Gayatri S Muley
कधीकाळी अश्याच एका पावसाळी रात्रीत
गळणा-या छ्परातून आत आलेला पाऊस
आडव्या तिडव्या बेफाम उन्मत्त सरी
त्या पावसात ओलीचिंब झालेली डायरी
ओघळून गेलेल्या एका कवितेच्या ओळी
नंतर कित्तीच रणरण उन्हात ती डायरी सुकवली
पण त्या ओळी पुन्हा स्मरल्याच नाही
पाऊस आताश्या केंव्हाही येतो.
डायरी जुन्या बस्त्यात माळावर
कुठे जिर्ण पाने.
कुठे जुना ओलावा
कुठे एक पिवळट वास
.
आजकाल नकळत काही ओळी नकळत स्मरतात...
त्या ओल्या ओघळलेल्या कवितेतल्या
.
गायत्री.
March 1
कधीकाळी अश्याच एका पावसाळी रात्रीत
गळणा-या छ्परातून आत आलेला पाऊस
आडव्या तिडव्या बेफाम उन्मत्त सरी
त्या पावसात ओलीचिंब झालेली डायरी
ओघळून गेलेल्या एका कवितेच्या ओळी
नंतर कित्तीच रणरण उन्हात ती डायरी सुकवली
पण त्या ओळी पुन्हा स्मरल्याच नाही
पाऊस आताश्या केंव्हाही येतो.
डायरी जुन्या बस्त्यात माळावर
कुठे जिर्ण पाने.
कुठे जुना ओलावा
कुठे एक पिवळट वास
.
आजकाल नकळत काही ओळी नकळत स्मरतात...
त्या ओल्या ओघळलेल्या कवितेतल्या
.
गायत्री.
March 1
waah मनस्विनी...
ReplyDeleteओघळून गेलेल्या एका कवितेच्या ओळी...
ReplyDeleteआजकाल नकळत काही ओळी नकळत स्मरतात...
Bahot khub... :)
Thank you Shripaad
Deleteपाऊस! ऐक आवडता अनुभव, ऋतु! हवाहवासा वाटणारा !
Deleteअतिशय सुंदर बरसलाय तुझ्या कवितेतून !
'मनस्विनी' शीर्षक सार्थकच !
'पाउस, पावसाळया रात्री,
घरात आतात पर्यंत केलेली सोबत,
कधी तुषारी भुरभूर तर कधी
आसुडी,असुरी सरी,
भिजलेली डायरी ही सुकेलच,
कुणा अवचित क्षणी आठवतील ही
त्या ओघळलेल्या ओळी,
पण हे ओले मन
कसं सांभाळायचं ……,
आताशा पाउस ही येत नाही
नेहमी सारखा, दारावरच्या
दरवेशा सारखा निघून जातो,
काही ही न घेता, देता,
न बरसता तसाच …… निर्विकार !
पण हे ओले मन
मग कसं सांभाळायचं ? '
Waah...ओले मन कसे सांभाळायचे.....
Deleteक्या बात है खूप छान
ReplyDeleteधन्यवाद सतीशजी.
Delete