Saturday, June 20, 2015

अगतीक.

भाग्य  अस्ता पावले  रे
डाव तेथे साधले  रे
हाय केली काय दैना
चक्र शापे गाडले  रे .

शुध्द होता भाव तिचा
सुर्य पुत्रा त्यागले रे
माय ज्याची  राजमाता
दूध त्याला टाळले रे

दूर गेली आस साधी
शस्त्र जागी टाकले रे
घाव देते तेथ झाले
तेच माझे आपले रे

दान द्यावे काय आता
जन्म माझा संपला रे
जन्म दात्री पांडवांची
व्यर्थ डोळे गाळले रे

वस्त्र देशी द्रौपदीला
दैव माझे कोपले रे
रक्त झाले आज वैरी
काय कृष्णा साधले रे

खेळ झाला धर्मक्षेत्री
धर्म ग्लानी काढताना
वंश झाले नष्ट सारे
काय कृष्णा साधले रे
.
गायत्री...

No comments:

Post a Comment