तुम्ही नवतेच न कधी
तरी कायम असता.
आमच्या अस्तित्वात....
रंगरुपात
आईच्या नि:शब्द शब्दात
आणि
कायम तिच्या स्वप्नात
उणिवेची जाणिव नव्हतीच
भासलीच नाही
पण एक भण्ण पोकळी
कायम..
बघतो न जेंव्हा
एखादे निरागस बालक बाबांकडे झेपावताना...
किंव्हा सासुर्याला जात्या लेकीचे डोळे पुसताना.
तेंव्हा नक्कीच जाणवत तुमच नसणे
कधी हट्टाने रुसून
कधी बोटाला धरून.
आपण जगलो नाही सोबत
पण तरी क्षणो क्षणी एक हात
तुमच्या अस्तित्वाचा ...
कायम होता.सतत
अक्षरे गिरवायला.कधी
तुमच्या कडून नाही शिकले
ना बोटाला धरून तुमच्या
कधी शाळेत गेले.
पण चालतच होतो
सोबत प्रत्येक पाऊले
तुमच्या अस्तित्वाने
नेहमी भारवलेले.
कधी गोष्टीत घाबरून मन बावरलेले
.कधी तुम्हाला ना बिलगले.
तुमचे हात हळुच कधी
गालावरून ना फिरले.
कधी पांघरून ऊब तुमची
दो हातांची झोळी ना झुलले
तरी अंगाईत आईच्या.
तुमचेच गीत तिने गाईले.
सौ गायत्री मुळे...
March 5, 2014
तरी कायम असता.
आमच्या अस्तित्वात....
रंगरुपात
आईच्या नि:शब्द शब्दात
आणि
कायम तिच्या स्वप्नात
उणिवेची जाणिव नव्हतीच
भासलीच नाही
पण एक भण्ण पोकळी
कायम..
बघतो न जेंव्हा
एखादे निरागस बालक बाबांकडे झेपावताना...
किंव्हा सासुर्याला जात्या लेकीचे डोळे पुसताना.
तेंव्हा नक्कीच जाणवत तुमच नसणे
कधी हट्टाने रुसून
कधी बोटाला धरून.
आपण जगलो नाही सोबत
पण तरी क्षणो क्षणी एक हात
तुमच्या अस्तित्वाचा ...
कायम होता.सतत
अक्षरे गिरवायला.कधी
तुमच्या कडून नाही शिकले
ना बोटाला धरून तुमच्या
कधी शाळेत गेले.
पण चालतच होतो
सोबत प्रत्येक पाऊले
तुमच्या अस्तित्वाने
नेहमी भारवलेले.
कधी गोष्टीत घाबरून मन बावरलेले
.कधी तुम्हाला ना बिलगले.
तुमचे हात हळुच कधी
गालावरून ना फिरले.
कधी पांघरून ऊब तुमची
दो हातांची झोळी ना झुलले
तरी अंगाईत आईच्या.
तुमचेच गीत तिने गाईले.
सौ गायत्री मुळे...
March 5, 2014
No comments:
Post a Comment