या चौकटीचा धनी किंव्हा
चौकट मोडायला नसते न म्हणुन जपल्या जाते....
एकेक वस्तु वर्गिकरणात मोडते.
नको असलेली फेकून नवीन त्याची जागा घेणार
एक थंडगार पसारा
मातीचा ढिगारा.
अनंत आठवणींचा कचरा.एकेका विटेसोबत जपलेला कोपरा...
पुन:एक मुहुर्त ..भूमी पुजनाचा
.....सौ.गायत्री मुळे ......
April 27, 2014
घर बांधायचे ....
तसा पाडायचा ही मुहुर्त असतो.
तो गाठेपर्यंत वेळ घालविल्या जातो
.घरात जाळे जळमट कोळीष्टके जमतात
त्यावरून प्रेमाने हात फिरणे बंद असते.
भिंतीना एक ओशट ओल असते
कुठे कुठे वाळवी लागली असते.
घर बांधताना आधी पाया खणल्या जातो.
पाडताना आधी छप्पर उकलल्या जाते.
अनंत काळ सगळे वादळ वारे थोपवुन धरणारे छप्पर.
सावली देणारे छप्पर....
मग भिंतींच्या पोटावर कुदळ बसते
कितीदा रडवेल्या अवस्थेत खांदा होणार्या भिंती
सगळ घर सुरक्षीत ठेवणार्या भिंती..
जगापासुन आपल्याल वेगळे पणाचे अस्तित्व देणार्या भिंती.
गम्मत मात्र दार खिडकीच्या चौकटी मात्र जपल्या जातात...
एखादा कोनाडा होतो त्या चौकटीचा धनी किंव्हा
चौकट मोडायला नसते न म्हणुन जपल्या जाते....
एकेक वस्तु वर्गिकरणात मोडते.
नको असलेली फेकून नवीन त्याची जागा घेणार
एक थंडगार पसारा
मातीचा ढिगारा.
अनंत आठवणींचा कचरा.एकेका विटेसोबत जपलेला कोपरा...
पुन:एक मुहुर्त ..भूमी पुजनाचा
.....सौ.गायत्री मुळे ......
April 27, 2014
जगताच आले नाही
वेड होऊन कधी फसवुन घेता आल नाही.
सरसरून कधी गाता आल नाही
एका रेषेत कस काय जाऊ शकत आयुष्य
कदाचीत कधी जगताच आल नाही
पण आपल्या कुठे सीमारेषा एक होत्या.?
तुला तुझे भावविश्व
मला माझे बंधन
कधी काय तोडता आले नसते का
पण दूर किनार्या च्या दोन टोकाला राहूनही एकमेकाना पहाताच आल नाही
कदाचीत कधी जगताच आल नाही.
काही सगळ्याच संध्याकाळी उदासवाण्या नसतात
आणि रात्री काही सगळ्याच डोळ्यात सरत नाहीत
पण स्वप्नामधे सुध्दा तुला थांबवून ठेवता आले नाही
कदचीत कधीच जगता आले नाही
सगळे शांत असते.तुझे बदलते रुतू
माझे अंदाजी मौसमी वारे
वादळच नेहमी पेलावे लागते असे नाही
कदाचीत कधी जगताच आले नाही
सगळे शब्द कुठे नेहमी तुझ्याचसाठी असतात
संवाद नेहमी कुठे व्यक्त असतो
.मनातल्या मनात कधी बोलताच आले नाही
कदाचीत कधी जगताच आले नाही.
.......गायत्री .........
May 4, 2014
सरसरून कधी गाता आल नाही
एका रेषेत कस काय जाऊ शकत आयुष्य
कदाचीत कधी जगताच आल नाही
पण आपल्या कुठे सीमारेषा एक होत्या.?
तुला तुझे भावविश्व
मला माझे बंधन
कधी काय तोडता आले नसते का
पण दूर किनार्या च्या दोन टोकाला राहूनही एकमेकाना पहाताच आल नाही
कदाचीत कधी जगताच आल नाही.
काही सगळ्याच संध्याकाळी उदासवाण्या नसतात
आणि रात्री काही सगळ्याच डोळ्यात सरत नाहीत
पण स्वप्नामधे सुध्दा तुला थांबवून ठेवता आले नाही
कदचीत कधीच जगता आले नाही
सगळे शांत असते.तुझे बदलते रुतू
माझे अंदाजी मौसमी वारे
वादळच नेहमी पेलावे लागते असे नाही
कदाचीत कधी जगताच आले नाही
सगळे शब्द कुठे नेहमी तुझ्याचसाठी असतात
संवाद नेहमी कुठे व्यक्त असतो
.मनातल्या मनात कधी बोलताच आले नाही
कदाचीत कधी जगताच आले नाही.
.......गायत्री .........
May 4, 2014
Gayatri S Muley
तू उगाचच खंतावावे
असे बोल माझे खचितच नव्हते
उगा सोडून दे सगळे असेच
माझेच माझे मनोगत होते
कसली करावी रुजवात.
कोण खोटे कोण खरे होते
पुरावे मी देण्याआधी
सही शिक्या निशी दाखले होते
वादळ वारे वावटळ
कधीचेच कुठे थांबले होते
नको आता कसलेच उधाण
झुळुकेने भिरकावले होते
एकदा शांत जलाशयात मी
खडा टाकून पाहीले होते
डोह असावेच आत पण
मला तरंग गिळायला उठले होते
......गायत्री ....
May 8, 2014
तू उगाचच खंतावावे
असे बोल माझे खचितच नव्हते
उगा सोडून दे सगळे असेच
माझेच माझे मनोगत होते
कसली करावी रुजवात.
कोण खोटे कोण खरे होते
पुरावे मी देण्याआधी
सही शिक्या निशी दाखले होते
वादळ वारे वावटळ
कधीचेच कुठे थांबले होते
नको आता कसलेच उधाण
झुळुकेने भिरकावले होते
एकदा शांत जलाशयात मी
खडा टाकून पाहीले होते
डोह असावेच आत पण
मला तरंग गिळायला उठले होते
......गायत्री ....
May 8, 2014
...
Gayatri S Muley
घनांच्या मधे दामिनी ने असावे
तसे राजसा मन्मनी तू ठसावे
तमाच्या उरी शुक्रतारा विराजे
तसे राजसा मी तुला आठवावे
निळाईत कान्हा तुझ्या मी वसावे
तुझी सानिका सप्तसूरात गावे
अभोगी तरी त्रुप्त मी नाद व्हावे
तुझी याद येता यमुना स्मरावे
पुन्हा शांत राती सुरानी सजावे
यमुना तळी पावले थीरकावे
सवे गोपिकांच्या तुझी रासलीला
रमावे पुन्हा ;मी पुन्हा धुंद व्हावे
.....सौ गायत्री मुळे ...
.
May 18, 2014
घनांच्या मधे दामिनी ने असावे
तसे राजसा मन्मनी तू ठसावे
तमाच्या उरी शुक्रतारा विराजे
तसे राजसा मी तुला आठवावे
निळाईत कान्हा तुझ्या मी वसावे
तुझी सानिका सप्तसूरात गावे
अभोगी तरी त्रुप्त मी नाद व्हावे
तुझी याद येता यमुना स्मरावे
पुन्हा शांत राती सुरानी सजावे
यमुना तळी पावले थीरकावे
सवे गोपिकांच्या तुझी रासलीला
रमावे पुन्हा ;मी पुन्हा धुंद व्हावे
.....सौ गायत्री मुळे ...
.
May 18, 2014
............
Gayatri S Muley
काल ढुंकून पाहीली नाही कळी वाहीलेली देव्हारी
आज निर्माल्य हुंगताना ठेच लागली का जिव्हारी
....गायत्री......
May 22, 2014
काल ढुंकून पाहीली नाही कळी वाहीलेली देव्हारी
आज निर्माल्य हुंगताना ठेच लागली का जिव्हारी
....गायत्री......
May 22, 2014
पाऊस आणि नक्षी
Gayatri S Muley
वारा आला उधाणत...
तुझ्यासारखाच
आणि मी झेलला अंगाभर
तो आला धुळीसोबत
खूप मलीन..
.आणि मी पण भिजली
त्या धुळीत
मग मुळापासून हलायला लागलेले व्रुक्ष.
आणि थरथरत
घरट्यात बसलेले पाखरे
ह्यांचा एक अबोल संघर्ष
तावदान ओढले
तो टकटक करतच राहीला दारावर
मला एक असूरी समाधान
तुला बाहेर थोपवल्या सारख
मग हळूच बाहेर बघीतल
2/4थेंब रांगोळी काढून गेलेले
धुळीची पण नक्षी झालेली
आणि बाहेर थोपवल तरी झालेली वाताहत
पाऊस पडून गेला
मंद झुळूक यायला लागली
तुझ कधीच वाक्य
पाऊस पडून गेला की जस सगळ निरभ्र होत
तसे तुझे डोळे तू रडल्या नंतर अजूनच स्वछ होतात...
तुझ सगळ औरच
बरसण
वादळ
आणि नंतर हे धुळाक्षरे
हळूच तावदान पुसून मी थोपवू पहाते
एक वादळ आतले
....गायत्री.....
May 26, 2014
वारा आला उधाणत...
तुझ्यासारखाच
आणि मी झेलला अंगाभर
तो आला धुळीसोबत
खूप मलीन..
.आणि मी पण भिजली
त्या धुळीत
मग मुळापासून हलायला लागलेले व्रुक्ष.
आणि थरथरत
घरट्यात बसलेले पाखरे
ह्यांचा एक अबोल संघर्ष
तावदान ओढले
तो टकटक करतच राहीला दारावर
मला एक असूरी समाधान
तुला बाहेर थोपवल्या सारख
मग हळूच बाहेर बघीतल
2/4थेंब रांगोळी काढून गेलेले
धुळीची पण नक्षी झालेली
आणि बाहेर थोपवल तरी झालेली वाताहत
पाऊस पडून गेला
मंद झुळूक यायला लागली
तुझ कधीच वाक्य
पाऊस पडून गेला की जस सगळ निरभ्र होत
तसे तुझे डोळे तू रडल्या नंतर अजूनच स्वछ होतात...
तुझ सगळ औरच
बरसण
वादळ
आणि नंतर हे धुळाक्षरे
हळूच तावदान पुसून मी थोपवू पहाते
एक वादळ आतले
....गायत्री.....
May 26, 2014
...............
Gayatri S Muley
.....
तिळ तिळ तुटण्या परीस
एकदाच मला विखरू दे
असण्यातले नसणे माझे
कधी तुलाही अखरू दे
....गायत्री.....
May 28, 2014
.................................................................
कधी कधी अती समजुतदार पणा करून दुस-याला फक्त समजून घेणे म्हणजे प्रेम ठरत की लाचार लांगूल चालन म्हणता येईल
.
........गायत्री....
May 27, 2014
.....
तिळ तिळ तुटण्या परीस
एकदाच मला विखरू दे
असण्यातले नसणे माझे
कधी तुलाही अखरू दे
....गायत्री.....
May 28, 2014
.................................................................
कधी कधी अती समजुतदार पणा करून दुस-याला फक्त समजून घेणे म्हणजे प्रेम ठरत की लाचार लांगूल चालन म्हणता येईल
.
........गायत्री....
May 27, 2014
माझ्या कविता.
Gayatri S Muley
त्या माझ्या सा-या कविता.
त्या माझ्या सा-या कविता
माझ्या मागे रेंगाळतात स्वयंपाक घरात
आणि रुंजी घालतात
शब्दात बांधून घ्यायला
मग मी गोळा करते जपून ठेवलेले शब्द.
"रुतू येत होते रुतू जात होते."
मनाने मी तिथेच गुंतलेली रहाते
आता शब्द रुंजी घालतात
कवडसे देते मी तिला (कवीतेला)
खेळायला.
मी बागेत जाते
प्राजक्ता पासून रातराणी पर्यंत सगळे सुगंध गोळा करते.
कवीतेच्या कुपीत भरते.
समुद्रावरून भरती ओहोटीच्या लाटा खेचते
कविता त्यात नाहून निघते
संध्याकाळचा सगळा कातर वारा
भरून घेते आपल्या काजळात
मी रात्री चांदण्यानी तिची ओटी भरते.
नक्षत्रांचे सडे घालते
चंद्राच दान देते
किर्र रात्री काजवे देते प्रकाशासाठी .
तिला व्रुत्त देते ..मात्रेत बांधते
ती खुष नसते.
तिला मुक्त सोडून देऊन
मग मी तिला तुझ्या पायाशी वाकवते
आशिर्वादासाठी
तू कधीतरी म्हंटलेल.
"तू ह्रुदयस्थ...पायाशी नाहीस"
मी तिथे वाकून पहाते
सगळे गंज लागलेले कड्या कुलूपे आणि दार बंद
हिरमुसलेली कवीता घेऊन मी परतते.
माझ्या स्वयंपाकघरात
कवीतेचा नवीन हट्ट पुरवायला.
त्या माझ्या सा-या कविता रुंजी घालतात
माझ्याभोवती
....सौ.गायत्री मुळे ...
May 30, 2014
त्या माझ्या सा-या कविता.
त्या माझ्या सा-या कविता
माझ्या मागे रेंगाळतात स्वयंपाक घरात
आणि रुंजी घालतात
शब्दात बांधून घ्यायला
मग मी गोळा करते जपून ठेवलेले शब्द.
"रुतू येत होते रुतू जात होते."
मनाने मी तिथेच गुंतलेली रहाते
आता शब्द रुंजी घालतात
कवडसे देते मी तिला (कवीतेला)
खेळायला.
मी बागेत जाते
प्राजक्ता पासून रातराणी पर्यंत सगळे सुगंध गोळा करते.
कवीतेच्या कुपीत भरते.
समुद्रावरून भरती ओहोटीच्या लाटा खेचते
कविता त्यात नाहून निघते
संध्याकाळचा सगळा कातर वारा
भरून घेते आपल्या काजळात
मी रात्री चांदण्यानी तिची ओटी भरते.
नक्षत्रांचे सडे घालते
चंद्राच दान देते
किर्र रात्री काजवे देते प्रकाशासाठी .
तिला व्रुत्त देते ..मात्रेत बांधते
ती खुष नसते.
तिला मुक्त सोडून देऊन
मग मी तिला तुझ्या पायाशी वाकवते
आशिर्वादासाठी
तू कधीतरी म्हंटलेल.
"तू ह्रुदयस्थ...पायाशी नाहीस"
मी तिथे वाकून पहाते
सगळे गंज लागलेले कड्या कुलूपे आणि दार बंद
हिरमुसलेली कवीता घेऊन मी परतते.
