Gayatri S Muley
..........
कशाला शोधलेस बहाणे
अटळच होते दुरावणे
माझी पाऊलवाट छोटी
तुझे राजमार्गाने जाणे
माझाच हट्ट होता
तुझ्या रंगात रंगणे
माझ्यातल्या तुझ्यात विरुन
माझे कुठे न उरणे
गेले नवीन विणायला
उरले हाती उसवणे
कुठे सुटले टाके
आणि संपले विणणे
दैन्य माझेच मला
खुणावते दिनपणे
कसा संपेल तिमीर
एकट्या शुक्र चांदणीने
कसे संपतील रस्ते
कुठल्या क्षितीज सीमेने
क्षीण धड्पड पाखारांची
उष:कालाच्या दिशेने
सौ.गायत्री मुळे....
December 10, 2013 at 7:42pm
..........
कशाला शोधलेस बहाणे
अटळच होते दुरावणे
माझी पाऊलवाट छोटी
तुझे राजमार्गाने जाणे
माझाच हट्ट होता
तुझ्या रंगात रंगणे
माझ्यातल्या तुझ्यात विरुन
माझे कुठे न उरणे
गेले नवीन विणायला
उरले हाती उसवणे
कुठे सुटले टाके
आणि संपले विणणे
दैन्य माझेच मला
खुणावते दिनपणे
कसा संपेल तिमीर
एकट्या शुक्र चांदणीने
कसे संपतील रस्ते
कुठल्या क्षितीज सीमेने
क्षीण धड्पड पाखारांची
उष:कालाच्या दिशेने
सौ.गायत्री मुळे....
December 10, 2013 at 7:42pm
No comments:
Post a Comment