Thursday, June 25, 2015

गाठलेला पाऊस

Gayatri S Muley
वाटले...यंदा
...पावसालच गाठावे
आणि गाठले
आधीच्या सगळ्या कोरड्या कुंपणाना झुगारले
भेटेलच तो माहीती होते
आणि भिजायचे होत्ये
पण पाऊस सुध्दा यंदा अटीनीच बरसला
त्याला गाठण्याचा सोस माझ्यापुरताच उरला.
पाऊस म्हणे
...मी येईल बरसेल...माझ्या चौकटीपुरता
म्हणले एखादाच मेघ दे तुझ्या आवाक्यातला
बर असु दे .....
मी भिजून.घेते ..किंव्हा तू कोसळ मी तोलून घेते
पाऊस म्हणे नको मला माझी चौकट असु दे
रिंगण दिलेय तुला ..ठेव तुझ्यापुरते
.
यंदा गाठायचे पावसाला
मनोमन ठरवले
पाणी भरले मेघ
वेशीहुन परतले
..
सौ.गायत्री मुळे...
July 8, 2014 

No comments:

Post a Comment