माझ्या स्वयंपाकघरात
कवीतेचा नवीन हट्ट पुरवायला.
त्या माझ्या सा-या कविता रुंजी घालतात
माझ्याभोवती
....सौ.गायत्री मुळे ...
May 30, 2014
मोरपीस
Gayatri S Muley
तुझ्या आठवांचे मोरपिशी बहाणे
मी सांजवेळी गाते अवचितसे गाणे.
तू दिलेस मजला कितीसे रंग
गडद आठवणींचा संग
शांत डोह आत तरंग
पुन:पुन: नव्याने तिथेच तसे रमणे.
तुझ्या आठवांचे........
.
मी न राधीका ना मी मीरा
नाद जागतो तरी अंतरी.
सप्तसुर तुझेच मी रे
सानीका तुझीच मी बावरी
तुझ्या आठवांचे.....
हे मोरपिस कितीसे देखणे
रंग त्यातले सारेच अनोखे.
फिरू दे सार्या तनामनावर
लेऊन साज सारे फसवे
तुझ्या आठवांचे....
मोरपिसाने कूपी उघडली.
भेटीतल्य त्या गंध क्षणाची
किती हळुवार रोमांच सारे.
उगाच थरथर आज तनूची
तुझ्या आठवांचे मोरपिशी बहाणे
मी सांजवेळी गाते आवचितसे गाणे.
June 7, 2014
तुझ्या आठवांचे मोरपिशी बहाणे
मी सांजवेळी गाते अवचितसे गाणे.
तू दिलेस मजला कितीसे रंग
गडद आठवणींचा संग
शांत डोह आत तरंग
पुन:पुन: नव्याने तिथेच तसे रमणे.
तुझ्या आठवांचे........
.
मी न राधीका ना मी मीरा
नाद जागतो तरी अंतरी.
सप्तसुर तुझेच मी रे
सानीका तुझीच मी बावरी
तुझ्या आठवांचे.....
हे मोरपिस कितीसे देखणे
रंग त्यातले सारेच अनोखे.
फिरू दे सार्या तनामनावर
लेऊन साज सारे फसवे
तुझ्या आठवांचे....
मोरपिसाने कूपी उघडली.
भेटीतल्य त्या गंध क्षणाची
किती हळुवार रोमांच सारे.
उगाच थरथर आज तनूची
तुझ्या आठवांचे मोरपिशी बहाणे
मी सांजवेळी गाते आवचितसे गाणे.
June 7, 2014
सल.....
ayatri S Muley
..........
किती जीवापाड सांभाळला
आत एक सल
आणि आताशा नको वाटतो
वरवर दिसणाराही वळ
किती पेलले आहे आत
उध्वस्त करून गेलेले काल
नको वाटते आताशा
वादळाची साधी चाहुल
.....
गायत्री .....
June 17, 2014
..........
किती जीवापाड सांभाळला
आत एक सल
आणि आताशा नको वाटतो
वरवर दिसणाराही वळ
किती पेलले आहे आत
उध्वस्त करून गेलेले काल
नको वाटते आताशा
वादळाची साधी चाहुल
.....
गायत्री .....
June 17, 2014
जाग
Gayatri S Muley
रात्रीच्या शेवटच्या प्रहरा पर्यंत
एकमेकात जागे राहू
मग आपच जाग येते एका जागलेल्या स्वप्नासोबत
कल्पांताला अंत असुच नये
जसा क्षितिजाला नसतो
आणि श्वास येऊ देत...तुझे माझ्यात
माझे स्पंदने विरू दे तुझ्यात
कधीच्या काही खुणा
गाभा-यात जपून ठेवलेल्या.
अर्पण करते वेळी
आत कुठेतरी
सल असतो निर्माल्याला
तू उचलून घे .न दे त्या सरकत्या प्रहराला
एकेक कळी उमलून येताना
तिच्या दवात भिजल्या पाकळीला
आज जुळल्या का तारा नी साधला सूर
असे कुठे नव्हते काहीच कधी दूर
आत आत झुलणारी स्वप्ने
तुझी तुझ्या पाशी
माझी माझ्या कडे
एक निसटता सूर्यकिरण
आणि एक देखणी त्रुप्तता.
स्वप्नवेल्हाळ पहाट
तुझ्यामाझ्यात उरलेली
...
गायत्री.....
June 25, 2014
रात्रीच्या शेवटच्या प्रहरा पर्यंत
एकमेकात जागे राहू
मग आपच जाग येते एका जागलेल्या स्वप्नासोबत
कल्पांताला अंत असुच नये
जसा क्षितिजाला नसतो
आणि श्वास येऊ देत...तुझे माझ्यात
माझे स्पंदने विरू दे तुझ्यात
कधीच्या काही खुणा
गाभा-यात जपून ठेवलेल्या.
अर्पण करते वेळी
आत कुठेतरी
सल असतो निर्माल्याला
तू उचलून घे .न दे त्या सरकत्या प्रहराला
एकेक कळी उमलून येताना
तिच्या दवात भिजल्या पाकळीला
आज जुळल्या का तारा नी साधला सूर
असे कुठे नव्हते काहीच कधी दूर
आत आत झुलणारी स्वप्ने
तुझी तुझ्या पाशी
माझी माझ्या कडे
एक निसटता सूर्यकिरण
आणि एक देखणी त्रुप्तता.
स्वप्नवेल्हाळ पहाट
तुझ्यामाझ्यात उरलेली
...
गायत्री.....
June 25, 2014
गाठलेला पाऊस
Gayatri S Muley
वाटले...यंदा
...पावसालच गाठावे
आणि गाठले
आधीच्या सगळ्या कोरड्या कुंपणाना झुगारले
भेटेलच तो माहीती होते
आणि भिजायचे होत्ये
पण पाऊस सुध्दा यंदा अटीनीच बरसला
त्याला गाठण्याचा सोस माझ्यापुरताच उरला.
पाऊस म्हणे
...मी येईल बरसेल...माझ्या चौकटीपुरता
म्हणले एखादाच मेघ दे तुझ्या आवाक्यातला
बर असु दे .....
मी भिजून.घेते ..किंव्हा तू कोसळ मी तोलून घेते
पाऊस म्हणे नको मला माझी चौकट असु दे
रिंगण दिलेय तुला ..ठेव तुझ्यापुरते
.
यंदा गाठायचे पावसाला
मनोमन ठरवले
पाणी भरले मेघ
वेशीहुन परतले
..
सौ.गायत्री मुळे...
July 8, 2014
वाटले...यंदा
...पावसालच गाठावे
आणि गाठले
आधीच्या सगळ्या कोरड्या कुंपणाना झुगारले
भेटेलच तो माहीती होते
आणि भिजायचे होत्ये
पण पाऊस सुध्दा यंदा अटीनीच बरसला
त्याला गाठण्याचा सोस माझ्यापुरताच उरला.
पाऊस म्हणे
...मी येईल बरसेल...माझ्या चौकटीपुरता
म्हणले एखादाच मेघ दे तुझ्या आवाक्यातला
बर असु दे .....
मी भिजून.घेते ..किंव्हा तू कोसळ मी तोलून घेते
पाऊस म्हणे नको मला माझी चौकट असु दे
रिंगण दिलेय तुला ..ठेव तुझ्यापुरते
.
यंदा गाठायचे पावसाला
मनोमन ठरवले
पाणी भरले मेघ
वेशीहुन परतले
..
सौ.गायत्री मुळे...
July 8, 2014
परका पाऊस
Gayatri S Muley
एकच पाऊस् एकाच ठिकाणी
कसा वेगवेगळा बरसतो
कुणी थेंबा गणीक झुरतो
कुणी थेंबासाठी झुरतो.
कुठे डोळ्यातुन अचानक
आठवांसोबत झिरपतो
कधी आसुसलेला चातक होऊन
नजरे साठी अडतो
वाटे भिजावे चिंब आणि
झेलून घ्याव्या सरी
पाऊस तुच माझा जरी
तुझे भिजणे कुठेतरी
....गायत्री....
July 21, 2014
एकच पाऊस् एकाच ठिकाणी
कसा वेगवेगळा बरसतो
कुणी थेंबा गणीक झुरतो
कुणी थेंबासाठी झुरतो.
कुठे डोळ्यातुन अचानक
आठवांसोबत झिरपतो
कधी आसुसलेला चातक होऊन
नजरे साठी अडतो
वाटे भिजावे चिंब आणि
झेलून घ्याव्या सरी
पाऊस तुच माझा जरी
तुझे भिजणे कुठेतरी
....गायत्री....
July 21, 2014
माझा पाऊस
आभाळभर मेघ जमा झाले
पुंजक्याने
मला म्हणे बरसू का
नको रे....
रिकाम्या जागा आहेत
त्या भरून घे
गच्च दाटून ये.
मग बरस
सगळ्या शक्तीनिशी
मला हवाय तो कोसळ
आणि ते चिंब भिजण
असा विरळ तू मला भेटू नको
हल्ली कळत नाहीय
दुस-या अंगणातल्या सरीत त्रुप्त होणारी मी .....
थेंबानीच मिटणारी त्रुषार्तता आता कुठे संपली?
मला आता माझा पाऊस हवा असतो..
.थेंबातही का असेना हवा तो ओलावा असतो.
...गायत्री,,,,,,,
July 24, 2014
पुंजक्याने
मला म्हणे बरसू का
नको रे....
रिकाम्या जागा आहेत
त्या भरून घे
गच्च दाटून ये.
मग बरस
सगळ्या शक्तीनिशी
मला हवाय तो कोसळ
आणि ते चिंब भिजण
असा विरळ तू मला भेटू नको
हल्ली कळत नाहीय
दुस-या अंगणातल्या सरीत त्रुप्त होणारी मी .....
थेंबानीच मिटणारी त्रुषार्तता आता कुठे संपली?
मला आता माझा पाऊस हवा असतो..
.थेंबातही का असेना हवा तो ओलावा असतो.
...गायत्री,,,,,,,
July 24, 2014
खूण गाठ...
Gayatri S Muley
चुरगळलेला ,
कुठे मोड पडलेला ,
जरासा , कुठे झिजलेला
माझा कागद !!
कोरा नसला तरी शाई उडालेला
तुझ्या हातात आलाय न
हव ते गाण लिही
जरास पुसट उमटेल
पण तुझ्या को-या डायरी चा कोरा वास
त्यात माझा कागद शोभणार नाहीय
तो मुडपून ठेऊन दे
एखाद्या आठवणीच्या खुणे साठी.किंव्हा एखाद्या सुटलेल्या पण विसरायच्या नसलेल्या पाना मधे
भरकन तुला पोचता येईल तिथे.
माझ्या चुरगळलेल्या कागदा पर्यंत नाही रे .....!!!!
तुझ्या 'खुणेच्या' आठवणीशी
पण.कधी ही डायरीही जुनी होईल.
मुळातच माझा जुना कागद अजुन जुनकट होईल
मोड पडलेल्या जागी आता तुकडे पडायला लागतील
ठेऊन घेशील सगळे तुकडे
तुझ्या आठवणींचा प्रवास तरी सुखाचा होईल
....गायत्री....
July 27, 2014 a
चुरगळलेला ,
कुठे मोड पडलेला ,
जरासा , कुठे झिजलेला
माझा कागद !!
कोरा नसला तरी शाई उडालेला
तुझ्या हातात आलाय न
हव ते गाण लिही
जरास पुसट उमटेल
पण तुझ्या को-या डायरी चा कोरा वास
त्यात माझा कागद शोभणार नाहीय
तो मुडपून ठेऊन दे
एखाद्या आठवणीच्या खुणे साठी.किंव्हा एखाद्या सुटलेल्या पण विसरायच्या नसलेल्या पाना मधे
भरकन तुला पोचता येईल तिथे.
माझ्या चुरगळलेल्या कागदा पर्यंत नाही रे .....!!!!
तुझ्या 'खुणेच्या' आठवणीशी
पण.कधी ही डायरीही जुनी होईल.
मुळातच माझा जुना कागद अजुन जुनकट होईल
मोड पडलेल्या जागी आता तुकडे पडायला लागतील
ठेऊन घेशील सगळे तुकडे
तुझ्या आठवणींचा प्रवास तरी सुखाचा होईल
....गायत्री....
July 27, 2014 a
पाऊस गाणे
Gayatri S Muley
तुझ्या आठवांचे स्मरण की
माझ्या स्मरणातल्या आठवणी
कळायला लागले मला
कसाही बरसतो पाऊस हल्ली
कधी वीज भिजून निघते
आणि मग भिड्ते आकाशाला
मेघा मेघा त दाटूनी
असाच बरसतो पाऊस हल्ली
भिजणे का उरले आहे
पाऊस संपला कधीचाच
कळत नाही कुठे बरसतो
माझा पाऊस हल्ली
माझा होऊन कधी बरसला
रुजला नाही तरीही कुठे
आणि गाठतो तरी मला
परका झालेला पाऊस हल्ली
.
...सौ .गायत्री मुळे......
July 30, 2014 at
तुझ्या आठवांचे स्मरण की
माझ्या स्मरणातल्या आठवणी
कळायला लागले मला
कसाही बरसतो पाऊस हल्ली
कधी वीज भिजून निघते
आणि मग भिड्ते आकाशाला
मेघा मेघा त दाटूनी
असाच बरसतो पाऊस हल्ली
भिजणे का उरले आहे
पाऊस संपला कधीचाच
कळत नाही कुठे बरसतो
माझा पाऊस हल्ली
माझा होऊन कधी बरसला
रुजला नाही तरीही कुठे
आणि गाठतो तरी मला
परका झालेला पाऊस हल्ली
.
...सौ .गायत्री मुळे......
July 30, 2014 at
प्राक्तन..
Gayatri S Muley
तू कधी फक्त...
माझ्या पावलांशी बरोबरी केली
कळलेही नाही मला
दिशानी कशी मुजोरी केली.
सरले कित्येक क्रुतू
आला गेला श्रावण
भरले नाही तरीही साधे
माझ्या ओंजळीतले रीतेपण
तळहातीच्या रेषा
सांगती त्यांचे खरेपण
ललाटरेषा लिहीता
देव विसरला देव पण
...गायत्री....
August 1, 2014
तू कधी फक्त...
माझ्या पावलांशी बरोबरी केली
कळलेही नाही मला
दिशानी कशी मुजोरी केली.
सरले कित्येक क्रुतू
आला गेला श्रावण
भरले नाही तरीही साधे
माझ्या ओंजळीतले रीतेपण
तळहातीच्या रेषा
सांगती त्यांचे खरेपण
ललाटरेषा लिहीता
देव विसरला देव पण
...गायत्री....
