Edit · Delete
Gayatri S Muley
त्या दोघी..........
ऑफीस मधून परतताना अंधारल्या सारखे झाले दिवस इतक्यात लौकर मावळायला लागला होता.हवेत थोडा थंडावा सुध्दा आला होता.तसही दिवसभर एका खुर्चीत टेबल पुढे एका जागी बसून तिचे शरीर आंबल्या सारखे झाले होते.पाय अकडले होते.फक्त काही entries समजल्या नाही तर तिथून उठून साहेबाच्या केबीन पर्यंत 4 पावले चालणे इतकेच काय ती खुर्चीतून उठायची.दुपारी साहेब जेवायला घरी जायचे.त्यानी तिलाही म्हणले होते की तुला जायचे असल्यास तू जाऊ शकतेस.आणि एका तासात परत येवू शकतेस...सायकलने 5/7 मिनीटाचे अंतर होते ऑफीस ते घर.
पण एकतर घरी जाण्याची ओढ तिला वाटत नव्हती आणि मुख्य म्हणजे बॉस नसायाचा तो एक तास तिने गिरीशला फोन साठी दिला होता.त्याचा फोन येईल ह्या आशेने खुर्चीला खिळून बसायची.कितीच दुपारी अश्या ताटकळत वाट पहाण्यात गेल्या होत्या.हळू हळू दिवसागणीक ती निराश होत चालली होती.दुपार नंतर मग तिचे कामात लक्ष लागत नसे...चुका व्ह्यायच्या बॉस तसा शांत समंजस होता...लक्ष नसेल लागत तर चुका करण्यापेक्षा तुम्ही घरी जा असे त्याने तिला एकदोनदा सुचविले.त्यानंतर ती कसोशीने गिरीशचे विचार टाळायला लागली.
आज घरी जाताना त्याच्या मित्राकडे चौकशी करायची हे तिने मनाशी ठरविले.त्याच विचाराच्या तंद्रीत मित्राच्य दुकानापुढे येऊन उभी झाली.पण त्याला आत जाऊन काय विचारावे हे तिला सुचेना.उगाचच पायतले बळ गेल्या सारखे झाले.घश्याला कोरड पडली.ती घुटमळली...आणि जाऊ दे नको आत जायला ह्या विचाराने निघायला लागली तितक्यात दार उघडून गिरीशचा मित्र बाहेर आला.तिच्याकडे पाहून हसला.तिला लाजल्या सारखे झाले.उगाचच इथे रेंगाळलो असे वाटायला लागले.तोच स्वत: तिच्या जवळ आला."कशी आहेस?फोन नाही न आला गिरीशचा?"
ह्या प्रश्नाने तिच्या घश्यात आवंढा दाटला.
"हं . तुला आला का ?आला तर त्याला सांग मला फोन कर.मी वाट पहातेय ."
तिच्याकडे पहात तो फक्त हो म्हणाला.त्याने नेमके कश्याला हो म्हणले हे तिला समजले नाही.गिरीशचा फोन येऊन गेला का त्याला?मला का नाही केला मग त्याने ह्या विचाराने ती रडवेली झाली.तिच्या चेह-यावर हे सगळे विचार उमटले असावे...ते पाहून गिरीश म्हणाला." नाही आला मला.मिच करेल आज त्याला...झापतो चांगला..समजायला नको का त्याला तू वाट पहाते आहेस ते?आणि मी मुद्दाम त्याला सांगायला हवे का हे?इतका बेजवाबदार पणे कसा वागू शकतो तो?"
मित्राच्या ह्या बोलण्याने ती निरुत्तर झाली..पण जे मित्राला समजते ते गिरीशला समजू नये...ह्या विचाराने तिचा जीव घुसमटल्या सारखा झाला.मन चिरत गेला."तस नाही रे.काही कामात बिझी असेल तो.नवीन नौकरी आहे न ..आणि आमच्या साठीच करतोय न तो हे कष्ट..."
