प्रवाह अडला कसा
येऊन आज बांधाशी
मेळ का जमत नाही
आज भावनांशी.
अंधारल्या त्या रातीना
घेतले मी उराशी
आठ्वणींचे काजवेही
कसे झाले परदेशी
फितूर झाली सांजवेळ
का पाखरांशी
परततील कसे पुन:
आज घरट्याशी.
फुलपाखरे झाली
कशी आता दरवेशी
बहर इथला सांडला
परक्या अंगणाशी.
सुरांनी का आज
साधले वैर लयीशी
तान उमटली आज
का पुन: तीच नकोशी
......
सौ.गायत्री मुळे...
April 20, 2014
येऊन आज बांधाशी
मेळ का जमत नाही
आज भावनांशी.
अंधारल्या त्या रातीना
घेतले मी उराशी
आठ्वणींचे काजवेही
कसे झाले परदेशी
फितूर झाली सांजवेळ
का पाखरांशी
परततील कसे पुन:
आज घरट्याशी.
फुलपाखरे झाली
कशी आता दरवेशी
बहर इथला सांडला
परक्या अंगणाशी.
सुरांनी का आज
साधले वैर लयीशी
तान उमटली आज
का पुन: तीच नकोशी
......
सौ.गायत्री मुळे...
April 20, 2014
No comments:
Post a Comment