August 1, 2014
उरलेला क्षण
Gayatri S Muley
तिथेच जगून उरला तो क्षण
तिथल्या पावसात...
धुक्यात..
.पानावरच्या ओघळत्या थेंबात
त्या ओल्या संध्याकाळी
त्या धुंद हवेत
त्या भुरभुरत्या पावसात
गवताच्या पात्यात.
त्या थंडीत
त्या शांततेत
त्या रात्रीत
त्या कुडकुडण्यात
त्या प्रत्येक क्षणात विरला तो क्षण
आणि मग
उरला एकच अखंड असा क्षण
त्या सगळ्या आठवणींच्या
दवाचा...
....गायत्री ....
August 2, 2014
तिथेच जगून उरला तो क्षण
तिथल्या पावसात...
धुक्यात..
.पानावरच्या ओघळत्या थेंबात
त्या ओल्या संध्याकाळी
त्या धुंद हवेत
त्या भुरभुरत्या पावसात
गवताच्या पात्यात.
त्या थंडीत
त्या शांततेत
त्या रात्रीत
त्या कुडकुडण्यात
त्या प्रत्येक क्षणात विरला तो क्षण
आणि मग
उरला एकच अखंड असा क्षण
त्या सगळ्या आठवणींच्या
दवाचा...
....गायत्री ....
August 2, 2014
विरह. वेदना
Gayatri S Muley
राधेलाच होत्या का फक्त विरहवेणा
तिलाच का होत्या फक्त सांजखुणा
उमटल्या कितीकच वेळा पाऊलखुणा.
पुसट होत गेल्या आत सगळ्या खुणा
भिजेल धरा कधी असेल श्रावण वेळा
बरसेल पुरा , होऊन घन आषाढ निळा
चिंब भिजून संपतील तप्त तप्त झळा
सरतील का उरतील या जीवाच्या कळा.
फुलतील कितीकदा अनवट गंधवेळा
वेणु नादे गुंजतील दिशा ,नी कातर वेळा
सारीपाट मांडलेला बघ परतुनी एक वेळा
अंत:घट अविरत प्यासे ये परतुनी घननीळा
.........गायत्री.....
August 17, 2014
राधेलाच होत्या का फक्त विरहवेणा
तिलाच का होत्या फक्त सांजखुणा
उमटल्या कितीकच वेळा पाऊलखुणा.
पुसट होत गेल्या आत सगळ्या खुणा
भिजेल धरा कधी असेल श्रावण वेळा
बरसेल पुरा , होऊन घन आषाढ निळा
चिंब भिजून संपतील तप्त तप्त झळा
सरतील का उरतील या जीवाच्या कळा.
फुलतील कितीकदा अनवट गंधवेळा
वेणु नादे गुंजतील दिशा ,नी कातर वेळा
सारीपाट मांडलेला बघ परतुनी एक वेळा
अंत:घट अविरत प्यासे ये परतुनी घननीळा
.........गायत्री.....
August 17, 2014
आयुष्या ....
आयुष्या खूप तोलले तू मला आजवर येताजाता
देणे तरीही तू का माझे बरेच अजून बाकी आहे
तुझ्या दारात मंगल तोरण तसेच सळसळ रेशीमाची
जुनेरातली माझ्या अजून जूनीच ऊब बाकी आहे
दारी माझ्या उभी कधीची सांजही झाली आता सरती
खांद्यावरती भार अजूनी उगवतीचा का बाकी आहे
सा-या रात्री संगती तुझ्या लखलखणारे अगणित तारे
डोळ्यामधली ज्योत अजुनही मावळायची बाकी आहे
शब्दाशब्दा मोजुन घेते काल चुकूनी मला दिले तू
कितीक खोटे अन किती खरे हिशोब अजून बाकी आहे
भरभरुन दिले मलाच माझ्या अस्तीत्वाचे पोकळ तुकडे
काहीच नको देवा आता हेच मागणे बाकी आहे......
गायत्री.....
September 9, 2014
देणे तरीही तू का माझे बरेच अजून बाकी आहे
तुझ्या दारात मंगल तोरण तसेच सळसळ रेशीमाची
जुनेरातली माझ्या अजून जूनीच ऊब बाकी आहे
दारी माझ्या उभी कधीची सांजही झाली आता सरती
खांद्यावरती भार अजूनी उगवतीचा का बाकी आहे
सा-या रात्री संगती तुझ्या लखलखणारे अगणित तारे
डोळ्यामधली ज्योत अजुनही मावळायची बाकी आहे
शब्दाशब्दा मोजुन घेते काल चुकूनी मला दिले तू
कितीक खोटे अन किती खरे हिशोब अजून बाकी आहे
भरभरुन दिले मलाच माझ्या अस्तीत्वाचे पोकळ तुकडे
काहीच नको देवा आता हेच मागणे बाकी आहे......
गायत्री.....
September 9, 2014
सोहम ...
Gayatri S Muley
पु न्हा एकदा अंशरुप होऊ दे
.आणि मिसळु दे त्या अगम्य तेजात.
त्याचाच एक बिंदु होऊन.
इतक्या विस्तीर्ण पसा-यातला.
आणि विसरू दे सगळे ..."मीपण"
परत एक फेरा...
आणि एक "कोहम"
एक शब्द प्रवास...आणि पाऊलांचा मेळ
पण आता राखत एक तरी पाऊल जमेच
कश्याला हव्या जखमा ...त्याच जुन्या....
गर्भातली तुटलेली नाळ...
आणि मग जमलेला गोतावळा
कधी देत ......कधी घेत
चालतय पुढे,,,,,,
अरे.!!..आले की समेवर
परतुन त्याच चुकीवर
टाळु दे , सगळे बुध्दीविभ्रम !
आणि दे एक फक्त सखोल श्वास,
एक अनाहत नाद,
आणि एक शांत , शाश्वत सत्य!!
उरू दे मला माझ्यातच निदान
आणि पटु दे
"सोहम....सोहम "
...गायत्री....
September 27, 2014
पु न्हा एकदा अंशरुप होऊ दे
.आणि मिसळु दे त्या अगम्य तेजात.
त्याचाच एक बिंदु होऊन.
इतक्या विस्तीर्ण पसा-यातला.
आणि विसरू दे सगळे ..."मीपण"
परत एक फेरा...
आणि एक "कोहम"
एक शब्द प्रवास...आणि पाऊलांचा मेळ
पण आता राखत एक तरी पाऊल जमेच
कश्याला हव्या जखमा ...त्याच जुन्या....
गर्भातली तुटलेली नाळ...
आणि मग जमलेला गोतावळा
कधी देत ......कधी घेत
चालतय पुढे,,,,,,
अरे.!!..आले की समेवर
परतुन त्याच चुकीवर
टाळु दे , सगळे बुध्दीविभ्रम !
आणि दे एक फक्त सखोल श्वास,
एक अनाहत नाद,
आणि एक शांत , शाश्वत सत्य!!
उरू दे मला माझ्यातच निदान
आणि पटु दे
"सोहम....सोहम "
...गायत्री....
September 27, 2014
जर,,,,
Gayatri S Muley
तुटता तुटता तोडशील जर
निदान दोघे तुटू बरोबर
अंतरावरुन तू हाकेच्या
नकोस घालू घाव मुळावर
खोल खणुन बघ हवे तेवढे
तुला नकोसे असेल काही
नवे बिजांकुर करी स्वत:च्या
नको बाळगू तू नकळतही
चाल समांतर राखुन अंतर
वाट वेगळी नकोस पाहू
ओढ नव्याची असे जुनी पण
पानगळीगत नकोस विखरू
....गायत्री
September 30, 2014
तुटता तुटता तोडशील जर
निदान दोघे तुटू बरोबर
अंतरावरुन तू हाकेच्या
नकोस घालू घाव मुळावर
खोल खणुन बघ हवे तेवढे
तुला नकोसे असेल काही
नवे बिजांकुर करी स्वत:च्या
नको बाळगू तू नकळतही
चाल समांतर राखुन अंतर
वाट वेगळी नकोस पाहू
ओढ नव्याची असे जुनी पण
पानगळीगत नकोस विखरू
....गायत्री
September 30, 2014
Gayatri S Muley
शांततेच्या काठावर .....जाऊन बसल की
एखादा हरवलेला क्षण येतोच
अलवार रुंजी घालत !!
काय काय प्रश्न असतात त्याच्या मनात
उत्तर मागत नाही तो
मी पण त्याला चाळवत नाही
नेतो तो मला एका दूरवरच्या निळ्या ढगांच्या कडेला
आणि माझ अस्तीत्व जाणवल्या गत तो ढग करडा होतो .
...बरसू लागतो
क्षण हळवा चिंब होऊन जातो
मी नेहमीच कोरडी उरलेली??
मला तो हळवा झालेला क्षण आतातरी चिमटीत हळुच धरायचा असतो
कधीतरी उगाच सुटून आज पुढ्यात आला असतो
मग ते करड्या मेघाचे
थेंब उगाचच जाणवतात मला
पापणीच्या तळाशी
त्या क्षणाच्या ओंजळीत..कितीतरी मान टाकलेली स्वप्ने असतात
त्या थेंबात ती तरतरुन येतात
त्याना हळुच कोंब फुटून कळी चे फूल व्हायला लागते
"प्रत्येक फुल सुगंधा साठी नसत ग"
क्षण मला सांगतो
"ह्या स्वप्न फुलाला असच उरू दे तुझ्या माझ्यात. शाबूत!!....."
त्याच्या पाकळ्याना ओझ नको आपल्या श्वासांच
मी पण अलगद सोडते ते फूल
क्षण दिसेनासा होतो ...
एकांताच्या किनारी मी उरली असते
काही निर्माल्य झालेल्या कळ्या घेेऊन
...गायत्री....
October 12, 2014
शांततेच्या काठावर .....जाऊन बसल की
एखादा हरवलेला क्षण येतोच
अलवार रुंजी घालत !!
काय काय प्रश्न असतात त्याच्या मनात
उत्तर मागत नाही तो
मी पण त्याला चाळवत नाही
नेतो तो मला एका दूरवरच्या निळ्या ढगांच्या कडेला
आणि माझ अस्तीत्व जाणवल्या गत तो ढग करडा होतो .
...बरसू लागतो
क्षण हळवा चिंब होऊन जातो
मी नेहमीच कोरडी उरलेली??
मला तो हळवा झालेला क्षण आतातरी चिमटीत हळुच धरायचा असतो
कधीतरी उगाच सुटून आज पुढ्यात आला असतो
मग ते करड्या मेघाचे
थेंब उगाचच जाणवतात मला
पापणीच्या तळाशी
त्या क्षणाच्या ओंजळीत..कितीतरी मान टाकलेली स्वप्ने असतात
त्या थेंबात ती तरतरुन येतात
त्याना हळुच कोंब फुटून कळी चे फूल व्हायला लागते
"प्रत्येक फुल सुगंधा साठी नसत ग"
क्षण मला सांगतो
"ह्या स्वप्न फुलाला असच उरू दे तुझ्या माझ्यात. शाबूत!!....."
त्याच्या पाकळ्याना ओझ नको आपल्या श्वासांच
मी पण अलगद सोडते ते फूल
क्षण दिसेनासा होतो ...
एकांताच्या किनारी मी उरली असते
काही निर्माल्य झालेल्या कळ्या घेेऊन
...गायत्री....
October 12, 2014
संध्याकाळ.....
Gayatri S Muley
अवचीत अवेळी
आयुष्याची संध्याकाळ उभी दारात
आणि दिवस एखाद्या नववधु सारखा चोरटा होतो
मनाच्या कानाकोप-यात दाटलेला संधीप्रकाश
आणि असतात कधी विझलेल्या स्वप्नांच्या तेजाळलेल्या ज्योती.
अंतर्मनात गुंजणारा एक नाद
आणि दुरदेशी गेलेली स्वप्ने
परत परत उतरतात पापणीच्या पन्हाळीला
आणि ओघळतात नकळत एका अनोळखी क्षणाला
कुठे एक वस्त्र काही जुनकट धाग्यांच तरी अवीट
आणि कुठे फाटलेला तरी जरतारी पदर
कुठे सांधलेले मन...आणि कुठे पोरके कोपरे
सजवत असतात परके देव्हारे
एखाद्या
अवचीत...अवेळी आयुष्याच्या संध्याकाळी...
गायत्री.
October 16, 2014
अवचीत अवेळी
आयुष्याची संध्याकाळ उभी दारात
आणि दिवस एखाद्या नववधु सारखा चोरटा होतो
मनाच्या कानाकोप-यात दाटलेला संधीप्रकाश
आणि असतात कधी विझलेल्या स्वप्नांच्या तेजाळलेल्या ज्योती.
अंतर्मनात गुंजणारा एक नाद
आणि दुरदेशी गेलेली स्वप्ने
परत परत उतरतात पापणीच्या पन्हाळीला
आणि ओघळतात नकळत एका अनोळखी क्षणाला
कुठे एक वस्त्र काही जुनकट धाग्यांच तरी अवीट
आणि कुठे फाटलेला तरी जरतारी पदर
कुठे सांधलेले मन...आणि कुठे पोरके कोपरे
सजवत असतात परके देव्हारे
एखाद्या
अवचीत...अवेळी आयुष्याच्या संध्याकाळी...
गायत्री.
October 16, 2014
गजल
Gayatri S Muley
खेळात आज माझ्या मी बाद का कळेना
जिंकून हारण्याचा मज नाद का कळेना
आतून अर्थ परके ओळीत भाव नाही
देऊ खुल्या मनाने मज दाद का कळेना
संपून काल गेले जे आपलेच होते
चालू अजून कैसा हा वाद का कळेना
काहीच सांगण्याला शब्दात जे उरेना
मौनात घातलेली मज साद का कळेना
कित्येक आजवर त्या थापाच ऐकल्या मी
निवडुंग सांगणारी फिर्याद का कळेना
आवाज तोच होता कोणास मी दिलेला
संपून आज गेला संवाद का कळेना
ओघात बोलण्याच्या नाहीच मी तुझ्या रे
आले उगाच तुजला मी याद का कळेना
मौनात काल केली भाषांतरे कश्याला
आला पुढे मनाचा अनुवाद का कळेना
...गायत्री..मुळे
October 31
खेळात आज माझ्या मी बाद का कळेना
जिंकून हारण्याचा मज नाद का कळेना
आतून अर्थ परके ओळीत भाव नाही
देऊ खुल्या मनाने मज दाद का कळेना
संपून काल गेले जे आपलेच होते
चालू अजून कैसा हा वाद का कळेना
काहीच सांगण्याला शब्दात जे उरेना
मौनात घातलेली मज साद का कळेना
कित्येक आजवर त्या थापाच ऐकल्या मी
निवडुंग सांगणारी फिर्याद का कळेना
आवाज तोच होता कोणास मी दिलेला
संपून आज गेला संवाद का कळेना
ओघात बोलण्याच्या नाहीच मी तुझ्या रे
आले उगाच तुजला मी याद का कळेना
मौनात काल केली भाषांतरे कश्याला
आला पुढे मनाचा अनुवाद का कळेना
...गायत्री..मुळे
October 31
Wednesday, June 24, 2015
कर्ज...