त्यावर त्याचा मित्र फक्त हसला.आपण त्याची समजूत काढतोय की स्वत:ची हेच तिला कळाले नाही.उद्या येते ह्या वेळेस असे त्याला सांगून ती पुढे निघाली..तेवढ्याने तिच्या मनाला आधार वाटला की निदान आपली तगमग गिरीश पर्यंत पोचती होईल.
घराकडे पावले उचलायला लागल्यावर तिला अजून उदासीनतेने घेरले.घरी कसे वातावरण असणार हे तिला पक्के माहीती होते.घराची अजीबात ओढ वाटत नव्हती.म्हणून गिरीशशी लग्न झाले की सुटका होईल असे तिला वाटत होते.
दारात आई पायरी वर बसली होती.तिने आईकडे पहायचे टाळले.अंगणात अंधार दाटत आला होता.बैठकीतल्या लाईटचा उजेड खिडकीतून अंगणात पडत होता.त्याने अंधार अजूनच गडद वाटत होता.बाकी खोल्यान्मधले दिवे बंद होते.तिला भूक लागली होती.चहा पण घ्यावा वाटत होता.शांतपणे थोडावेळ अंग टाकावे वाटत होते...मन शरीर दोन्ही थकले होते.पण ह्यावेळेस झोपणे म्हणजे रात्रीच्या झोपेचा बट्ट्याबोळ..आणि मग उद्या ऑफीस कामाचा विचका झाला असता.म्हणून झोप हा विचार बाजूला सारला तिने डोक्यातून.आईने चहा करून द्यावा ही अपेक्षा पण मनात आली नाही.ती आईला ओलांडत घरात आली.आतल्या खोल्या मधले दिवे लावले.बेसीन जवळ जाऊन थंड पाण्याचे सपकारे चेह-यावर मारले.थंडीने अंगावर शहारे आले पण तेवढ्याने तिला बरे वाटले.
गॅस वर स्वत:साठी चहा ठेवला.एक उपचार म्हणून आईला विचारले...".तू घेणार का चहा?" आईने तिच्याकडे वळून पहात म्हणले "नको.माझा झालाय.तुझ्यापुरतेच दुध आहे"
आता आईच्या चेहेर्याकडे तिचे लक्ष गेले.आईचे डोळे लालसर दिसत होते.चेहरा रडल्या सारखा वाटत होता.काय झाले असावे हा विचार तिच्या मनात आला.पण शब्दाने चौकशी करायची इच्छा झाली नाही.मनामनात आलेली अदृश्य भिंत तिला दूर करता येईना.आणि अहंकाराने ती करावीशी पण वाटत नव्हते.भिंत आईने उभी केलीय ती पाडेल.ती तिचीच जवाबदारी आहे....ह्या विचारानी तिला पुर्ण काबीज केले होते...भिंतीवर अजून एक मुलामा चढला.
तिने चहा गाळून घेतला.TV लावला.काहीतरी रटाळवाणा प्रॉग्राम सुरू होता.पण जरावेळात चित्रहार लागणार होता.म्हणून ती दटून बसली.तिला एकदम सगळ्या गोष्टींचा उबग आला.सगळ्या जगउबग आला.सगळ्या जगाची चिड आली.थोड्यावेळाने चित्रहार लागेल म्हणून रटाळ कार्यक्रम बघायचा...गिरीशचा फोन येईल म्हणून लंच टाईम जागचे न हलता घालवायचा.आई स्वत:च्या कोषातून बाहेर येईल म्हणून वाट पहायची...
तिला हे.नको असलेले वाट पहाणे लादून घेतले म्हणून अपमानाने रडायला यायला लागले.
घरात इनमीन दोन जणी.गिरीशशी लग्न झाले की ती सुटणार आणि आई पण सुटणार.हे असे का आणि केंव्हा सुरू झाले हे नेमके तिला आठवत नव्हते.पण आईत का आणि केंव्हा बदल झाला हे लक्षात यायला तिला खूप वेळ लागला कदाचीत.
