Thursday, June 25, 2015

मोरपीस

Gayatri S Muley
तुझ्या आठवांचे मोरपिशी बहाणे
मी सांजवेळी गाते अवचितसे गाणे.

तू दिलेस मजला कितीसे रंग
गडद आठवणींचा संग
शांत डोह आत तरंग
पुन:पुन: नव्याने तिथेच तसे रमणे.
तुझ्या आठवांचे........
.
मी न राधीका ना मी मीरा
नाद जागतो तरी अंतरी.
सप्तसुर तुझेच मी रे
सानीका तुझीच मी बावरी
तुझ्या आठवांचे.....

हे मोरपिस कितीसे देखणे
रंग त्यातले सारेच अनोखे.
फिरू दे सार्या तनामनावर
लेऊन साज सारे फसवे
तुझ्या आठवांचे....

मोरपिसाने कूपी उघडली.
भेटीतल्य त्या गंध क्षणाची
किती हळुवार रोमांच सारे.
उगाच थरथर आज तनूची

तुझ्या आठवांचे मोरपिशी बहाणे
मी सांजवेळी गाते आवचितसे गाणे.

June 7, 2014

No comments:

Post a Comment