Gayatri S Muley
कधी तूच दाखावलेल्या स्वप्नांच
आता तुला कर्ज वाटायला लागलय
चुकते करायची भाषा येतेय
तुला काय वाटत मी येईल रुणझुणत
आणि मोकळे करेल तुला?
कितीच देणे आहेस तू माझे..
हा काही फक्त थोड्या दिवस रात्रींचा प्रश्न नाहीय
सरकता चंद्र
पुर्वेपासून माथ्यावर येताना लाख प्रश्न मला विचारून जातो
त्याचे उत्तर घेऊन ये आता
आणि जाताना...त्या कागदाच्या सगळ्या चिठो-या घेऊन जा.
तुझ्या नावाच्या कवीता असलेल्या
जोडून वाच ते तुकडे..
.अक्षर ओघळले असतील.तिथे अश्रू शोधू नकोस..
.
पुसले नव्हते ना ते पाणी
त्यासोबत वहात गेलेल्या असंख्य आठवणींच्या प्रश्नाना उत्तर दे हवे तर
डोळ्यात स्वप्नही उरले नाही आणि
पाणी ही थांबले नाही
कसल कर्ज चुकवशील रे?
ये ..मी रुणझुणत येईल ..
...गायत्री.....
November 6, 2014
कधी तूच दाखावलेल्या स्वप्नांच
आता तुला कर्ज वाटायला लागलय
चुकते करायची भाषा येतेय
तुला काय वाटत मी येईल रुणझुणत
आणि मोकळे करेल तुला?
कितीच देणे आहेस तू माझे..
हा काही फक्त थोड्या दिवस रात्रींचा प्रश्न नाहीय
सरकता चंद्र
पुर्वेपासून माथ्यावर येताना लाख प्रश्न मला विचारून जातो
त्याचे उत्तर घेऊन ये आता
आणि जाताना...त्या कागदाच्या सगळ्या चिठो-या घेऊन जा.
तुझ्या नावाच्या कवीता असलेल्या
जोडून वाच ते तुकडे..
.अक्षर ओघळले असतील.तिथे अश्रू शोधू नकोस..
.
पुसले नव्हते ना ते पाणी
त्यासोबत वहात गेलेल्या असंख्य आठवणींच्या प्रश्नाना उत्तर दे हवे तर
डोळ्यात स्वप्नही उरले नाही आणि
पाणी ही थांबले नाही
कसल कर्ज चुकवशील रे?
ये ..मी रुणझुणत येईल ..
...गायत्री.....
November 6, 2014
Tuesday, June 23, 2015
....
Gayatri S Muley
खरतर आठवण नाही असे नाहीच
पण विसरही पडला नव्हता
तरी काही विशेष क्षणी
जीव उगाच गोळा वगैरे व्हायचा
आताशा तेच क्षण काळाच्या मुठीतुन निसटतात
परत समोर येऊन उभे ठाकतात
पण गुंतणे असले तरी गुंता का नसतो
हे अताशा मलाच कळेनास होत
परत कधी त्या कवीता
एकदा वाचेल
जिच्या ओळीतुन मी झिरपायची असे मला वाटायचे
नसानसातुन तिच झिरपणे मी अनुभवले होते ना कधी वेड्या गत
काही मला नव्याने उलगडणारे संदर्भ शिल्लक असतील नक्कीच.....
काही काही गोष्टी मुद्दाम विसराव्या लागत होत्या
आता आठवायचा प्रयत्न करुन बघते
तुझेच शब्द मदत करतील कदाचीत.
...........गायत्री...
December 8, 2014
खरतर आठवण नाही असे नाहीच
पण विसरही पडला नव्हता
तरी काही विशेष क्षणी
जीव उगाच गोळा वगैरे व्हायचा
आताशा तेच क्षण काळाच्या मुठीतुन निसटतात
परत समोर येऊन उभे ठाकतात
पण गुंतणे असले तरी गुंता का नसतो
हे अताशा मलाच कळेनास होत
परत कधी त्या कवीता
एकदा वाचेल
जिच्या ओळीतुन मी झिरपायची असे मला वाटायचे
नसानसातुन तिच झिरपणे मी अनुभवले होते ना कधी वेड्या गत
काही मला नव्याने उलगडणारे संदर्भ शिल्लक असतील नक्कीच.....
काही काही गोष्टी मुद्दाम विसराव्या लागत होत्या
आता आठवायचा प्रयत्न करुन बघते
तुझेच शब्द मदत करतील कदाचीत.
...........गायत्री...
December 8, 2014
वळीव सर.
खूप दुष्काळ सोसल्या नंतर.........
एक अवचीत वळीव सर
ना खोल भिजवते
ना आत झिरपते
तरीही कुठेतरी
धरेच्या अंतरंगी
एक कोवळे बिज जपलेले
आठवणीच्या पालापाचोळ्याचे खत
आणि आपसुक अंकुर वर येऊ लागतात .....
कित्येक पावसाळे कोरडेच गेलेले
बिजांकुर आवरणात झाकलेले
एक कुठलेसे अभेद्य कवच
.....
कश्यालाच न जुमानता...
पालवी बाहेर डोकावते
वळीव असला ........
तरी तो तिचा पाऊस असतो
...ती कुठवर फोफावणार...
ना त्या दुष्काळाला माहीती असत...
ना त्या वळीवाला
अवखळ वेलीचे बिज असावे बहुदा
विळखा घालायला आतुरलेले
इतक्या वर्षांच्या दुष्काळाशी
वृक्षाला काही घेण देण का नव्हते ??
भेगाळल्या भुई मधे
मुरत गेलेला तो वळीव पाऊस
धरेच्या तप्त रंध्राना
ना खोल भिजवतो
ना आत झिरपतो
............गायत्री
December 21, 2014
एक अवचीत वळीव सर
ना खोल भिजवते
ना आत झिरपते
तरीही कुठेतरी
धरेच्या अंतरंगी
एक कोवळे बिज जपलेले
आठवणीच्या पालापाचोळ्याचे खत
आणि आपसुक अंकुर वर येऊ लागतात .....
कित्येक पावसाळे कोरडेच गेलेले
बिजांकुर आवरणात झाकलेले
एक कुठलेसे अभेद्य कवच
.....
कश्यालाच न जुमानता...
पालवी बाहेर डोकावते
वळीव असला ........
तरी तो तिचा पाऊस असतो
...ती कुठवर फोफावणार...
ना त्या दुष्काळाला माहीती असत...
ना त्या वळीवाला
अवखळ वेलीचे बिज असावे बहुदा
विळखा घालायला आतुरलेले
इतक्या वर्षांच्या दुष्काळाशी
वृक्षाला काही घेण देण का नव्हते ??
भेगाळल्या भुई मधे
मुरत गेलेला तो वळीव पाऊस
धरेच्या तप्त रंध्राना
ना खोल भिजवतो
ना आत झिरपतो
............गायत्री
December 21, 2014
कालचक्रा......
Gayatri S Muley
..........कालचक्रा......
काल घेऊन गेलास जे
आज पुढ्यात ठाकले
तरीही प्रत्येक व्यथेला
कालचक्रा तुझे दाखले.
कित्येक तुझे गुन्हे मी
आजवर नजरेआड केले
हेच का प्रारब्ध माझे
असावे म्हणुनी हात टेकले
व्ह्यायचेच होते मर्जीने तुझ्या
जे मागे घडुन गेले
तुझ्या गतीने फिरताफिरता
जीव तरी कसे जगले
बहर..असो वा पानगळ
तू दिले .....ते ऋतू सारे झेलले
मोगर्याची आवड असता
निवडुंगही आपसुक बहरले
तुझ्या कृपेने आजवरती
कित्येक प्रलय आले गेले
घट्ट रोवुनी पाय तरीही
सारे उलट प्रवाह झेलले
गतीबध्दता केवळ उरली
कित्येक युगे सरले
गणित तुझे मला न कळले ..
.केवळ एक वर्ष सरले
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
................
................गायत्री............
December 31, 2014
..........कालचक्रा......
काल घेऊन गेलास जे
आज पुढ्यात ठाकले
तरीही प्रत्येक व्यथेला
कालचक्रा तुझे दाखले.
कित्येक तुझे गुन्हे मी
आजवर नजरेआड केले
हेच का प्रारब्ध माझे
असावे म्हणुनी हात टेकले
व्ह्यायचेच होते मर्जीने तुझ्या
जे मागे घडुन गेले
तुझ्या गतीने फिरताफिरता
जीव तरी कसे जगले
बहर..असो वा पानगळ
तू दिले .....ते ऋतू सारे झेलले
मोगर्याची आवड असता
निवडुंगही आपसुक बहरले
तुझ्या कृपेने आजवरती
कित्येक प्रलय आले गेले
घट्ट रोवुनी पाय तरीही
सारे उलट प्रवाह झेलले
गतीबध्दता केवळ उरली
कित्येक युगे सरले
गणित तुझे मला न कळले ..
.केवळ एक वर्ष सरले
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
................
................गायत्री............
December 31, 2014
मी...
Gayatri S Muley
कधी माझ्यातच चांदणे
पूर्ण अवती भोवती दाटलेले
मीच पोर्णिमा
भरती पण मलाच
मीच झेलते लाट अन लाट
कधी तरंगत खालीवर
किनारा गाठायचा
कुठल्यातरी सुखाचा किंवा दुखाचा
फक्त तुझ्याच बरोबर
मीच कधी किर्र रात
काजव्य साठी आसुसलेली
कधी फक्त ओहोटीची खोल ओढ
आत आत ओढलेली
तू अलगद सुटशील
गुंता करून काटेरी
निर्गाठीचा घटट पिळ
फक्त माझ्याकडील टोकावरी
मीच कधी तप्त तप्त,,,मीच कधी तृप्त
झेलते सरीवर सरी
तरी शोधतच फिरते
ओलेपण कुठेतरी
...........................................गायत्री
July 16, 2013
कधी माझ्यातच चांदणे
पूर्ण अवती भोवती दाटलेले
मीच पोर्णिमा
भरती पण मलाच
मीच झेलते लाट अन लाट
कधी तरंगत खालीवर
किनारा गाठायचा
कुठल्यातरी सुखाचा किंवा दुखाचा
फक्त तुझ्याच बरोबर
मीच कधी किर्र रात
काजव्य साठी आसुसलेली
कधी फक्त ओहोटीची खोल ओढ
आत आत ओढलेली
तू अलगद सुटशील
गुंता करून काटेरी
निर्गाठीचा घटट पिळ
फक्त माझ्याकडील टोकावरी
मीच कधी तप्त तप्त,,,मीच कधी तृप्त
झेलते सरीवर सरी
तरी शोधतच फिरते
ओलेपण कुठेतरी
...........................................गायत्री
July 16, 2013
मन...
Gayatri S Muley
..........मन
स्वतःभोवती गिरकी घेत मन दारापर्यंत पोचले
नकळत..
..कितीदातरी
सगळे कड्या कुलूप तोडत
............थबकले तिथेच
कारण तिथेच कधीतरी ते पाऊले उमटणार आहेत
..
.ये असा हळूच....
बघ....दारातली रांगोळी ...
आज जर जास्तच सुबक आहे
पुढे वृंदावनात तुळस हळुवार डोलते आहे
तिथे शांत नंदादीप
शुभम करोतीचा रव आहे
आणि हा कानाकोपरा
जो आसुसला तुला पाहायला
कारण खुपदा तू माझ्याच शब्दात त्यांच्याशी बोलला आहे
हे इथे परसात चाफ्याचे झाड
वेगळ्याच सुगंधाने भारावले आहे
इथला कण आणि कण आज तृप्त होणार आहे
डोळ्यांनी आणि कानांनी
आणि एका नवीनच चांदण्यात न्हाणार आहे
कारण ................
आज इथे ते पाऊले उमटणार आहेत
डोळ्यातला आनंद तूच समजून घेशील
बाहेर ओसंडला नाही तरी
फक्त तुझ्याच मनात मावणारा आहे
फुलपाखराचे निसटते रंग पण
तुझ्याच भोवती भिरभिरत उडणार आहे
लगेच परतीचा बोल मात्र बोलू नको
जीव आताच जर सुखावला आहे
.....................गायत्री.........
July 20, 2013
..........मन
स्वतःभोवती गिरकी घेत मन दारापर्यंत पोचले
नकळत..
..कितीदातरी
सगळे कड्या कुलूप तोडत
............थबकले तिथेच
कारण तिथेच कधीतरी ते पाऊले उमटणार आहेत
..
.ये असा हळूच....
बघ....दारातली रांगोळी ...
आज जर जास्तच सुबक आहे
पुढे वृंदावनात तुळस हळुवार डोलते आहे
तिथे शांत नंदादीप
शुभम करोतीचा रव आहे
आणि हा कानाकोपरा
जो आसुसला तुला पाहायला
कारण खुपदा तू माझ्याच शब्दात त्यांच्याशी बोलला आहे
हे इथे परसात चाफ्याचे झाड
वेगळ्याच सुगंधाने भारावले आहे
इथला कण आणि कण आज तृप्त होणार आहे
डोळ्यांनी आणि कानांनी
आणि एका नवीनच चांदण्यात न्हाणार आहे
कारण ................
आज इथे ते पाऊले उमटणार आहेत
डोळ्यातला आनंद तूच समजून घेशील
बाहेर ओसंडला नाही तरी
फक्त तुझ्याच मनात मावणारा आहे
फुलपाखराचे निसटते रंग पण
तुझ्याच भोवती भिरभिरत उडणार आहे
लगेच परतीचा बोल मात्र बोलू नको
जीव आताच जर सुखावला आहे
.....................गायत्री.........
July 20, 2013
आई.