दोघीच दोघी एकमेकीना.वडील तिला आठवत नव्हते इतक्या लहानपणी तिला आणि आईला टाकून गेले.कुणी नातेवाईक नाहीत.वडीलांविषयी कधी बोलणे नाही.तिनेही कधी आईला विचारले नाही.आणि आईने उणीव जाणवू दिली नव्हती.पण एक जिवंत जखम तिला आईच्या डोळ्यात सतत दिसायची.खूप ऐषो आरामात नाही पण समाधानात दोघी एकमेकींसाठी जगत होत्या.
गिरीश आयूष्यात आला आणि तिच भावविश्व बदलून गेले.का कोण जाणे आईला तो आवडला नव्हता.पण तिच्या इच्छे पुढे आईने हरकत घेतली नव्हती..त्याच्याकडे चांगली नौकरी ,पैसा नव्हता.तो काही दिवसानी दुसर्या गावी नौकरीला गेला.आणि मग काही दिवसानी लग्न करायचे असे त्यानी ठरवीले.गिरीश पत्रालाही क्वचीतच उत्तर द्यायचा.आणि तिला मुळातच भावनेच्या भरात वहात जायची सवय.
आधी इथे असताना गिरीश घरी यायचा.तेंव्हा ते दोघ तासंतास गप्पा करत बसायचे...बाहेर फिरायला जायचे...बाहेरून खाऊन यायचे.त्या क्षणांच्या आठवणीने तिला परत नर्व्हस वाटायला लागले.
मध्यंतरी आईच्या शाळेतले मास्तर काही कारणाने घरी आले.तेंव्हा ती गिरीश सोबत बाहेर गेलेली होती...घरी आली तेंव्हा आई आणि मास्तर बोलत बसले होते..आई हसत होती...आई बर्याच दिवसानी हसतेय हे तिला जाणवीले.
मग ते मास्तर अधून मधून यायला लागले...त्यांच येण जाण जास्त वाढलेय हे तिला लक्षात आले नाहे.कारण त्या दरम्यान गिरीशने तिचे अवघे विश्व व्यापून टाकले होते..त्या माणसाची आणि आईची घसट वाढतेय...आई स्वत:चे एक वेगळे जग निर्माण करू पहातेय हे तिला लक्षातच आले नाही.
गिरीश नौकरी निमित्य बाहेरगावी गेला आणि तिला ते जाणवायला लागले.कारण जेंव्हा तिला एकटे पडायची वेळ आली तेंव्हा आई मास्तर मधे वेळ घालवायला लागली होती .
ह्या क्षणी तिला प्रकर्षाने जाणवले ते आईचे एकटे पण .वडील सोडून गेल्यावर ज्या स्वाभीमानाने तिने आयुष्य फक्त आपल्या आधारावर काढले तो जाणवला.ती गिरीश मधे मग्न असताना आईची पोकळी अजून कशी वाढली असेल हे जाणवले.तो काळ कसा गेला असेल आईचा?हा विचार मनात आला.मग आईने तेंव्हा आधार शोधला मास्तरान्मधे तर काय बिघडले?पण ही जाणीव आपल्याला आज होतेय कारण गिरीशच्या वागण्याने मनात शंका निर्माण झालीय ह्या विचाराने खंत वाटली..अन आईचा कौल द्यायला लागले.त्या मास्तर पाई मायलेकीत भांडणे व्हायला सुरूवात झाली होती.तिला त्यांव्मच घरी येण आवडेनासे झाले.होते.आईला काय गर ह्या वयात असे वाटायचे ..
