Gayatri S Muley
शांततेच्या काठावर .....जाऊन बसल की
एखादा हरवलेला क्षण येतोच
अलवार रुंजी घालत !!
काय काय प्रश्न असतात त्याच्या मनात
उत्तर मागत नाही तो
मी पण त्याला चाळवत नाही
नेतो तो मला एका दूरवरच्या निळ्या ढगांच्या कडेला
आणि माझ अस्तीत्व जाणवल्या गत तो ढग करडा होतो .
...बरसू लागतो
क्षण हळवा चिंब होऊन जातो
मी नेहमीच कोरडी उरलेली??
मला तो हळवा झालेला क्षण आतातरी चिमटीत हळुच धरायचा असतो
कधीतरी उगाच सुटून आज पुढ्यात आला असतो
मग ते करड्या मेघाचे
थेंब उगाचच जाणवतात मला
पापणीच्या तळाशी
त्या क्षणाच्या ओंजळीत..कितीतरी मान टाकलेली स्वप्ने असतात
त्या थेंबात ती तरतरुन येतात
त्याना हळुच कोंब फुटून कळी चे फूल व्हायला लागते
"प्रत्येक फुल सुगंधा साठी नसत ग"
क्षण मला सांगतो
"ह्या स्वप्न फुलाला असच उरू दे तुझ्या माझ्यात. शाबूत!!....."
त्याच्या पाकळ्याना ओझ नको आपल्या श्वासांच
मी पण अलगद सोडते ते फूल
क्षण दिसेनासा होतो ...
एकांताच्या किनारी मी उरली असते
काही निर्माल्य झालेल्या कळ्या घेेऊन
...गायत्री....
October 12, 2014

No comments:
Post a Comment