....आई
सगळेच करतात
तू पण केलंस
पण तू केल ते फक्त तूच केलंस
तू पंख दिलेस
तूच बळ दिल
तूच भरारीच सामर्थ्य दिल
तू शब्द दिले
तू बोल दिले
तू स्वतःच्य मर्यादेबाहेर दिलस
तूच घडवल
तूच उभारलं
तूच पडता पडता चालायला शिकवलं
तुझ घर कायम उन्हात होत
पण आम्हाला सावलीत वाढवलं
तू रात्र रात्र जगली
आमच्या आजची शांत रात्रींसाठी
तू चंदना सारखी झिजली
आजच्या सुगंधासाठी
सगळ्यांना गुरु हि मुली असते
माझी मायच आमची गुरु झाली
................गायत्री
July 22, 2013
सगळेच करतात
तू पण केलंस
पण तू केल ते फक्त तूच केलंस
तू पंख दिलेस
तूच बळ दिल
तूच भरारीच सामर्थ्य दिल
तू शब्द दिले
तू बोल दिले
तू स्वतःच्य मर्यादेबाहेर दिलस
तूच घडवल
तूच उभारलं
तूच पडता पडता चालायला शिकवलं
तुझ घर कायम उन्हात होत
पण आम्हाला सावलीत वाढवलं
तू रात्र रात्र जगली
आमच्या आजची शांत रात्रींसाठी
तू चंदना सारखी झिजली
आजच्या सुगंधासाठी
सगळ्यांना गुरु हि मुली असते
माझी मायच आमची गुरु झाली
................गायत्री
July 22, 2013
सागर-सरीता....
Gayatri S Muley
.....तुझ्याचमुळे......
तू अमाप सागर
मी नुसती ओहोळ
अनिर्बंध ओढ घेवून उरात
निघाली धावत तुझ्याकडे
होऊन सरिता
तू आहे तिथेच आहे
मलाच अनावर वेग , आवेग
सगळं तोडत मोडत निघणारा
तू तिथेच स्तब्ध
तरी भरती ओहोटीच्या उभारीच सुख आणि माघारीच्या वेदना तुला पण कळतात
पोर्णिमा तर म्झ्यापण रात्रीनं असते
पण तुला भारती आणि मला फक्त ओढ असते
ओहोटीला तू माघारतो...पण
मला नाकारता येत नाही माझ तुझ्याकडे येण
मला फक्त धावणेच माहिती
एकाच ध्येयात , तुझ्यापर्यंत यायच्या
तुझ्या उरत साचलेला दुनियाभाराचा खारटपणा
माझी धावण्याची गोडी तुला कळेल का रे?
का फक्त मीलनोत्सुक आहेस????
तुझा अमर्याद , अथांग पसारा
माझा इवला जीव
कुठेही सामावेल तुझ्यात
तुला समजणार पण नाही
तुझ्यातच विरेल तुझा खारटपणा घेऊन
मनाच्या संवादाला दोन जण कुठे हवे?
एक सांगणारे आणि तेच असावे ऐकणारे
आता.....
तुझ्यासोबत भरतीला उंचावेल
ओहोटीला माघारेल
पण मी कुठे असेल
समर्पित
की
विसर्जित....
काढला तर अर्थ
म्हंटले तर नुसते शब्द
नाहीतर केवळ आर्त
अस्तित्व संपवणारे
संपणे आहेच न शेवटी
समर्पण असो वा विसर्जन
माझ्या लेखी सोहोलाच
अंगभर उठलेल्या रोमांचांचा
अनावर उर्मीचा
तू समजू न शकलेल्या ओढीचा
मग काय....
तू तिथेच आहेस
आणि मी तुझ्यात समर्पित
...........गायत्री
July 26, 2013
.....तुझ्याचमुळे......
तू अमाप सागर
मी नुसती ओहोळ
अनिर्बंध ओढ घेवून उरात
निघाली धावत तुझ्याकडे
होऊन सरिता
तू आहे तिथेच आहे
मलाच अनावर वेग , आवेग
सगळं तोडत मोडत निघणारा
तू तिथेच स्तब्ध
तरी भरती ओहोटीच्या उभारीच सुख आणि माघारीच्या वेदना तुला पण कळतात
पोर्णिमा तर म्झ्यापण रात्रीनं असते
पण तुला भारती आणि मला फक्त ओढ असते
ओहोटीला तू माघारतो...पण
मला नाकारता येत नाही माझ तुझ्याकडे येण
मला फक्त धावणेच माहिती
एकाच ध्येयात , तुझ्यापर्यंत यायच्या
तुझ्या उरत साचलेला दुनियाभाराचा खारटपणा
माझी धावण्याची गोडी तुला कळेल का रे?
का फक्त मीलनोत्सुक आहेस????
तुझा अमर्याद , अथांग पसारा
माझा इवला जीव
कुठेही सामावेल तुझ्यात
तुला समजणार पण नाही
तुझ्यातच विरेल तुझा खारटपणा घेऊन
मनाच्या संवादाला दोन जण कुठे हवे?
एक सांगणारे आणि तेच असावे ऐकणारे
आता.....
तुझ्यासोबत भरतीला उंचावेल
ओहोटीला माघारेल
पण मी कुठे असेल
समर्पित
की
विसर्जित....
काढला तर अर्थ
म्हंटले तर नुसते शब्द
नाहीतर केवळ आर्त
अस्तित्व संपवणारे
संपणे आहेच न शेवटी
समर्पण असो वा विसर्जन
माझ्या लेखी सोहोलाच
अंगभर उठलेल्या रोमांचांचा
अनावर उर्मीचा
तू समजू न शकलेल्या ओढीचा
मग काय....
तू तिथेच आहेस
आणि मी तुझ्यात समर्पित
...........गायत्री
July 26, 2013
घरटे...
Gayatri S Muley
घरटे........
सुरेखसे दिवस होते
प्रेमाचे गीत गुंजत होते
भेटले रानात चिमणा चिमणी
बांधले एक सुंदर घरटे
दिवस सुखाचे बहरत होते
वेलीवर फुल उमलत होते
चिमणा चिमणीच्या घरट्यात
चार पिल्ले चिवचिवत होते
आनंदाला भरते होते
दाही दिशांनी सुरक्षित असे
चिमण्याच्या पंखाखाली
उबदारसे घरटे होते
एक दिवस चिमणा गेला
तो परत आलाच नाही
एकट्या चिमणीच्या जीवावर
पिल्ले तिचे चिवचिवत होते
पार खचली चिमणी
पंखामध्ये बळ नव्हते
स्वतःतच उडण्याचे सामर्थ्य नव्हते
आणि पिल्लांना गगनात पाठवायचे होते
एकेक कडी धरून धरून
घरटे जपून ठेवायचे होते
एकेका पिल्लाच्या पंखात
हत्तीचे बळ द्यायचे होते
हळूहळू चिमणी पिल्ले
पंख अपुले पसरवू लागले
अथांग आकाशाच्या खुणांना
हळूच हुंकार देऊ लागले
थरथरली चिमणी आतच
जातील चिमण्या उडून
कसे उरेल घरटे
सुनेसुने त्यांच्या वाचून
तरी दिलेच बळ
उडून जायला पिल्लांना
गेले एकेक उडून
एकटे ठेऊन चिमणीला
आता खूप थकली चिमणी
वाट पाहते असोसून
कधीतरी परततील तिचे
पिल्ले घरट्यात माघारून
वाटते पिल्लांना फार
परतून जावे उबदार घरट्यात
पण इथेही तोच पसारा
आपापल्या चिमण्यांचा चिवचिवाट
.................................गायत्री
July 30, 2013 at
घरटे........
सुरेखसे दिवस होते
प्रेमाचे गीत गुंजत होते
भेटले रानात चिमणा चिमणी
बांधले एक सुंदर घरटे
दिवस सुखाचे बहरत होते
वेलीवर फुल उमलत होते
चिमणा चिमणीच्या घरट्यात
चार पिल्ले चिवचिवत होते
आनंदाला भरते होते
दाही दिशांनी सुरक्षित असे
चिमण्याच्या पंखाखाली
उबदारसे घरटे होते
एक दिवस चिमणा गेला
तो परत आलाच नाही
एकट्या चिमणीच्या जीवावर
पिल्ले तिचे चिवचिवत होते
पार खचली चिमणी
पंखामध्ये बळ नव्हते
स्वतःतच उडण्याचे सामर्थ्य नव्हते
आणि पिल्लांना गगनात पाठवायचे होते
एकेक कडी धरून धरून
घरटे जपून ठेवायचे होते
एकेका पिल्लाच्या पंखात
हत्तीचे बळ द्यायचे होते
हळूहळू चिमणी पिल्ले
पंख अपुले पसरवू लागले
अथांग आकाशाच्या खुणांना
हळूच हुंकार देऊ लागले
थरथरली चिमणी आतच
जातील चिमण्या उडून
कसे उरेल घरटे
सुनेसुने त्यांच्या वाचून
तरी दिलेच बळ
उडून जायला पिल्लांना
गेले एकेक उडून
एकटे ठेऊन चिमणीला
आता खूप थकली चिमणी
वाट पाहते असोसून
कधीतरी परततील तिचे
पिल्ले घरट्यात माघारून
वाटते पिल्लांना फार
परतून जावे उबदार घरट्यात
पण इथेही तोच पसारा
आपापल्या चिमण्यांचा चिवचिवाट
.................................गायत्री
July 30, 2013 at
......
Gayatri S Muley
झर झर मनातले
भाव उतरवावे वाटतात
तेंव्हा शब्द सुद्धा साथ देत नाहीत....
खूप साचलेल असतं आतल्या आत.....
पण सांगता सुद्धा येत नाही
सगळा असतो अंधार दाटलेला
पण काजवा सुद्धा चमकत नाही.....
काळोखाच्या रात्री हवा असतो तेंवा
एक तारासुधा तुटत नाही....
पौर्णिमेची भरती
नसते दोनीही तीराला
कुठेतरी ओहोटी असते
कुणालाच जाणवत नाही
......गायत्री
August 15, 2013
झर झर मनातले
भाव उतरवावे वाटतात
तेंव्हा शब्द सुद्धा साथ देत नाहीत....
खूप साचलेल असतं आतल्या आत.....
पण सांगता सुद्धा येत नाही
सगळा असतो अंधार दाटलेला
पण काजवा सुद्धा चमकत नाही.....
काळोखाच्या रात्री हवा असतो तेंवा
एक तारासुधा तुटत नाही....
पौर्णिमेची भरती
नसते दोनीही तीराला
कुठेतरी ओहोटी असते
कुणालाच जाणवत नाही
......गायत्री
August 15, 2013
अंतर....
अंतर
तुझ्या पायातल्या बेड्यांच ओझ
माझ्या पण खांद्यावर होत
तुला चालणे अवघड झाले
मला झुगारणे अशक्य होत
तू येऊ शकला नाहीस
कधी चार पाऊले पुढे
पण माघार घेताना अशी
ओझ कुठे कमी होत...?
वानवा तुझ्या नशिबी
निखारे माझ्या पदरात
माझ मात्र आयुष्य
उभं पेटलेल रान होत
चल...पाहू येतो का
....सावलीचा सहवास
राखून ठेव अंतर
नको धरू हातात हात
.........गायत्री
August 17, 2013
तुझ्या पायातल्या बेड्यांच ओझ
माझ्या पण खांद्यावर होत
तुला चालणे अवघड झाले
मला झुगारणे अशक्य होत
तू येऊ शकला नाहीस
कधी चार पाऊले पुढे
पण माघार घेताना अशी
ओझ कुठे कमी होत...?
वानवा तुझ्या नशिबी
निखारे माझ्या पदरात
माझ मात्र आयुष्य
उभं पेटलेल रान होत
चल...पाहू येतो का
....सावलीचा सहवास
राखून ठेव अंतर
नको धरू हातात हात
.........गायत्री
August 17, 2013
पुन:र्भेट
Gayatri S Muley
..
पुन्हा एकदा भेट झाली
तिथेच त्या क्षणांची
क्षण होते , मी होते
तरी जागा रिक्तच उरली
काही कणांची
पुन्हा एकदा होता
आठवणींचा वावर
मनाविरुद्ध आले
राज्य माझ्याच मनावर
कुठे सुटकेची तडफड
तर कुठे बंधानासाठी
तडजोड होती
माझ्याच गावाची मला
वाट परकी होती
........गायत्री मुळे
August 23, 2013
..
पुन्हा एकदा भेट झाली
तिथेच त्या क्षणांची
क्षण होते , मी होते
तरी जागा रिक्तच उरली
काही कणांची
पुन्हा एकदा होता
आठवणींचा वावर
मनाविरुद्ध आले
राज्य माझ्याच मनावर
कुठे सुटकेची तडफड
तर कुठे बंधानासाठी
तडजोड होती
माझ्याच गावाची मला
वाट परकी होती
........गायत्री मुळे
August 23, 2013
सख्या.....
Gayatri S Muley
सखा
क्रिष्ण सख्यावर रुसली राधा
हरि प्रेमचि हो उन बाधा
आस असे जरि तुज मिलनाचि
गरज असे त्या दोन तनांचि
गेला मजसि सोडुन का न्हा
का न पाहिले वळुनि पु न्हा
राधा का न आठ्वे तुजला
सांग सख्या रे
जीव व्याकुळला
हसुनि सखा तो का न्हा म्हणाला
एकही पळ न तुझसी विसरु शकला
दूर जाहलि जशी राधीका
सूर विसरली तशी सानिका
अंतर्मन तुझ दिधले ग
जणु का न्हा त मी राधीका
चीर विरहणी मी झाली सख्या रे
केवळ तुझिया नावातच उरली
यमुनेच्या त्या तीरावरती
रास क्रिडा ना पु न्हा रंगली
कधी न पाउले पुन्हा थिरकली
नंद यशोदा डोळ्यतच भिजली
खळखळती यमुनाही थिजली
मुग्ध तुझवीण तुझी मुरली
जशी सुर्याविण अधुरी मेघा
हरी प्रेमाविण अधुरी राधा
म्हणुनी सख्यावर रुसली राधा
हरि प्रेमाची हो उन बाधा
.......गायत्री मुळ्ये
August 28, 2013 at 9:01am
सखा
क्रिष्ण सख्यावर रुसली राधा
हरि प्रेमचि हो उन बाधा
आस असे जरि तुज मिलनाचि
गरज असे त्या दोन तनांचि
गेला मजसि सोडुन का न्हा
का न पाहिले वळुनि पु न्हा
राधा का न आठ्वे तुजला
सांग सख्या रे
जीव व्याकुळला
हसुनि सखा तो का न्हा म्हणाला
एकही पळ न तुझसी विसरु शकला
दूर जाहलि जशी राधीका
सूर विसरली तशी सानिका
अंतर्मन तुझ दिधले ग
जणु का न्हा त मी राधीका
चीर विरहणी मी झाली सख्या रे
केवळ तुझिया नावातच उरली
यमुनेच्या त्या तीरावरती
रास क्रिडा ना पु न्हा रंगली
कधी न पाउले पुन्हा थिरकली
नंद यशोदा डोळ्यतच भिजली
खळखळती यमुनाही थिजली
मुग्ध तुझवीण तुझी मुरली
जशी सुर्याविण अधुरी मेघा
हरी प्रेमाविण अधुरी राधा
म्हणुनी सख्यावर रुसली राधा
हरि प्रेमाची हो उन बाधा
.......गायत्री मुळ्ये
August 28, 2013 at 9:01am
.....
