इतकेही गुंतायचे नव्हतेच मला की
क्षुल्लक आठवानी मनात जळवा लागाव्या
आणि तुला तितकेच लांब ठेवायचे होते
ज्याने माझा श्वास न गुदमरून जावा
एका बेसावध क्षणी
नकळत रंध्रारंध्रात गोठत गेलास
श्वासाच्या लयीत एक
धुंद संगीत बनून बरसत राहीलास
मला सवय होती मृगजळा ची
तहान भिनत होती आतात आभासाची
चिमटीतल्या फुलपाखराचा रंग
असा कायमचा बोटाला कसा लागू शकतो?
वादळाच्या पाठोपाठ फक्त
विनाश घोंघावत असतो
मी रिक्त रिक्त तरी भारावलेली
उसन्या सुखा मागे उरफोडत धावत निघालेली
खोल एका तळघरात
कुलूपा आडचा कोपरा होता
धूळ भरल्या वाटेवरती
कुणा पायाचा वावर होता
आताशा कुठल्याच पवित्र जाणीवेने
शहारा उमटत नाही
लाटे सकट वहात आलेला गाळही
किनाऱ्यावर ठैरत नाही
कदाचीत इतकी रुक्ष
मी पहिल्यांदाच असावी
कुठलीच ओल आता
माझ्या पापणीत उतरत नाही
गायत्री ......
क्षुल्लक आठवानी मनात जळवा लागाव्या
आणि तुला तितकेच लांब ठेवायचे होते
ज्याने माझा श्वास न गुदमरून जावा
एका बेसावध क्षणी
नकळत रंध्रारंध्रात गोठत गेलास
श्वासाच्या लयीत एक
धुंद संगीत बनून बरसत राहीलास
मला सवय होती मृगजळा ची
तहान भिनत होती आतात आभासाची
चिमटीतल्या फुलपाखराचा रंग
असा कायमचा बोटाला कसा लागू शकतो?
वादळाच्या पाठोपाठ फक्त
विनाश घोंघावत असतो
मी रिक्त रिक्त तरी भारावलेली
उसन्या सुखा मागे उरफोडत धावत निघालेली
खोल एका तळघरात
कुलूपा आडचा कोपरा होता
धूळ भरल्या वाटेवरती
कुणा पायाचा वावर होता
आताशा कुठल्याच पवित्र जाणीवेने
शहारा उमटत नाही
लाटे सकट वहात आलेला गाळही
किनाऱ्यावर ठैरत नाही
कदाचीत इतकी रुक्ष
मी पहिल्यांदाच असावी
कुठलीच ओल आता
माझ्या पापणीत उतरत नाही
गायत्री ......