आज स्वत:वर वेळ आल्याने आईचा एकटेपणा जाणवत होता तो तेंव्हा का समजला नाही?त्या दोघी.....(2)
ऊठून बाहेर जाऊन आईला आवाज द्यावा असे तिला वाटले कपातला गार झालेला चहा तिने एका घोटात घश्या खाली घातला.तितक्यात चित्रहार सुरू झाला.तिने ते आईला कळावे म्हणून आवाज वढवीला आईला मुळात गाणे ऐकायची खूप आवड.पण आजकाल ती पण नाहीशी झालेली तिला जाणवली गाण्याचा आवाज ऐकून आई आत आली.दोन दाराच्या मधे खुर्ची टाकून त्यावर बसली.एक नजर TV कडे तर एक दाराकडे अशी होती.आईच्या मनात काय विचार चालू असतील हे तिला माहीती होते.
आपल्या नकळत्या वयात तरूण आईच्या भरवश्या वर टाकून आईला एकटे करणार्या वडीलांची तिला अतोनात चिड आली.आणि अचानक पणे त्या मास्तरचे आईच्या आयुष्यात महत्व का वाढले असावे हे तिला उमगले.मी लग्न करून जाण्या आधी कुणाच्या प्रेमात पडून इतकी व्यग्र झाली की आईला आलेले एकटेपण वाढतेय हे कळालेच नाही.जेंव्हा आपण सतत गिरीशसोबत असायचो.आई किती हवालदिल झाली असेल ह्या विचाराने ती आता हवालदील झाली.आपण आज ना उद्या आयुष्यात पुढे सरकणारच होतो.हा विचार करून आईने मास्तराचा आधार घेतला असेल तर काय बिघडले?
गिरीशने साधा फोन केला नाही तर आपण हताश होतो.सुन्न होतो.मग वडीलानी दिलेली जखम सांभाळत तिने आयुष्यभराचे एकटेपण एखाद्या व्यक्ती सोबत वाटून घ्यायचे ठरवीले तर काय बिघडले होते? आपण तमाशा केला .त्या दोघाना जवळ बसलेले पाहुन.त्या नंतर मास्तरानी येणे बंद केले.आणि आई आतल्या आत मिटून गेली.आईला शरीरसुखासाठी ह्या वयात एखाद्या पुरूषाला जवळ करावे वाटले हे तिला तेंव्हा पटलेच नव्हते.
आतल्या आत एक विज लक्खन चमकली..लाख लाख दिव्यांचा प्रकाश पडल्या सारखे झाले...ती आईची गरज होती.वर्षानूवर्षे आई त्यापासून वंचीत होती.आपण गिरीश सोबत निघून गेल्यावर आईला जगणे किती कठीण झाले असते?मग मनाची भूक भागविण्यासाठी तिने मास्तराना जवळ केले होते...मग जर शरीराचा पण विचार त्यात आला असेल तर काय गैर होते?आपण नाही का गिरीशचा आवेग स्विकारत?हवाच असतो न त्याचा स्पर्ष?
स्वत:चा स्वार्थ साधून गेलेले वडील , बेफीकीर वागणारा गिरीश , आणि अपमान झाला म्हणून निघून गेलेले मास्तर हे सगळे एकाच माळेचे मणी वाटले तिला.आईत आणि आपल्यात अखंड असलेला दुवा म्हणजे आपापले एकटेपण.तिला आतून घुसमटल्या सारखे व्हायला लागले.दोळे टचटच भरून यायला लागले.वडील आणि मास्तरांपेक्षा ही आपण आईच्या पदरात जास्त एकाकी पण बांधल्याचे तिला आतून जाणवीले.आईच्या पोकळीची भयानकता जाणवली.
ती नकळत उठली.आई जवळ गेली आईच्या खुर्चीजवळ खाली बसून तिने आईच्या मांडीत आपले डोके ठेवले.आईचा हात तिच्या केसातून फिरायला लागला.दोन टपोरे अश्रू तिच्या गालावर पडले.ती हमसून हमसून रडायला लागली.
उद्या ती गिरीशच्या फोन ची वाट पहाणार नव्हती
तिची आई उद्या पायरीवर बसणार नव्हती
.
.....सौ गायत्री मुळे
August 4 at 7:53am

No comments:
Post a Comment