Gayatri S Muley
नात्याला मरण आले की आठवणी जगायला लागतात
आठवणींचे जगणे बंद झाले
की मन मरायला लागत
September 4, 2013
…………………………………………
Gayatri S Muley
तळहातावर असला
तरच आपलासा
नाहीतर नुसताच
भास असतो कवडसा
August 31, 2013
नात्याला मरण आले की आठवणी जगायला लागतात
आठवणींचे जगणे बंद झाले
की मन मरायला लागत
September 4, 2013
…………………………………………
Gayatri S Muley
तळहातावर असला
तरच आपलासा
नाहीतर नुसताच
भास असतो कवडसा
August 31, 2013
घर...उन्हात...
अजुनही
तिथेच होता सुगंध
सुकुनही दरवळत राहिलेला
बकुळ फुलांचा
तिथेच होता वारा उधाणलेला
उसासत एका कडेला
तिथेच होता रंग संध्येचा
थिजुन थाम्बलेला
तिथेच आहे अजुनी मी
सांग सख्या रे
शोधु कुठे तुला
अजुनही रात्र करते
चांदण्यांची बरसात
अजुनही असतो
ओलावा माझ्या तळव्यात
सवंगडी बदलले तरी
राज्य माझ्यावरच
प्रत्येक खेळात
कवडसे तुझ्या वाटेला
घर माझे उ न्हात
..........गायत्री मुळे
....8/9/13
तिथेच होता सुगंध
सुकुनही दरवळत राहिलेला
बकुळ फुलांचा
तिथेच होता वारा उधाणलेला
उसासत एका कडेला
तिथेच होता रंग संध्येचा
थिजुन थाम्बलेला
तिथेच आहे अजुनी मी
सांग सख्या रे
शोधु कुठे तुला
अजुनही रात्र करते
चांदण्यांची बरसात
अजुनही असतो
ओलावा माझ्या तळव्यात
सवंगडी बदलले तरी
राज्य माझ्यावरच
प्रत्येक खेळात
कवडसे तुझ्या वाटेला
घर माझे उ न्हात
..........गायत्री मुळे
....8/9/13
रिंगण.....
Gayatri S Muley
माझ मन घालत असत
तुझ्याच भोवती रिंगण
कळो तुला कधि वा न कळो
असु दे मी गौण किंव्हा नगण्य
तुझ्या साठी माझे असणे
असते अनेकात एकजण
तरि माझ मन जपतच
तुझ्या असण्याचे वेगळेपण
......गायत्री
September 14, 2013
माझ मन घालत असत
तुझ्याच भोवती रिंगण
कळो तुला कधि वा न कळो
असु दे मी गौण किंव्हा नगण्य
तुझ्या साठी माझे असणे
असते अनेकात एकजण
तरि माझ मन जपतच
तुझ्या असण्याचे वेगळेपण
......गायत्री
September 14, 2013
कळी....
Gayatri S Muley
कळी......
आपण स्वतःच अर्थ असतो आपला…
प्रत्येक क्षणी, आपल्या सोबतच जगणारा
अंशा-अंशा ने नविन निर्माण होत जाणारा
वेली वरच्या, नुकत्याच फुलून आलेल्या कळी सारखा
कशी खुडुन टाकायची ती कळी…!!!
निष्पाप…न उमललेली,
दवबिन्दुंचा स्पर्श ही न लाभलेली….
फ़ुलुन येवु दे मला,
स्वतःच्याच साक्षीने
करु दे सगळे जग सुगंधीत,
स्वतःच्या अस्तित्वाने…
गरुड झेप घेता येत नसेल मला…!!!
चिमणीच्या पंखाने उडेन मी
घेवु दे मला झेप…
घालु दे आकाशाला गवसणी
या अथांग विश्वाचे,
ठरवु दे मला क्षितीज
मी होईल तुझा आधार…
वंशाचा दिवा नसेल मी,
पण…पणती होवुन
दूर सारेल मी तुझा अंधार…
आई…कशाला खुडुन टाकतेस मला…!!!
काडी होवुन
आधार नाही होवु शकत मी तुझा
पण हे जीवन…
तुझेच दान आहे…जन्मभराचे
तुझ्या अंशाचे, तुझ्या अस्तित्वाचे…!!!
तुझा कण अन कण भिनलाय माझ्यात…
घेवु दे मला मूर्त रूप,
दिसेल तुला त्यात…तुझेच प्रतिबिंब
करू दे मला निर्माण,
माझेच माझ्यातले "मी" पण…!!!
....गायत्री मुळे
27/09/13
कळी......
आपण स्वतःच अर्थ असतो आपला…
प्रत्येक क्षणी, आपल्या सोबतच जगणारा
अंशा-अंशा ने नविन निर्माण होत जाणारा
वेली वरच्या, नुकत्याच फुलून आलेल्या कळी सारखा
कशी खुडुन टाकायची ती कळी…!!!
निष्पाप…न उमललेली,
दवबिन्दुंचा स्पर्श ही न लाभलेली….
फ़ुलुन येवु दे मला,
स्वतःच्याच साक्षीने
करु दे सगळे जग सुगंधीत,
स्वतःच्या अस्तित्वाने…
गरुड झेप घेता येत नसेल मला…!!!
चिमणीच्या पंखाने उडेन मी
घेवु दे मला झेप…
घालु दे आकाशाला गवसणी
या अथांग विश्वाचे,
ठरवु दे मला क्षितीज
मी होईल तुझा आधार…
वंशाचा दिवा नसेल मी,
पण…पणती होवुन
दूर सारेल मी तुझा अंधार…
आई…कशाला खुडुन टाकतेस मला…!!!
काडी होवुन
आधार नाही होवु शकत मी तुझा
पण हे जीवन…
तुझेच दान आहे…जन्मभराचे
तुझ्या अंशाचे, तुझ्या अस्तित्वाचे…!!!
तुझा कण अन कण भिनलाय माझ्यात…
घेवु दे मला मूर्त रूप,
दिसेल तुला त्यात…तुझेच प्रतिबिंब
करू दे मला निर्माण,
माझेच माझ्यातले "मी" पण…!!!
....गायत्री मुळे
27/09/13
टिचकी...
Gayatri S Muley
..............
सगळ शांत शांत असताना
उगाच खडा पडतो
वरच्या वर तरंग उठतात
आत डोह उसळतो
कुणीही यावे अन
टिचकी मारुन जावे
आपल कोण;परक कोण
मनानी शोधावे
कधी मनाचा खेळ
तर कधी नजरेचा धोका
आतल्या आत जीव
स्वत: शीच परका
कुठेतरी विश्वासावर
विश्वास असतो पक्का
त्याच श्रध्देवर देतो
स्वत:च स्वत:ला धोका
.
खरच असतात का नाती
मनाच्या आत आतले
निश:ब्द हो उन गेले
तरी अव्यक्त शब्दांच्या पलिकडले
....सौ .गायत्री मुळे
01/10/13
..............
सगळ शांत शांत असताना
उगाच खडा पडतो
वरच्या वर तरंग उठतात
आत डोह उसळतो
कुणीही यावे अन
टिचकी मारुन जावे
आपल कोण;परक कोण
मनानी शोधावे
कधी मनाचा खेळ
तर कधी नजरेचा धोका
आतल्या आत जीव
स्वत: शीच परका
कुठेतरी विश्वासावर
विश्वास असतो पक्का
त्याच श्रध्देवर देतो
स्वत:च स्वत:ला धोका
.
खरच असतात का नाती
मनाच्या आत आतले
निश:ब्द हो उन गेले
तरी अव्यक्त शब्दांच्या पलिकडले
....सौ .गायत्री मुळे
01/10/13
Monday, June 22, 2015
स्वप्न ...मनातले.
स्वप्न..मनातले
...
बसल्या बसल्या खुर्चितच
अवघडुन ती झोपलेली
चाहुल लागताच माझी
खडबडुन जागी झाली
अहो..किती वेळ केला
चला आता जेवायला
आठ्वुन मघाच भांडण
ताव अजुनच चढला
तुझ जेवण झाल का
मानभावी प्रश्न केला
तुमच्या आधी कधी जेवली
आठवुन सांगा मला
रागारागात बाहेर जाउन
मित्रांसोबत नाश्ता केला
कस सांगु भुक नाही
प्रश्न पडला त्याला
आवाज देउन बघा
जाग येते का पोराला
बाबा आले की उठव म्हणे
मार्कलीस्ट दाखवायची तुम्हाला
वाट पाहुन थकलेला
चेहरा एवढासा हिरमुसलेला
पाणी डोळ्याच्या कडेला
निजलेला माझा चिमुकला
पटकन गेलो त्याच्याजवळ
केसातुन हात फिरवला
समजेल न समजेलस
तो हळुच उसासला
मघा उगाच केला
विनाकारणच कल्ला
पाहुन दोघांचे चेहरे
जीव आतच गलबलला
चला आता पटकन
बसु आपण जेवायला
एक ताट उचलुन मी
नेउन लावल फळीला
मला पण भुक नाही
जर जेवायच नाही तुम्हाला
हुंदका गळ्यात अडकला
पाणी अडल पापणीला
अग वेडे अस नाही
वाढ एकाच ताटात
भरवु घास एकमेकाना
मी तुला न तु मला
घळघळ धारा डोळ्याला
अन ती लागली मुसमुसायला
जवळ घेउन पुसले डोळे
केसातुन हात फिरवला
बाजुला होत पटकन
चोरट्या नजरेनी पहात पोराला
"काहीतरीच काय तुमच"
चला पटकन जेवायला
बळेबळे जेवलो मी
तरी ती त्रुप्त झाली
मागचा पसरा आवरुन
वाढुन घेतली आपली ताटली
पहिलाच घास घेतला
घशाखाली उतरेना
मीठ नाही अजिबात
सांगितले का नाही मला
तुझ्या डोळ्यातले पाणी
सांडल सगळ भाजीत
मीठाची गरज सम्पली
खुप रुचकर लागली
दिवसभराच विसरुन भांडण
दोघ पण हसली
एकनेकांच्या प्रेमावर
पुन: एकदा विश्वासली.
सौ.गायत्री मुळे
October 5, 2013 at 7:18pm ·
...
बसल्या बसल्या खुर्चितच
अवघडुन ती झोपलेली
चाहुल लागताच माझी
खडबडुन जागी झाली
अहो..किती वेळ केला
चला आता जेवायला
आठ्वुन मघाच भांडण
ताव अजुनच चढला
तुझ जेवण झाल का
मानभावी प्रश्न केला
तुमच्या आधी कधी जेवली
आठवुन सांगा मला
रागारागात बाहेर जाउन
मित्रांसोबत नाश्ता केला
कस सांगु भुक नाही
प्रश्न पडला त्याला
आवाज देउन बघा
जाग येते का पोराला
बाबा आले की उठव म्हणे
मार्कलीस्ट दाखवायची तुम्हाला
वाट पाहुन थकलेला
चेहरा एवढासा हिरमुसलेला
पाणी डोळ्याच्या कडेला
निजलेला माझा चिमुकला
पटकन गेलो त्याच्याजवळ
केसातुन हात फिरवला
समजेल न समजेलस
तो हळुच उसासला
मघा उगाच केला
विनाकारणच कल्ला
पाहुन दोघांचे चेहरे
जीव आतच गलबलला
चला आता पटकन
बसु आपण जेवायला
एक ताट उचलुन मी
नेउन लावल फळीला
मला पण भुक नाही
जर जेवायच नाही तुम्हाला
हुंदका गळ्यात अडकला
पाणी अडल पापणीला
अग वेडे अस नाही
वाढ एकाच ताटात
भरवु घास एकमेकाना
मी तुला न तु मला
घळघळ धारा डोळ्याला
अन ती लागली मुसमुसायला
जवळ घेउन पुसले डोळे
केसातुन हात फिरवला
बाजुला होत पटकन
चोरट्या नजरेनी पहात पोराला
"काहीतरीच काय तुमच"
चला पटकन जेवायला
बळेबळे जेवलो मी
तरी ती त्रुप्त झाली
मागचा पसरा आवरुन
वाढुन घेतली आपली ताटली
पहिलाच घास घेतला
घशाखाली उतरेना
मीठ नाही अजिबात
सांगितले का नाही मला
तुझ्या डोळ्यातले पाणी
सांडल सगळ भाजीत
मीठाची गरज सम्पली
खुप रुचकर लागली
दिवसभराच विसरुन भांडण
दोघ पण हसली
एकनेकांच्या प्रेमावर
पुन: एकदा विश्वासली.
सौ.गायत्री मुळे
October 5, 2013 at 7:18pm ·
.....
तुझ झुकण तिथेच
दू..र क्षितीज सिमेशी
मला कस जमणार
माझ नात मुळांशी
...गायत्री....
October 12, 2013
........
दखल घेतल्या गेली नाही की मन दुखावत
रुक्षपणे घेतल्या गेली की
अहंकार दुखावतो ....
.........
October 9, 2013 at
दू..र क्षितीज सिमेशी
मला कस जमणार
माझ नात मुळांशी
...गायत्री....
October 12, 2013
........
दखल घेतल्या गेली नाही की मन दुखावत
रुक्षपणे घेतल्या गेली की
अहंकार दुखावतो ....
.........
October 9, 2013 at
....
Gayatri S Muley
एकाच अपेक्षेच्या अपेक्षेत
मांडला.जिवाचा खेळ
प्रतिसाद पुन: यातनांचा
आणखी एक वेळ
.......गायत्री.......
October 14, 2013
एकाच अपेक्षेच्या अपेक्षेत
मांडला.जिवाचा खेळ
प्रतिसाद पुन: यातनांचा
आणखी एक वेळ
.......गायत्री.......
October 14, 2013
अभोगी नाते.
Gayatri S Muley
..........
कुठलेही वचन नाही
ना कुठली शपथ
तुझ्या माझ्यातल
औरच नात
कधी भेटिची आस नाही
चार शब्दांची देवाण घेवाण फक्त
आणि दूरवरुन सावरणारे तुझे हात
तुझ्या डोळ्यातले धिराचे भाव
"मी आहे न ग ........
आता फक्त हसायच.......
