Gayatri S Muley
वारा आला उधाणत...
तुझ्यासारखाच
आणि मी झेलला अंगाभर
तो आला धुळीसोबत
खूप मलीन..
.आणि मी पण भिजली
त्या धुळीत
मग मुळापासून हलायला लागलेले व्रुक्ष.
आणि थरथरत
घरट्यात बसलेले पाखरे
ह्यांचा एक अबोल संघर्ष
तावदान ओढले
तो टकटक करतच राहीला दारावर
मला एक असूरी समाधान
तुला बाहेर थोपवल्या सारख
मग हळूच बाहेर बघीतल
2/4थेंब रांगोळी काढून गेलेले
धुळीची पण नक्षी झालेली
आणि बाहेर थोपवल तरी झालेली वाताहत
पाऊस पडून गेला
मंद झुळूक यायला लागली
तुझ कधीच वाक्य
पाऊस पडून गेला की जस सगळ निरभ्र होत
तसे तुझे डोळे तू रडल्या नंतर अजूनच स्वछ होतात...
तुझ सगळ औरच
बरसण
वादळ
आणि नंतर हे धुळाक्षरे
हळूच तावदान पुसून मी थोपवू पहाते
एक वादळ आतले
....गायत्री.....
May 26, 2014
वारा आला उधाणत...
तुझ्यासारखाच
आणि मी झेलला अंगाभर
तो आला धुळीसोबत
खूप मलीन..
.आणि मी पण भिजली
त्या धुळीत
मग मुळापासून हलायला लागलेले व्रुक्ष.
आणि थरथरत
घरट्यात बसलेले पाखरे
ह्यांचा एक अबोल संघर्ष
तावदान ओढले
तो टकटक करतच राहीला दारावर
मला एक असूरी समाधान
तुला बाहेर थोपवल्या सारख
मग हळूच बाहेर बघीतल
2/4थेंब रांगोळी काढून गेलेले
धुळीची पण नक्षी झालेली
आणि बाहेर थोपवल तरी झालेली वाताहत
पाऊस पडून गेला
मंद झुळूक यायला लागली
तुझ कधीच वाक्य
पाऊस पडून गेला की जस सगळ निरभ्र होत
तसे तुझे डोळे तू रडल्या नंतर अजूनच स्वछ होतात...
तुझ सगळ औरच
बरसण
वादळ
आणि नंतर हे धुळाक्षरे
हळूच तावदान पुसून मी थोपवू पहाते
एक वादळ आतले
....गायत्री.....
May 26, 2014
No comments:
Post a Comment