आणि दूरवर जायच.......
सगळ्या नात्यांच्या पलिकडे....
एक त्रुप्त परंतु
अभोगी आयुष्याच्या वाटेकडे...."
जिथे स्पर्शाला फक्त स्पर्श मनाचा.....
अर्थ असेल न बोललेल्या शब्दांचा
हातात हात धरुन सप्तपदी नाही चालायची
पण थकल्या पावलाना आधाराची साथ द्यायची...
कुठेतरी असतच अस्तित्व...
तु असो किंव्हा नसो...
प्रत्येक धडपडणारा क्षण साम्भाळायला
प्रत्येक अश्रु टिपायला
तुझे बोट होऊन येणारा विश्वास
प्रत्येक हुंदक्याला तुझा हुंकार
दोन हात कपाळावर हळुहळु थोपटणारा
आणि तुझ्याच कुशिची झालेली उशी
तिथे क्षणभर थबकणार..
हळुच स्वत:ला रिते रिते करणार...रोजच
तु पुसतो आसवे.तुझ्या हजार शब्दांच्या हातानी
मी अलगद परतते घरट्यात..
चिमण्या जिवाना बिलगायला
आणि खुप शांत शांत......
उद्याची पहाट उगवणार....
......गायत्री मुळे.......
October 15, 2013 a
t 9:29am
..........
कुठलेही वचन नाही
ना कुठली शपथ
तुझ्या माझ्यातल
औरच नात
कधी भेटिची आस नाही
चार शब्दांची देवाण घेवाण फक्त
आणि दूरवरुन सावरणारे तुझे हात
तुझ्या डोळ्यातले धिराचे भाव
"मी आहे न ग ........
आता फक्त हसायच.......
आणि दूरवर जायच.......
सगळ्या नात्यांच्या पलिकडे....
एक त्रुप्त परंतु
अभोगी आयुष्याच्या वाटेकडे...."
जिथे स्पर्शाला फक्त स्पर्श मनाचा.....
अर्थ असेल न बोललेल्या शब्दांचा
हातात हात धरुन सप्तपदी नाही चालायची
पण थकल्या पावलाना आधाराची साथ द्यायची...
कुठेतरी असतच अस्तित्व...
तु असो किंव्हा नसो...
प्रत्येक धडपडणारा क्षण साम्भाळायला
प्रत्येक अश्रु टिपायला
तुझे बोट होऊन येणारा विश्वास
प्रत्येक हुंदक्याला तुझा हुंकार
दोन हात कपाळावर हळुहळु थोपटणारा
आणि तुझ्याच कुशिची झालेली उशी
तिथे क्षणभर थबकणार..
हळुच स्वत:ला रिते रिते करणार...रोजच
तु पुसतो आसवे.तुझ्या हजार शब्दांच्या हातानी
मी अलगद परतते घरट्यात..
चिमण्या जिवाना बिलगायला
आणि खुप शांत शांत......
उद्याची पहाट उगवणार....
......गायत्री मुळे.......
October 15, 2013 a
t 9:29am
निर्णय...
Gayatri S Muley
......
जिथे मार्ग खुंटतात.
तिथेच वळायच असत
जिथे रस्ते संपतात
तिथेच थांबायच असत.
मागे सुटलेले ठिकाण
आपले कधिच नव्हते
परतुन पुन: तिथे
निवारा शोधायचा नसतो
तिथे असेलच वस्ती
नविन पाखरांची
घरटे असेल परके
तरी नाती विश्वासाची
पुन: तिथे पाऊलखुणा
उमटवायच्या नसतात
एकदा उखडले गेले मुळ
पुन: रुजवायची नसतात.
...गायत्री मुळे....
October 20, 2013 at 9:48pm ·
P
......
जिथे मार्ग खुंटतात.
तिथेच वळायच असत
जिथे रस्ते संपतात
तिथेच थांबायच असत.
मागे सुटलेले ठिकाण
आपले कधिच नव्हते
परतुन पुन: तिथे
निवारा शोधायचा नसतो
तिथे असेलच वस्ती
नविन पाखरांची
घरटे असेल परके
तरी नाती विश्वासाची
पुन: तिथे पाऊलखुणा
उमटवायच्या नसतात
एकदा उखडले गेले मुळ
पुन: रुजवायची नसतात.
...गायत्री मुळे....
October 20, 2013 at 9:48pm ·
P
समरसता.
Gayatri S Muley
........
मी तर समरस पुर्ण
तरी एकरुपता आलिच नाही
सगळे आपसुक घडत गेले
तरी सहजता आलीच नाही
सगळे सरले एका रेषेत
तु त्या किनारी मी या
अंतर कायमच उरलेले
आयुष्य जगलो का कळलेच नाही
...गायत्री मुळे
......
October 25, 2013 at 7:16pm ·
........
मी तर समरस पुर्ण
तरी एकरुपता आलिच नाही
सगळे आपसुक घडत गेले
तरी सहजता आलीच नाही
सगळे सरले एका रेषेत
तु त्या किनारी मी या
अंतर कायमच उरलेले
आयुष्य जगलो का कळलेच नाही
...गायत्री मुळे
......
October 25, 2013 at 7:16pm ·
अजून....
Gayatri S Muley
....... अजुन.....
किती युगांचे साचलेले डोह असतात
त्याचा जेमतेम तळ गाठते
आणि तुझा प्रश्न.
...अजुन....
डोळ्यांच्या निरांजनी जरा तेजाळतात
जरा कुठे तिमीर सरतो
आणि तुझा प्रश्न
......अजुन.....
आत्ता आत्ता निवडुंगाला बहर येतो
जरा कुठे काट्याना झाकतो
आणि तुझा प्रश्न
.....अजुन.....
नुकतीच शब्दांची बांधाबांध होते
जरा कुठे संवाद सुरु होतो
आणि तुझा प्रश्न
.....अजुन...
घुसमटुन हुंदका आतच असतो
जरा कुठे पापणीला ओलावा येतो
आणि तुझा प्रश्न
......अजुन.....
म्हंटल तर काहीच नाही
म्हणशील तर खुप काही
जरा कुठे अर्थ येतो.
आणि तुझा प्रश्न.
.....अजुन.....
बाहेर फुटु पहाणार आवर्त.
जरा कुठे आत खेचते.
आणि तुझा प्रश्न.
.....अजुन....बाकी....?
गायत्री मुळे.......
30/10/13
October 30, 2013 at 1:38pm ·
....... अजुन.....
किती युगांचे साचलेले डोह असतात
त्याचा जेमतेम तळ गाठते
आणि तुझा प्रश्न.
...अजुन....
डोळ्यांच्या निरांजनी जरा तेजाळतात
जरा कुठे तिमीर सरतो
आणि तुझा प्रश्न
......अजुन.....
आत्ता आत्ता निवडुंगाला बहर येतो
जरा कुठे काट्याना झाकतो
आणि तुझा प्रश्न
.....अजुन.....
नुकतीच शब्दांची बांधाबांध होते
जरा कुठे संवाद सुरु होतो
आणि तुझा प्रश्न
.....अजुन...
घुसमटुन हुंदका आतच असतो
जरा कुठे पापणीला ओलावा येतो
आणि तुझा प्रश्न
......अजुन.....
म्हंटल तर काहीच नाही
म्हणशील तर खुप काही
जरा कुठे अर्थ येतो.
आणि तुझा प्रश्न.
.....अजुन.....
बाहेर फुटु पहाणार आवर्त.
जरा कुठे आत खेचते.
आणि तुझा प्रश्न.
.....अजुन....बाकी....?
गायत्री मुळे.......
30/10/13
October 30, 2013 at 1:38pm ·
....
Gayatri S Muley
...........
नेहमीचच हे सगळ.
नेहमीच समर्थन
कधी मलाही विचारुन बघ
काय म्हणत तुझ मन.
...गायत्री
...........
नेहमीचच हे सगळ.
नेहमीच समर्थन
कधी मलाही विचारुन बघ
काय म्हणत तुझ मन.
...गायत्री
तू...
Gayatri S Muley
......तुच....
नेहमीच असतो माझा गुंता
कधी काटेरी कधी मोहक
त्या गुंत्यात गुंतलेली मी
आणि तुझी साथ आश्वासक
तगमग असते माझी
घालमेल तुझ्या मनात
तु पण तितकीच गुंतलेली
नकळत माझ्या गुंत्यात
अलगदच खुबीने
सोडवतेस गाठी
उरत नाही पिळ
गाठिच्याही गाठी
ना तोडतेस कधी
ना तोडु देतेस
सगळ्या जाणिवांच्या पलिकडे
तुझे माझे नाते
...गायत्री मुळे ...
November 11, 2013 at 10:19am
......तुच....
नेहमीच असतो माझा गुंता
कधी काटेरी कधी मोहक
त्या गुंत्यात गुंतलेली मी
आणि तुझी साथ आश्वासक
तगमग असते माझी
घालमेल तुझ्या मनात
तु पण तितकीच गुंतलेली
नकळत माझ्या गुंत्यात
अलगदच खुबीने
सोडवतेस गाठी
उरत नाही पिळ
गाठिच्याही गाठी
ना तोडतेस कधी
ना तोडु देतेस
सगळ्या जाणिवांच्या पलिकडे
तुझे माझे नाते
...गायत्री मुळे ...
November 11, 2013 at 10:19am
सवय
Gayatri S Muley
............
तुला हिरवळीची सवय
मला उन आवडणार
एक रस्ता सावलीचा
एक माझ्याकडे येणार
....गायत्री......
November 13, 2013 at 6:02pm ·
............
तुला हिरवळीची सवय
मला उन आवडणार
एक रस्ता सावलीचा
एक माझ्याकडे येणार
....गायत्री......
November 13, 2013 at 6:02pm ·
नव वर्षाभीनंदन.
Gayatri S Muley
..........
किती धावशील कालचक्रा
नाही तुला तोड
अजुन काहीच सरले नाही
दिले सगळेच अजोड.
.
.
.
December 31, 2013 at 7:43pm ·
..........
किती धावशील कालचक्रा
नाही तुला तोड
अजुन काहीच सरले नाही
दिले सगळेच अजोड.
.
.
.
December 31, 2013 at 7:43pm ·
उद्या.....
Gayatri S Muley
..........
मी उद्या नक्कीच झळालेल
आजची कात झुगारुनी
लखलखेन पुर्ण तेजाने
विद्युलता होऊनी क्रुष्ण मेघी
आज जरी मी विध्द
अन घायाळ पक्षिणी
घे ईलच भरारी
अन घालेल गगनाला गवसणी.
कवेत असेल आसमान
आणि असेल दिव्य द्रुष्टी
होऊनी स्वयंसिध्धा
दिपवेल पुर्ण स्रुष्टी
जरी आज कंठ रुध्द
उद्या गाईन मी भुपाळी
संपवुन मैफील तु
छेडली जरी अवेळी भैरवी
समांतर का असेना
असेल एकच आपले शिखर
अथांग पसरलेल क्षितिज
अन एका अवकाशाच अंतर
जरी तु चिरंतन
मी ही असेल निरंतर
तुलाच नकोसे होईल
कधी तरी हे जन्मांतर
सुटेलच ग्रहण
संपेलच काळोख
अनंत वर्तुळाचा
कायमच परीघ
मी येईन अशीच
किलबिलत अन
प्राजक्त सडा शिम्पत
एक सुगंधी
केशरी पहाट होऊन
...गायत्री मुळे
December 26, 2013 at 8:59pm
..........
मी उद्या नक्कीच झळालेल
आजची कात झुगारुनी
लखलखेन पुर्ण तेजाने
विद्युलता होऊनी क्रुष्ण मेघी
आज जरी मी विध्द
अन घायाळ पक्षिणी
घे ईलच भरारी
अन घालेल गगनाला गवसणी.
कवेत असेल आसमान
आणि असेल दिव्य द्रुष्टी
होऊनी स्वयंसिध्धा
दिपवेल पुर्ण स्रुष्टी
जरी आज कंठ रुध्द
उद्या गाईन मी भुपाळी
संपवुन मैफील तु
छेडली जरी अवेळी भैरवी
समांतर का असेना
असेल एकच आपले शिखर
अथांग पसरलेल क्षितिज
अन एका अवकाशाच अंतर
जरी तु चिरंतन
मी ही असेल निरंतर
तुलाच नकोसे होईल
कधी तरी हे जन्मांतर
सुटेलच ग्रहण
संपेलच काळोख
अनंत वर्तुळाचा
कायमच परीघ
मी येईन अशीच
किलबिलत अन
प्राजक्त सडा शिम्पत
एक सुगंधी
केशरी पहाट होऊन
...गायत्री मुळे
December 26, 2013 at 8:59pm
कडेलोट.
Gayatri S Muley
........कडेलोट...
कड्यावरुन कोसळताना दिसतात
चेहरे अनेक मुखवटे अनेक
किती तसेच उभे असतात
हिरमुसुन क्षणैक
दिसतात काही हसवे
आणि असतात काही फसवे
कोसळतच जातो आतल्या आत
उन्मळत स्वत:च्या नकळत
कुठे मिळेल एकच आधार
जो आवरेल अधोगतिची गती
आणि रसातळाला जाणारी स्थिती
दिसतात बेगडी किती
धरायला येणारे हात
आणि दूर दूर असतात
सावरणारे साक्षात
दिसतात काही हळहळणारे
कोसळल्यावर चटकन वळणारे
आणि दुसर्या किनारी स्थिरावणारे
सापडतो कुठेतरी फक्त
एखादा तुकडा अर्धामुर्धा
जो नसतोच कधी आपला
फक्त ओरबाडत जाऊन
जखमा देणारा ठसठसणार्या
कित्येक पडतात ओरखडे
रक्तबंबाळ आणि कायमचे
आणि संपतच नाहीत
क्षण कधी कडेलोटाचे.
...सौ.गायत्री मुळे ..
December 18, 2013 at 8:41pm
........कडेलोट...
कड्यावरुन कोसळताना दिसतात
चेहरे अनेक मुखवटे अनेक
किती तसेच उभे असतात
हिरमुसुन क्षणैक
दिसतात काही हसवे
आणि असतात काही फसवे
कोसळतच जातो आतल्या आत
उन्मळत स्वत:च्या नकळत
कुठे मिळेल एकच आधार
जो आवरेल अधोगतिची गती
आणि रसातळाला जाणारी स्थिती
दिसतात बेगडी किती
धरायला येणारे हात
आणि दूर दूर असतात
सावरणारे साक्षात
दिसतात काही हळहळणारे
कोसळल्यावर चटकन वळणारे
आणि दुसर्या किनारी स्थिरावणारे
सापडतो कुठेतरी फक्त
एखादा तुकडा अर्धामुर्धा
जो नसतोच कधी आपला
फक्त ओरबाडत जाऊन
जखमा देणारा ठसठसणार्या
कित्येक पडतात ओरखडे
रक्तबंबाळ आणि कायमचे
आणि संपतच नाहीत
क्षण कधी कडेलोटाचे.
...सौ.गायत्री मुळे ..
December 18, 2013 at 8:41pm
बहाणे.
Gayatri S Muley
..........
कशाला शोधलेस बहाणे
अटळच होते दुरावणे
माझी पाऊलवाट छोटी
तुझे राजमार्गाने जाणे
माझाच हट्ट होता
तुझ्या रंगात रंगणे
माझ्यातल्या तुझ्यात विरुन
माझे कुठे न उरणे
गेले नवीन विणायला
उरले हाती उसवणे
कुठे सुटले टाके
आणि संपले विणणे
दैन्य माझेच मला
खुणावते दिनपणे
कसा संपेल तिमीर
एकट्या शुक्र चांदणीने
कसे संपतील रस्ते
कुठल्या क्षितीज सीमेने
क्षीण धड्पड पाखारांची
उष:कालाच्या दिशेने
सौ.गायत्री मुळे....
December 10, 2013 at 7:42pm
..........
कशाला शोधलेस बहाणे
अटळच होते दुरावणे
माझी पाऊलवाट छोटी
तुझे राजमार्गाने जाणे
माझाच हट्ट होता
तुझ्या रंगात रंगणे
माझ्यातल्या तुझ्यात विरुन
माझे कुठे न उरणे
गेले नवीन विणायला
उरले हाती उसवणे
कुठे सुटले टाके
आणि संपले विणणे
दैन्य माझेच मला
खुणावते दिनपणे
कसा संपेल तिमीर
एकट्या शुक्र चांदणीने
कसे संपतील रस्ते
कुठल्या क्षितीज सीमेने
क्षीण धड्पड पाखारांची
उष:कालाच्या दिशेने
सौ.गायत्री मुळे....
December 10, 2013 at 7:42pm
कोसळ....
Gayatri S Muley
.....
..सुखाच कोसळणे माहीत नाहे
इथे दु:खचाच बारमाही बहर होता
किती झेलले घाव आठवत नाही
जणु काही हा शेवटचा वार होता
शांत शांत हवा होता तळ मनाचा
पण सतत आठवणींचा जागर होता
गदागदा हलवले ढग तरी
पाण्याचा थेंब नाही
हा नशीबाच्या कोरडेपणाचा कहर होता...
...
गायत्री मुळे......
..
December 3, 2013 at 8:14pm ·
.....
..सुखाच कोसळणे माहीत नाहे
इथे दु:खचाच बारमाही बहर होता
किती झेलले घाव आठवत नाही
जणु काही हा शेवटचा वार होता
शांत शांत हवा होता तळ मनाचा
पण सतत आठवणींचा जागर होता
गदागदा हलवले ढग तरी
पाण्याचा थेंब नाही
हा नशीबाच्या कोरडेपणाचा कहर होता...
...
गायत्री मुळे......
..
December 3, 2013 at 8:14pm ·
दान.
Gayatri S Muley
......
मनासारखे दान कधीतरी मिळेल
म्हणुन पदर पसरला
ग्रहणाचे वेध संपले
आणि रिक्तच उरला.
....गायत्री......
......
मनासारखे दान कधीतरी मिळेल
म्हणुन पदर पसरला
ग्रहणाचे वेध संपले
आणि रिक्तच उरला.
....गायत्री......
शब्दातीत मौन.
नसशील कधी तु
जेंव्हा गीतात माझ्या
शब्दातीत मौन
ओठी उरेल माझ्या
हे शब्दबाण कसे
जखमी करी जीवाला
काहुर मनात उठले
ह्या सरत्या सांजेला
मन चिम्ब भिजलेले.
आसवात माझ्या
शब्दातीत मौन
ओठी उरेल माझ्या
गीतात शब्द माझे
अन खचीतच अर्थ तुझा
नसेल कधी दिला मी
हातात हात तुझ्या
तरी स्पर्शीत अबोल
शब्दात सदैव माझ्या
शब्दातीत मौन
ओठी उरेल माझ्या.
....गायत्री मुळे......
November 24, 2013 at 8:37pm
जेंव्हा गीतात माझ्या
शब्दातीत मौन
ओठी उरेल माझ्या
हे शब्दबाण कसे
जखमी करी जीवाला
काहुर मनात उठले
ह्या सरत्या सांजेला
मन चिम्ब भिजलेले.
आसवात माझ्या
शब्दातीत मौन
ओठी उरेल माझ्या
गीतात शब्द माझे
अन खचीतच अर्थ तुझा
नसेल कधी दिला मी
हातात हात तुझ्या
तरी स्पर्शीत अबोल
शब्दात सदैव माझ्या
शब्दातीत मौन
ओठी उरेल माझ्या.
....गायत्री मुळे......
November 24, 2013 at 8:37pm
पाठलाग
पाठलाग.....
थांब ना एकच क्षणभर
बघ वळुन एखाद्या वळणावर
पाऊले उमटलीत का तुझी
की ठसे माझ्या पाऊलांचे त्यावर....
कसा वेग मला इतका साधणार
कुठ्ल्या आवेगाने मी तुला गाठणार.....
तुझे पुढे जाणे आणि माझे मागे असणे
अव्याहत असेच सरकणार
तिथे बघ आहे थोडी सावली
तिथे तु विसावणार
अंतर राखुन चालताना
उन मलाच लाभणार
वेग तुझा जास्त
दमछाक माझीच होणार
बघुन चल अडथळे
ठेच नक्की लागणार
कधी रस्ता खडकाळ
कधी जाणार थेट
पण तरी हे अंतर
तुझ्या माझ्यात उरणार....
....सौ गायत्री मुळे.....
November 21, 2013 at 4:45pm
थांब ना एकच क्षणभर
बघ वळुन एखाद्या वळणावर
पाऊले उमटलीत का तुझी
की ठसे माझ्या पाऊलांचे त्यावर....
कसा वेग मला इतका साधणार
कुठ्ल्या आवेगाने मी तुला गाठणार.....
तुझे पुढे जाणे आणि माझे मागे असणे
अव्याहत असेच सरकणार
तिथे बघ आहे थोडी सावली
तिथे तु विसावणार
अंतर राखुन चालताना
उन मलाच लाभणार
वेग तुझा जास्त
दमछाक माझीच होणार
बघुन चल अडथळे
ठेच नक्की लागणार
कधी रस्ता खडकाळ
कधी जाणार थेट
पण तरी हे अंतर
तुझ्या माझ्यात उरणार....
....सौ गायत्री मुळे.....
November 21, 2013 at 4:45pm
एकरुपता.
Gayatri S Muley
......
आपल दु:ख एकजात होत
एकमेकांच्या डोळ्यातुन पाझरत होत
सुगंध होता सगळा रेशिमकाठी
पिंजुन उरल्या कापसाच्या गाठी
तरी आत आत तोडत जात
उरलेल दुराव्याच नात
.....गायत्री.....
November 18, 2013 at 10:17pm ·
......
आपल दु:ख एकजात होत
एकमेकांच्या डोळ्यातुन पाझरत होत
सुगंध होता सगळा रेशिमकाठी
पिंजुन उरल्या कापसाच्या गाठी
तरी आत आत तोडत जात
उरलेल दुराव्याच नात
.....गायत्री.....
November 18, 2013 at 10:17pm ·
Saturday, June 20, 2015
अगतीक.
भाग्य अस्ता पावले रे
डाव तेथे साधले रे
हाय केली काय दैना
चक्र शापे गाडले रे .
शुध्द होता भाव तिचा
सुर्य पुत्रा त्यागले रे
माय ज्याची राजमाता
दूध त्याला टाळले रे
दूर गेली आस साधी
शस्त्र जागी टाकले रे
घाव देते तेथ झाले
तेच माझे आपले रे
दान द्यावे काय आता
जन्म माझा संपला रे
जन्म दात्री पांडवांची
व्यर्थ डोळे गाळले रे
वस्त्र देशी द्रौपदीला
दैव माझे कोपले रे
रक्त झाले आज वैरी
काय कृष्णा साधले रे
खेळ झाला धर्मक्षेत्री
धर्म ग्लानी काढताना
वंश झाले नष्ट सारे
काय कृष्णा साधले रे
.
गायत्री...
डाव तेथे साधले रे
हाय केली काय दैना
चक्र शापे गाडले रे .
शुध्द होता भाव तिचा
सुर्य पुत्रा त्यागले रे
माय ज्याची राजमाता
दूध त्याला टाळले रे
दूर गेली आस साधी
शस्त्र जागी टाकले रे
घाव देते तेथ झाले
तेच माझे आपले रे
दान द्यावे काय आता
जन्म माझा संपला रे
जन्म दात्री पांडवांची
व्यर्थ डोळे गाळले रे
वस्त्र देशी द्रौपदीला
दैव माझे कोपले रे
रक्त झाले आज वैरी
काय कृष्णा साधले रे
खेळ झाला धर्मक्षेत्री
धर्म ग्लानी काढताना
वंश झाले नष्ट सारे
काय कृष्णा साधले रे
.
गायत्री...
Friday, June 19, 2015
तू.मी,ही,ती
तू ...मी ..ती ही.
प्रत्येकजण ..
.एकाच ..वळणावर वळणार्या...
एक आसुसलेल .तरी शांत
अस्तीत्व घेऊन मिरवणार्या
एकेक शृंखला ...सोनेरी....सोन्याची
चौकटींची मांडणी
खिडक्या तेवढ्या तुझ्या माझ्या घराला
आणि एक तुकडा आकाशाचा
त्यातून डोकावणारा आपल्या वाटेला
चिरेबंदी भिंतीना दरवाजे नाहीत
कुलूपे आहेत पण कड्या कोयंडे नाहीत
धरू पहाशील आकाश कवेत?
निखार्यानी भरेल ओटी पदरात
.पावलांवर नक्षी मेंदीची
हाताला सवय कांकणांची
भाळावर मिरव चंद्र भला मोठा
पाऊस येईल मोठा..कारण तुझा पैसा खोटा
तू .मी ही ती...
एकाच परीघातील नाती
ना तुला ना मला ना हिला ना तिला
सुटल्या जगाच्या रिती
ठेव जपून एक अस्तीत्व अनाघ्रात
फोफावू दे तुझी तुळस
बदलव मनाची माती
आकाश तुझे मुठीतले घे कवेत त्या गजांमधून
उरू दे मुळाशी
बेगड्या शृंखलांची नाती
...गायत्री....
प्रत्येकजण ..
.एकाच ..वळणावर वळणार्या...
एक आसुसलेल .तरी शांत
अस्तीत्व घेऊन मिरवणार्या
एकेक शृंखला ...सोनेरी....सोन्याची
चौकटींची मांडणी
खिडक्या तेवढ्या तुझ्या माझ्या घराला
आणि एक तुकडा आकाशाचा
त्यातून डोकावणारा आपल्या वाटेला
चिरेबंदी भिंतीना दरवाजे नाहीत
कुलूपे आहेत पण कड्या कोयंडे नाहीत
धरू पहाशील आकाश कवेत?
निखार्यानी भरेल ओटी पदरात
.पावलांवर नक्षी मेंदीची
हाताला सवय कांकणांची
भाळावर मिरव चंद्र भला मोठा
पाऊस येईल मोठा..कारण तुझा पैसा खोटा
तू .मी ही ती...
एकाच परीघातील नाती
ना तुला ना मला ना हिला ना तिला
सुटल्या जगाच्या रिती
ठेव जपून एक अस्तीत्व अनाघ्रात
फोफावू दे तुझी तुळस
बदलव मनाची माती
आकाश तुझे मुठीतले घे कवेत त्या गजांमधून
उरू दे मुळाशी
बेगड्या शृंखलांची नाती
...गायत्री....
मनाचा तळ
प्रत्येक मनाच्या तळाशी
गाळ बसलेलाच असतो
वर वर स्वच्छ दिसणारे पाणि
ढवळले की गढूळ होणारच असत
त्या गाळात हमखास असत
एक गाठोड आठवणींचे
तेंव्हा गोड असले तरी
गाळात रुतून कडवट झालेल्या
सुखाची चव नासवणार्या आठवणी
त्याला जंग ही लागत नाही
प्रत्येक वेळेस झळाळूनच येतात त्या
त्य गाळाशी बसला असतो एक हुंदका..
कधीच बाहेर न येऊ शकलेला
एक स्वप्न असत
जे चिरनिद्रे साठी थांबलेले असते
कारण त्याला ........
जन्मांतराची वेस घालून दिलेली असते ....
गाठोड बांधून फेकताना...
गाळ बसलेलाच असतो
वर वर स्वच्छ दिसणारे पाणि
ढवळले की गढूळ होणारच असत
त्या गाळात हमखास असत
एक गाठोड आठवणींचे
तेंव्हा गोड असले तरी
गाळात रुतून कडवट झालेल्या
सुखाची चव नासवणार्या आठवणी
त्याला जंग ही लागत नाही
प्रत्येक वेळेस झळाळूनच येतात त्या
त्य गाळाशी बसला असतो एक हुंदका..
कधीच बाहेर न येऊ शकलेला
एक स्वप्न असत
जे चिरनिद्रे साठी थांबलेले असते
कारण त्याला ........
जन्मांतराची वेस घालून दिलेली असते ....
गाठोड बांधून फेकताना...
आणि खळखळून फुटलले एक हसू
ते तर पार सगळ्यात खाली
त्या गाठोड्यातून निघून
गाळात रुतून बसलेले
एखादे वाढदिवासाचे
पिवळे पडलेले ग्रीटिंग
एखादे शब्द हरवलेले पत्र
आणि .........
पोकळी असलेले मन
त्या पोकळीतून निघालेले आयुष्य
हलके असते प्रेतासारखे....
म्हणून गाळात रुतून न बसता
तरंगत वर येत...
अलगद पोहून शेवटी
किनारा गाठत.....
किना-यावर वाळूत
मनोरे बांधायला लागत.
टिकून रहात
वादळ वारे उन पाऊस झेलत
मग एक निवांत क्षण
रुतून बसत परत त्या गाळात
प्रत्येक आयुष्याला
एक गाठोड का बांधाव लागत?
आणि ते मनाच्या तळात
का फेकून द्यावे लागतय?
प्रत्येक मनाच्या तळाला
एक गाळ का साचलेला असतो ?
...गायत्री
Subscribe to:
Comments (Atom)